Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»‘त्या’ प्रयोगाने मृत्यू अन् जीवनातली शास्त्रीय खिडकी झाली किलकिली
    अवांतर

    ‘त्या’ प्रयोगाने मृत्यू अन् जीवनातली शास्त्रीय खिडकी झाली किलकिली

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 11, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, डॉक्टर जॉर्ज क्राईल, सीपीआर, ॲड्रेनालिन इंजेक्शन, मृत्यूला चपराक, गोल्डन अवर, CPR Defibrillation, Chemical Resuscitation, जीवन मृत्यू संघर्ष,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    थंडी आता कमी झाली असली तरी, ओपीडीत आल्या आल्या एक आणि तासाभरात अजून एक कॉफी घेण्याची सवय मात्र लगेच चिटकली… तशी ‘गरज’ भासत नसली तरी उगाच चुकल्यासारखं वाटतं आणि निष्कारण ‘कॉफी’ मागवली जाते; शेवटी कॅफीन म्हणजे उत्तेजकच ते… हळूहळू टॅपर केलं की, जाईल सवय!

    कॅफिन म्हटलं की, अनेकदा मला क्लिव्हलँड आणि तिथले डॉ. क्राईल आठवतात…

    गोष्ट आहे क्लिव्हलॅंडच्या हिवाळ्यातल्या अशाच एका थंडगार अंधाऱ्या रात्रीची… संपूर्ण शहर रजईत दडपून झोपलं होतं, परंतु इथल्या एका हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरच्या एका माणसाची झोप मात्र उडाली होती… डॉ. जॉर्ज क्राईल… पेशानं शल्यचिकित्सक आणि पेशीनं संशोधक!

    त्यांच्या डोळ्यांत झोप बिल्कूलच नव्हती; किंबहुना धगधगत होती एकच जिज्ञासा – “हृदय थांबलं म्हणजे खरंच सगळं संपतं का? की अजूनही काही मिनिटांकरता आयुष्य दाराबाहेर थांबलेलं असतं?”

    क्राईलना विश्वास होता की, ”मृत्यू अंतिम नाही, किमान तत्काळ तर नाहीच… शरीरात थोडी ‘ऊर्जा’ अर्थात ‘जीवाची ठिणगी’ शिल्लक असते, ती पुन्हा पेटवता आली तर?” यासाठी त्यांना हवी होती शरीराला थेट धक्का देणारी एखादी शक्ती… त्यांच्या मते हृदय थांबले तरी, पेशींमध्ये आणखी काही सेकंद- मिनिटे उष्णता असते, मेंदू त्वरित ‘मरत’ नाही, रक्तात अजून सूक्ष्म हालचाल राहते आणि या क्षणीच योग्य कॉकटेल दिलं तर? कदाचित शरीर परत जागं होऊ शकतं!

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    फक्त विचार करून ते थांबले नाही तर त्यांनी थेट कॉकटेल तयारही केलं, ते होतं कॅफीन + अॅड्रेनालिन + उष्णता! यातलं कॅफीन मेंदू, हृदय आणि स्नायूंना उत्तेजित करणारं रसायन, अॅड्रेनालिन हृदयाला धक्का देत रक्तदाब वाढवणारं संप्रेरक तर, उष्णता पेशींना पुन्हा जिवंत करण्यासाठी आवश्यक ऊर्जा…

    क्लिव्हलँड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक मृतदेह आणला गेला. त्याचं हृदय थांबलं होतं, पण अतिदक्षता विभागात सज्ज असते, अशी डॉ. क्राईलची टीम सज्ज होती. त्या काळात ‘Cardiopulmonary Resuscitation’ अर्थात CPR हे तंत्र अस्तित्वातच नव्हतं आणि फक्त प्रयोग, धाडस आणि शास्त्रीय कल्पकता होती… क्राईलनं आपल्या टीमला आदेश दिला, एकSS शरीराचं तापमान वाढवा… बॉडीभोवती गरम पाण्यात भिजवलेलं ब्लँकेट गुंडाळलं गेलं, गरम हवेचा मारा करणारे पंखे लावले गेले.

    दोनSS ”कॅफीन आणि अॅड्रेनालिन मिसळा…” एक विलक्षण मिश्रण तयार होत होतं, ज्याला क्राईलनं नाव दिलं होतं – ‘लाइफ कॉकटेल’!

    तीनSS “छातीमध्ये इंजेक्शन द्या…”

    सुई छातीच्या दोन बरगड्यांतील मऊ भागात घुसली आणि औषध थेट हृदयाजवळ पोहोचलं…

    औषध गेल्यानंतर काही सेकंद हॉस्पिटलमध्ये भयानक शांतता पसरली… क्राईल स्वत: प्रत्येक सेकंद मोजत होते… 5 सेकंद… 8 सेकंद… 10 सेकंद… आणि अचानक छातीखालचे स्नायू हलले… बोटांमध्ये कंपनं दिसली आणि एक क्षीण कण्हण्याचा आवाज ऐकू आला…

    क्राईल ओरडले, ”वी हॅव मोमेंटSS”

    एका मृत शरीरात पुन्हा हालचाल दिसली होती, हृदयाच्या स्नायूंनी क्षणभर जिवंतपणा दाखवला, पण हे पूर्ण पुनर्जीवन नव्हतं, पण मृत्यूला दिलेली एक कडक चपराक मात्र नक्कीच होती!

    क्राईलच्या प्रयोगातून हृदय ‘पूर्णपणे पुन्हा सुरू’ झालेले नव्हते, परंतु पेशींची हालचाल झाली होती… हृदयाच्या स्नायूंचा प्रतिसाद मिळाला होता, पुसट का होईना आवाज आला होता… हे सगळं सिद्ध करत होतं की, मृत्यू देखील एक प्रक्रिया आहे आणि ती ‘तत्काळ’ होत नाही…

    दुसरीकडे, यावरून कॉलेजेस्, चर्च आणि पत्रकार यांच्यात मोठा वाद निर्माण झाला…

    “मृतांना परत जागं करण्याचा प्रयत्न म्हणजे देवाच्या कामात हस्तक्षेप आहे!”

    “छेऽऽ हा तर विज्ञानाचा विजय…”

    “नाही नाही, हा नैतिकतेचा पराभव?”

    …..

    पण इकडं मात्र डॉ. क्राईल ठाम होते, ”मी मृत्यू चोरू पाहत नाही, मी फक्त जीवनाला आणखी एक संधी देतोय.”

    क्राईलच्या धाडसी प्रयोगातूनच पुढं CPR-Defibrillation या तंत्राचा वैज्ञानिक पाया रचला गेला. Chemical Resuscitation ची संकल्पना उदयास आली… औपचारिक मृत्यूनंतरही काही मिनिटं वैद्यकीय हस्तक्षेप होऊ लागला… ‘गोल्डन अवर’ ही मृत्यू आणि जीवन यांच्यामधली शास्त्रीय खिडकी किलकिली झाली.

    हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!

    डॉक्टर जॉर्ज क्राईल यांच्या या प्रयोगानं मृतदेहाच्या दिशेनं एक हात पुढं केला गेला आणि मृत्यूनं त्या हाताला नाकारलं नाही… निदान काही क्षण तरी!

    आज जेव्हा कुणी थंड पडलेल्या देहास CPR  किंवा ॲड्रेनालिनचं इंजेक्शन देतो, तेव्हा तो तीच ‘जीवनाची ठिणगी’ पेटवण्याचा प्रयत्न करत असतो, जो क्राईलनं केला होता!

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn