Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
    ललित

    Poetry : अपूर्ण अन् रातराणी…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 11, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, कवितांचा आनंद, Poetry, अपूर्ण कविता, रातराणीचा सुगंध, प्रेयसीची आठवण, सुगंधी शपथ, हिरवे आभाळ, प्रेमकविता, विरहकविता, श्रीकृष्ण प्रेम, राधेश्याम, राधेकृष्ण, मीरा कृष्ण, रुख्मिणी कृष्ण, मीरा कृष्ण, online chatting, digital window,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रेवती निलेश पांडे

    अपूर्ण

    संध्यासमयी कातरवेळी

    श्यामनिळाईत भिजल्या यमुनेकाठी

    सावळ्याची मुरली साद घालीत होती

    राधेच्या प्रितीसाठी…

    अशा अवेळी अचानक अनाहून

    गोष्ट एक घडली

    मीरेची नजर तेथे रेंगाळणाऱ्या

    रुख्मिणीवर पडली…

    कपाळी गळ्यात बोटांत हातात

    कृष्णाच्या अस्तित्वाच्या खुणा

    मी कृष्णाची अन् कृष्ण माझा

    जणू सांगे पुन्हा-पुन्हा…

    ज्याला क्षणभर मिळवण्याची आस होती

    तो हिला जन्मभरासाठी मिळावा

    दैवाने असला खेळ

    मजसवेच का खेळावा

    असूया आणि अगतिकतेच्या

    ऊन-सावलीचा तिच्या नजरेत खेळ

    रुख्मिणीलाही क्षणभर कळेना

    ही कशी टाळावी वेळ

    माझ्या भाळी लावलेल्या कुंकुवाचा

    हिला का वाटावा हेवा

    हिने माझ्याच कृष्णाचा का बरे

    असा ध्यास घ्यावा

    कसे सांगावे हिला, मी म्हणजे कर्तव्य

    अन् कृष्ण म्हणजे निळं आकाश

    माझ्या जमिनीपासून खूप दूर

    माझ्यासाठी कधीच नव्हते

    त्याच्या मुरलीचेही सूर

    मिळून न मिळण्यासारखं

    मिळाल सारं काही

    आमच्या अंतरीच्या अंतराला

    तशी कारणं काहीच नाही…

    कृष्णशेल्याला बांधली गेलेली गाठ

    सोडवणं मला जमलं नाही

    आणि आयुष्यभर तो शेला मिरवणं

    त्याला जमलं नाही

    त्याच्या माझ्या नात्यातल्या

    तुला दिसणार नाहीत रिकाम्या जागा

    तरीही आम्हाला बांधून ठेवणारा

    आहे एक अदृश्य धागा

    कदाचित तो मला काही कळलाच नाही

    माझ्यासाठी कृष्ण म्हणजे मृगजळ

    शेवटी सत्यभामेच्या प्राजक्ताने

    मी भरून घेतली आहे माझी ओंजळ

    हेही वाचा – Poetry : खेळ, ठसे, वसा…


    रातराणी

    घराची खिडकी अगदी बेताची असूनही

    त्यानं हौशीनं तिथे एक रातराणीचा वेल लावलाच…

    त्याला वाटलं राहील खिडकीत बापही

    तिची काय एवढी अडचण

    तिच्या नाजूक फुलांबरोबर जरा सुगंधी संवाद

    तेवढेच काय ते सुखाचे क्षण

    जावे कधीतरी कल्पनेच्या गावी

    सोबतीला घेऊन जर – तर

    जुन्या अबोल जखमांवर

    तिची गंधीत फुंकर

    स्लायडरच्या पलीकडे

    तिचं असणं – नसणं

    धुंद रातीला हळव्या क्षणी

    तिचं गालात हसणं

    पण असा कधी विचार केला नाही त्याने की…

    तिच्यासाठी त्यालाही सुचेल

    कविता एखादी

    अन् आभाळही होईल हिरवे

    तिच्या सुगंधासाठी

    हे कसलं सुगंधाचं व्यसन

    ही कसली हिरवी किमया

    या व्याकुळ कातरवेळी

    मखमली फुलांच्या समया

    संध्याकाळची वाट पाहत

    त्याचा दिवस जातो विरून

    खिडकीत उभा तो असतो

    अवघ्या घराला विसरून

    आता तर ती वेळ

    घरभर पसरली आहे

    आणि आवरायचं ठरवलं की

    सुगंधी शपथ घालते म्हणे

    हेही वाचा – Poetry : आभाळ, लव्ह बर्ड, पावसाची पहिली सर


    मोबाइल – 8552893399

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित

    No Comments

    1. माधवी माहुलकर avaantar.com on February 11, 2026 7:47 pm

      खूप छान ! भावपूर्ण कविता आहेत रेवती ! तूला खूप खूप शुभेच्छा! ❤️👍

      Reply
    Reply To माधवी माहुलकर avaantar.com Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn