Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 01 ते 07 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 1, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    हा आठवडा सर्वसाधारण आहे. छोट्या कामांमध्ये नोकरदारांचा भरपूर वेळ वाया जाईल. परिस्थितीशी समझोता करावा लागेल. पैशांच्या व्यवहारात गाफील राहू नका. व्यवसायात तडजोड केली तर फायदा होईल. अडचणी दूर होतील. जोडधंद्यातून फायदा होईल. महिलांना विश्रांतीची गरज भासेल. मुलांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो.


    वृषभ

    या आठवड्यातील सुट्टीचे दिवस मित्र-मैत्रिणींबरोबर घालवाल. नोकरदारांना सहकारी तसेच वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाच्या पद्धतीत बदल करून व्यावसायिक वर्ग उलाढाल वाढवू शकतो. कामानिमित्त परदेश प्रवास करू शकाल. घरात नातेवाईक, पाहुणे येतील आणि त्यांच्या स्वागतात महिलांचा वेळ जाईल. विद्यार्थ्यांनी वाहन जपून चालवावे. तसेच, कोणाचीही मस्करी करू नये, परिस्थिती गंभीर होऊ शकते.


    मिथुन

    या आठवड्यात ठरलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरदारांचे नवीन हितसंबंध जोडले जातील. तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळू शकेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाने कामाचे आणि वेळेचे नियोजन करावे. कामासाठी लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करा. तुम्हाला मित्रांची मदत मिळू शकेल. महिलांना मुलांकडून आनंदवार्ता मिळू शकतील. कुटुंबात छान कार्यक्रम होतील. विद्यार्थ्यांना मित्र-मैत्रिणींची मदत मिळेल. प्रोजेक्ट पूर्ण करू शकाल.


    कर्क

    या आठवड्यात खर्च वाढतील. नोकरदारांना वरिष्ठांचा मूड सांभाळावा लागेल. कामाचा ताण जाणवेल. कामाचा विस्तार करण्यासाठी व्यावसायिक वर्गाकडून पाऊल पुढे टाकले जाईल. बँक आणि इतर संस्था भांडवलासाठी मदत करतील. महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. घरून काम करून पैसे मिळतील. विद्यार्थ्यांनी पैसे जपून वापरावे. मित्रांना उसने पैसे देऊ नये.


    सिंह

    या आठवड्यात उत्साही वातावरण राहील. नोकरदारांनी कामात तत्पर रहावे. सहकारी तसेच वरिष्ठ सहकार्य करतील. आत्मविश्वास वाढेल. भत्ते, सवलतींचा फायदा घेऊ शकाल. व्यावसायिक वर्गाची मनाप्रमाणे कामे होतील. ओळखीतून नवीन कामे मिळू शकतील. महिलांनाही नवीन कामे मिळतील, ओळखी होतील. नवीन छंद जोपासाल. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढेल.

    हेही वाचा – सारंग आणि चित्रा यांच्या नात्यातील धुसर छटा…


    कन्या

    या आठवड्यात अनुकूल ग्रहमान आहे. नोकरदारांना वरिष्ठांच्या तुमच्याबद्दलच्या अपेक्षा वाढतील. तडजोड करावी लागू शकते. व्यावसायिक वर्गाला मनाविरुद्ध मोठी कामे करावी लागतील. वसुलीकडे लक्ष द्यावे लागेल. मोठी गुंतवणूक करावी लागेल. महिला कमी श्रमात जास्त कामे करू शकतील. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थी पुन्हा अनुभवतील.


    तुळ

    या आठवड्यात कार्यतत्पर राहणे आवश्यक आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिक वर्गाने रेंगाळलेली कामे हातात घेऊन आधी पूर्ण करावीत. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून फायदा करून घ्या. जोडधंद्यातून फायदा होईल. महिला मनाप्रमाणे खरेदी करू शकतील. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेली कामे पूर्ण करावीत आणि त्यासाठी वेळेचे भान ठेवावे.


    वृश्चिक

    या आठवड्यात रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरदारांनी कामावरच लक्ष केंद्रीत करावे, कुणाच्या कामात ढवळाढवळ करू नका. अतिरिक्त कामे ओढावून घेऊ नका. व्यावसायिक वर्गाला पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळतील. आर्थिक आवक वाढेल. कामाच्या पद्धतीत बदल करून व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करू शकाल. महिलांना अनपेक्षित लाभ होईल, घरासाठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी पैशाचा मोह टाळावा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा.


    धनु

    या आठवड्यात कसलीच काळजी राहणार नाही. नोकरदारांनी पगारवाढीसाठी प्रयत्न करावेत. नोकरी बदलण्यासाठीही प्रयत्न करू शकता. कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. कामाचा आणि गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी व्यावसायिक वर्गाला नवीन प्रयोग करता येईल. व्यवसाय समाधानकारक राहील. महिलांनी घरातली कामे सांभाळून करावीत, दुखापत होण्याची शक्यता आहे. शिक्षणासंबंधीचे विद्यार्थ्यांचे आर्थिक प्रश्न सुटतील, मनाप्रमाणे गोष्टी घडतील.


    मकर

    या आठवड्यात कामात उत्साह वाटेल. ग्रहांची साथ मिळेल. नोकरदारांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदी असेल. नेहमीच्या रुटीनमध्ये बदल घडेल. व्यावसायिक वर्गाच्या दृष्टीने काही अनुकूल गोष्टी घडतील. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. पैशाच्या मोहात पडून चुकीचे निर्णय घेऊ नका. महिलांच्या बाबतीत घरात मंगलकार्य ठरतील, पाहुणे येतील. विद्यार्थ्यांना बालमित्र भेटण्याचा योग आहे, जुन्या आठवणीत रमाल.


    कुंभ

    या आठवड्यात स्वतःची कामे स्वतः करा. इतरांवर अवलंबून राहू नका. नोकरदारांना सहकारी त्रास देतील. परिणामी, कुरबुरी वाढतील. वरिष्ठ समजून घेतील आणि मदत करतील. व्यावसायिक वर्गाच्या कामाचा वेग वाढेल. पैशाची व्यवस्था होईल, नवीन करार करू शकाल. नवीन संधी मिळतील. घरातील मदतनीस बायका अचानक दांडी मारतील, त्यामुळे महिलांना कामाचा ताण जाणवेल. उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य कालावधी आहे.

    हेही वाचा – फाटका अन् मोठ्या हॉटेलमधली मेजवानी…


    मीन

    या आठवड्यात सुरुवात मनाप्रमाणे होईल. नोकरदारांना कामात समाधान मिळेल. वरिष्ठ खूश राहतील. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करू शकाल. व्यावसायिक वर्गाने तडजोडीचे धोरण ठेवावे. विचार करून निर्णय घ्यावा. अडकलेली कामे आधी पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. अधिकाराचा पूर्ण वापर करा. महिलांनी सामंजस्याने प्रश्न सोडवावेत, कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात दुर्लक्ष करू नये, सातत्याने जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा.


    prajaktakathe3970@gmail.com

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn