Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»विश्वाहूनी निराळे…
    ललित

    विश्वाहूनी निराळे…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 20, 2025Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, प्रेम, शांता_शेळके, हे_विश्व_प्रेमिकांचे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मानसी देशपांडे

    लेखनाचं जग हे किती सुंदर आहे हे मला व.पु. काळे यांचे विचार वाचल्यावर समजलं. तसं कवितेचं जग हे देखील तितकंच भावस्पर्शी आहे, हे शांता शेळके यांच्या कविता वाचून समजलं. जी व्यक्ती प्रेमात पडते त्यांचं विश्व हे किती रंगीबेरंगी असतं, तिथे क्षणिक रुसवे-फुगवे देखील असतात. कारण, प्रेमाच्या या जगात जितका सहवास महत्वाचा आहे, तितकंच एखादी व्यक्ती जेव्हा काही क्षणांसाठी जरी दूर होते, तेव्हा निर्माण होणारी हूरहूर सुद्धा लक्षात घेतली जाते. व.पु. या वर म्हणतात, “प्रतिक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो…” कसं असतं, प्रेमात वचनं असतात, जाणीवा असतात तसंच काही भेटी या नि:शब्द करणाऱ्या असतात. तुमची जवळची व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे, पण केवळ तिच्या जवळ असल्यामुळे अनेकदा शब्द ओठांपर्यंत येतात, पण बाहेर पडत नाहीत. यालाच तर प्रेम म्हणतात ना! पण एक असतं, तुमचे डोळे हे अनेकदा शब्दांचं प्रतिनिधित्व करतात. मग ओठ मूक झाले तरी डोळ्यांतून संवाद सुरूच असतो. नेमकं हेच शांताबाईंनी आपल्या “हे विश्व प्रेमिकांचे…” या कवितेतून सांगितले आहे-

    “असता समीप दोघे, हे ओठ मूक व्हावे…
    शब्दांविना परंतु, बोलून सर्व जावे..”

    विरह हा मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे, जेव्हा आयुष्यात येतो, तेव्हा कितीतरी स्वप्नं ही अपूर्ण राहतात. ती अतृप्तता शब्दांत व्यक्त होण्यासारखी नसते! खऱ्या प्रेमात नेहमी समर्पण वृत्ती असली पाहिजे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे नुसतं सांगितले म्हणजे प्रेम असते का? ते तुमच्या कृतीतून दिसले पाहिजे… तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी कधी एखादा त्याग करावा लागला तर, तो सुद्धा हसत हसत करता येणं म्हणजे खरे प्रेम! म्हणून तर जसं व. पु. म्हणतात, “प्रेम म्हणजे मरण असतं. ‘मी’ हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही. मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे त्याने प्रेम करावं…” विरहात देखील आपल्या माणसाच्या सुखाचा विचार करणं, यासाठी सुद्धा मोठं मन असावं लागतं. इथे कवयित्री शांताबाईंनी म्हटलं आहे,

    “अतृप्त मीलनाचे, विरहातही सुखाचे,
    विश्वाहूनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे….”

    व. पुं.नी एक विचार मांडला आहे, “कित्येकदा एकमेकांशी कडाडून भांडलो, पण एकमेकांशिवाय नाही कुठेच रमलो…” आयुष्य एकट्याने काढणं सोपं नाही. काही वाद जरी झाले तरी, वादामागे फक्त प्रेमच असतं. बराच वेळ घरात तुमचा जोडीदार आला नाही तर, मन सैरभैर होते… नको नको ते विचार मनात थैमान घालतात… अशा वेळी वाद मागे सरतो आणि प्रेम जिंकते. ते क्षण पटकन जावे, असं वाटतं. ती हूरहूर मन इतके बेचैन करते की, त्यावर औषध हे फक्त जोडीदाराची भेट असते. शांताबाईंचे यावर व्यक्त होणं म्हणजे आत्ताच्या काळातील आमच्या मनातील भावना आहे,

    “फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती,
    होता क्षणिक दूर, वेडी मनात भीती,
    दिनरात चिंतनाचे, अनिवार कौतुकाचे,
    विश्वाहूनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे…”

    स्पर्शात इतकी ताकद असते की, न सुटलेली कोडी देखील लगेच सुटतात. खरंच, काही वेळा वाटतं माणसाला डोळ्यांची भाषा समजत असती तर, किती बरं झालं असतं? काही वेळा घटना अशा घडतात की, एका हळूवार स्पर्शाची खूप गरज असते. कारण, नात्यात कधी दुरावा आला तर, त्याचा परिणाम थेट मनावर होतो. एकमेकांची इतकी सवय झालेली असते की, मनावर कधी सुरकुत्या पडतात हेच कळत नाही. काळाला थांबवणे हे निश्चितच आपल्या हातात नाही, पण हृदयात जी धडधड सुरु असते तिचं काय करायचं? जेव्हा काही काळानंतर दुरावा संपतो, तेव्हा फक्त एका स्पर्शाने अंगावर सुखाचे रोमांच उठतात. डोळे आपलं कार्य करत असतातच पण, स्पर्शाची जादूही काही निराळीच!!

    “दूरातही नसावा, दोघांमध्ये दुरावा,
    स्पर्शाविना सुखाने, हा जीव मोहरावा…”

    दोन जीवांच्या म्हणा किंवा प्रेमी युगुलांच्या मनातील भाव हे काव्यात अचूक रितीने उतरवणं म्हणजे कसबच म्हणायला हवं. प्रेमाचा संबंध थेट मनाशी येतो. याला कारण ते पटकन गुंतते. व. पु. म्हणतात, “मन.. म म्हणजे मरेपर्यंत आणि न म्हणजे नष्ट होत नाही, मरेपर्यंत नष्ट होत नाही ते मन…” मग जेव्हा या मनावर काही परिणाम होतात, तेव्हा ते मन कधी प्रेमात बेभान होते तर, कधी ‌क्षमा करताना आभाळाएवढे मोठे होते. प्रेमाची भावना प्रेमिकेच्या मनात कशी निर्माण झाली, हे तिचं तिलाच समजलं नाही… सांगायला जावं तर, शब्द ओठांआड लपतात, मग मार्ग काय तर डोळे आणि चेहरा… हे सर्वच भाव शांताबाईंनी या कवितेतून खूप छान व्यक्त केले आहेत. “प्रेम म्हणजे नेमके काय तर, समोरच्याच्या डोळ्यांत आपली प्रतिमा पाहणं…” कारण, या प्रेमाच्या जगात ओठांवर स्मितहास्य आणतं ते एकमेकांवरचे निस्सीम प्रेम… शेवटी काय तर, हा जन्म सार्थकी तेव्हाच लागतो जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचे प्रेम हे समुद्राइतके विशाल आहे ही जाणीव होणं…

    “ओठी फुलून यावे, स्मित गोड सार्थकाचे,
    विश्वाहूनी निराळे, हे विश्व प्रेमिकांचे…”

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn