Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
    आरोग्य

    Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 26, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, mind, body, life, मन MentalHealth, मानसिकआरोग्य, निरामयआरोग्य, मनोविकार
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रविंद्र परांजपे

    मनाचे आरोग्य (Mental Health) चांगले असेल तर, शरीराचे आरोग्य चांगले राहते. तथापि, दैनंदिन जीवनात आपण नेहमी शरीराचे आजार, व्याधी-विकार, तक्रारी इत्यादींबद्दल म्हणजेच शारीरिक आरोग्याबाबत बोलत असतो. जसे आपले शरीर आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते आणि प्रत्यक्षात मन आजारी पडते देखील, पण शरीराप्रमाणे आपल्याला मन दिसत नसल्याने मनाचे आजारपण आपल्या लक्षातच येत नाही.

    यदाकदाचित मनाचे आजारपण लक्षात आले तरी, ते दडपण्यात अथवा लपविण्याकडे अधिक भर असतो. असे केल्यास साहजिकच मानसिक समस्या बळावतात आणि परिणामी मानसिक व्याधी, विकार उद्भवतात. मनाचे आरोग्य बिघडले की, त्याचा थेट दुष्परिणाम म्हणजे शरीराचे आरोग्य देखील बिघडते. ही बाब ध्यानात घेऊन आपण मनाचे आरोग्य चांगले ठेवण्याकडे लक्ष द्यायला हवे.

    आता आपण मन या संज्ञेविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.

    मन – आयुर्वेदानुसार मानवी शरीर पंचकोशांनी बनले असून त्यात मनोमय कोश म्हणजे मनाचे आवरण याचा इतर कोशांप्रमाणे सक्रिय सहभाग आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला मन असून या सचेतन पेशींचे संपूर्ण मिळून तयार होणारे मानसिक शरीर म्हणजे मन होय.

    हेही वाचा – Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज

    मन या शब्दातील ‘म’ म्हणजे मरेपर्यंत आणि ‘न’ म्हणजे नष्ट. मरेपर्यंत जे नष्ट होत नाही ते मन. थोडक्यात सांगायचे झाल्यास, मन सतत मनन करत असते, म्हणून त्याला मन म्हणतात. मनाचे स्थान हृदय आहे. मनाचे गुण सत्त्व असून मनाचे दोष रज आणि तम आहेत.

    मन या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेतल्यानंतर मनाचे आरोग्य म्हणजे काय, हे समजणे सुकर होणार आहे.

    मनाचे आरोग्य म्हणजे मनाची नैसर्गिकरीत्या झालेली निकोप सुदृढ वाढ आणि विकास होय. मनाचे आरोग्य ही संकल्पना मानसिक विकारांचा अभाव एवढ्यापुरती मर्यादित नाही. या संकल्पनेत एकंदर बरे वाटणे, भावना सुखद असणे, विचारसरणी सुसंगत असून वर्तणूक समाजमान्य असणे, अशा बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो.

    हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा

    समारोप – मन ही मानवाला मिळालेली विशेष देणगी आहे. वास्तविक, शरीरापेक्षा मनाची शक्ती मोठी असते. दैनंदिन जीवनातील कार्ये करण्यासाठी तसेच आयुष्यातील कोणतेही ध्येय गाठण्यासाठी शारीरिक स्वाथ्याबरोबर निरामय मानसिक आरोग्यातून प्राप्त होणाऱ्या मनोबलाची साथ सदैव आवश्यक असते. म्हणूनच शारीरिक आरोग्यावर सुपरिणाम करणाऱ्या मनाचे आरोग्य जपणे नितांत आवश्यक आहे.

    क्रमश:

    (लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून त्यांनी निरामय मानसिक आरोग्य हे सोप्या सहज समजेल अशा पद्धतीने तसेच भाषेत मार्गदर्शनपर दैनंदिन जीवनात उपयोगी पुस्तक लिहिले आहे. पुस्तकासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)

    मोबाइल – 9850856774

     

    निरामय मानसिक आरोग्य या पुस्तकाच्या सादरीकरणाच्या व्हिडीओची लिंक –

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य

    No Comments

    1. Aditi Kulkarni on July 27, 2025 9:28 pm

      Khup chan…

      Reply
    2. रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on August 2, 2025 8:31 am

      धन्यवाद

      Reply
    3. शुभांगी गर्दे on February 6, 2026 11:56 am

      अतिशय उद्बोधक, विचार करायला लावणारी माहिती🙏🏻

      Reply
    Reply To Aditi Kulkarni Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn