Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»Yoga is lifestyle : पद्मासन, वज्रासन, बद्ध कोनासन…
    आरोग्य

    Yoga is lifestyle : पद्मासन, वज्रासन, बद्ध कोनासन…

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 27, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Aasana, Yoga, lifestyle, आसने, योग, जीवनशैली, Padmasana, Vajrasana, Baddha Konasana, पद्मासन, वज्रासन, बद्ध कोनासन
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अनिता बाळकृष्ण वैरागडे

    मागील लेखामध्ये उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात बसून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया.

    पद्मासन

    पद्म म्हणजे कमळ. हे आसन करणार्‍या व्यक्तीच्या शरीराचा आकार कमळासारखा भासतो म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन हे नाव  दिले आहे. जमिनीवर पाय सरळ समोर ठेवून ताठ बसावे. उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलावे आणि डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून, उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. तळहात गुडघ्यांवर पालथे किंवा ज्ञानमुद्रेत ठेवावेत. पाठीचा कणा ताठ ठेवून दृष्टी नासाग्री (नाकाच्या शेंड्याकडे) ठेवावी किंवा डोळे मिटावेत. श्वसन नैसर्गिकरित्या चालू असावे.

    फायदे – ध्यानस्थ बसण्यासाठी अत्यंत उपयोगी आसन आहे. मानसिक शांती आणि स्थिरता यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पद्मासन नियमितपणे केल्यास गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होत नाही.

    वज्रासन

    या आसनात बसून योगमुद्रा, ब्रह्ममुद्रा, शशांकासन, समर्पणासन, सुप्त वज्रासन ही आसने तसेच प्राणायाम, ध्यान, ओंकारजप इत्यादी साधना करता येते. त्यामुळे हे आसन महत्त्वपूर्ण आहे. वज्रासन करताना प्रथम गुडघ्यावर बसून पायाचे तळवे मागच्या बाजूला वरच्या दिशेने ठेवावेत. पाठ ताठ असावी. श्वासाची क्रिया हळूहळू सुरू ठेवा. हात गुडघ्यांवर ताठ ठेवावेत. या आसनात 1 ते 3 मिनिटे किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ बसता येईल.

    फायदे – जेवणानंतर इतर आसने करायची नसतात. परंतु, वज्रासन यास अपवाद आहे. जेवल्यानंतरही या आसनात पाच-दहा मिनिटे बसता येऊ शकते, त्यामुळे पचनक्रियेस मदत होते. रक्तभिसरण सुधारते. कटिप्रदेश, ओटीपोट, जननेंद्रियाच्या सभोवतालचा भाग यावर या आसनाचा विशेष परिणाम होतो.

    हेही वाचा – Yoga is lifestyle : ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, उत्कटासन…

    बद्ध कोनासन

    बद्ध कोनासनाचे दोन प्रकार आहेत. आधी आपण पहिला प्रकार बघूया. खाली बसल्यानंतर गुडघे दुमडून दोन्ही पायांचे तळवे समोर एकत्र जोडून ठेवायचे. पायांचे तळवे पोटाजवळ शक्य तितक्या जवळ आणल्यानंतर मांडी, गुडघा आणि पोटरी अशा पायांच्या भागांची हालचाल फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर-खाली करावी.

    दुसऱ्या पद्धतीत गुडघे दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकत्र जोडून ठेवायचे. त्यानंतर दोन्ही हात नमस्कारच्या मुद्रेत श्वास घेत वर न्यायचे आणि काही सेकंद थांबून हळूहळू हात खाली आणून जमिनीवर ठेवायचे. डोकं जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा.

    फायदे – रक्ताभिसरण सुरळीत होते. पचनक्रिया सुधारते. पाठीचा कणा तसेच कंबरेचे आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.

    हेही वाचा – Yoga is lifestyle : अर्ध हलासन, पूर्ण हलासन, सर्वांगासन

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn