Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»मैत्रीण»स्वेटर… जुन्या विणी गेल्या विस्मरणात!
    मैत्रीण

    स्वेटर… जुन्या विणी गेल्या विस्मरणात!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 6, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, स्वेटरची वीण, आयुष्याची वीण, संसाराची वीण, शिंपल्यांची वीण, संसार विणेचे पीळ, बायकांच्या मनाचा थांग, बायकांचे स्वप्नरंजन,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    पूर्वी बायका फावल्या वेळात स्वेटर विणत असत. विविध रंगी स्वेटरचे विणकाम करता करता एकमेकींना आपल्या सुखदुःखाच्या गुजगोष्टी सांगत. त्यांना नेहमी हेच शिकवलं गेले होतं की, बाईने नेहमी एक टाका सुलट आणि एक टाका उलट, असं करत संसाराची वीण तयार करायची असते. हे करताना तुझा संयम तुझ्या कामास येईल आणि तुझे आयुष्य सुखी होईल. मग त्या स्त्रिया आयुष्यभर तो नियम लक्षात ठेवून आपल्या आयुष्यातील संसार विणेचे पीळ अजून घट्ट विणत असत. निरनिराळ्या नात्यांची ही सुंदर वीण गुंफत असताना त्या आपले स्वतःचे अस्तित्व विसरून जात. आपल्या म्हटल्या जाणाऱ्या कुटुंबाकरिता स्वतःची सर्व क्षमता त्या पणाला लावत असत आणि त्यातून जर वेळ मिळाला तर, आपल्या आवडीचे स्वेटर विणण्यासारखे छंद जोपासत असत. त्या घरातील आपल्या माणसांकरिता स्वेटरवर नवनवीन वीण टाकताना या बायका रंगीबेरंगी लोकरींचे धागे एकमेकांत गुंतवून आपल्या मनातील विचार विणीच्या स्वरूपात गुंफत असत.

    हेही वाचा – स्त्री… एक आई आणि मुलगी

    स्वेटर विणताना त्या शिंपल्याच्या विणीमध्ये आपली स्वप्नं डोळ्यांसमोर ठेवून एकेक स्वप्न त्या शिंपल्यांमध्ये बंद करत असत तर, कधी फुलांफुलांचे डिझाईन टाकल्याने त्या स्वेटरमध्ये त्यांना आपला हरवलेला सुगंध गवसत असे. उलट सुलट टाक्यांनी आपल्या जीवलगांकरिता स्वेटर विणताना त्याच्या रंगीत धाग्यांमध्ये त्या बायका आपल्या जीवनाची रंगसंगती शोधत असतील नाही का? मनातील भावभावना त्यांना शब्दांत मांडता येत नसाव्यात कदाचित! निमुटपणे सगळं सहन करण्याची अमर्याद शक्ती त्यांच्या ठायी असल्यानेच “एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे” असं मनाशीच म्हणत ते स्वप्न विणीच्या रूपात स्वेटरवर उतरवत असतील.

    मनस्वी असलेल्या या बायकांच्या अगणित स्वप्नांच्या अनेक विणी त्या बायका स्वेटरवर उतरवत असताना देखील चौकटीच्या बाहेर त्यांची वीण जात नसे, त्यांनी त्यांच्या इच्छा आकाक्षांची, स्वप्नांची त्या लोकरीच्या रंगीबेरंगी धाग्यांमध्ये गुंफण करताना चुकूनही किनारीवरच्या मर्यादेची चौकट कधी सोडली नाही. त्या स्वप्नांची पूर्तता कधी झाली तर, कधी अधुरीच राहिली… परंतु ते स्वप्न मनात जगत असताना नाउमेद न होता त्या बायका प्रत्यक्ष जीवनात मर्यादित चौकटीत राहून कालक्रमण करत राहिल्यात. त्यांच्या स्वेटरचे ते रंग कधी उषःकालाच्या सूर्योदयासारखे प्रसन्न, उत्साही होते, तर कधी मावळीतीच्या सूर्यास्तासारखे शांत, रमणीय संध्याछायेसारखे होते… कधी उगवतीच्या शुक्र ताऱ्यासारखे मोहक होते तर, कधी पौर्णिमेच्या चंद्रासारखे  शीतल होते… कधी अवखळ खळखळून वाहणाऱ्या निर्झरासारखे होते तर, कधी एखाद्या नदीच्या अथांग डोहासारखे गूढ होते… बायकांच्या मनाचा थांग लागत नाही म्हणतात!

    हेही वाचा – दहा पैशाला एक ‘सिंगल’!

    स्वप्नरंजन करत काम करणे हा जणू त्या बायकांचा छंदच होता. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मर्यादित क्षेत्रात राहून स्वतःची मानसिकता न बदलता त्यांनी स्वतःला खोट्या स्वप्नांच्या जगात रममाण करुन घेतलं असावं. काळ बदलला, परिस्थितीही बदलली, परंतु कायम स्वप्नरंजन करत असलेल्या या बायका आताशा फावल्या वेळात स्वेटर विणत नाहीत की, एकमेकींशी हितगुजही करत नाहीत; कारण त्यांनीच विणलेल्या जुन्या विणी त्यांच्या विस्मरणात गेल्या आहेत.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026 मैत्रीण

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026 मैत्रीण

    जागतिक महिला दिन विशेष… तिचे असणे, तिचे नसणे!

    March 8, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    रेवती निलेश पांडे पंचवीस-एक वर्षांपूर्वी जवळपास सगळ्यांच्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या नातेवाईकांकडे जायच्या. काका, मामा, मावशी यांच्याकडे…

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    March 10, 2026

    जागतिक महिला दिन विशेष… तिचे असणे, तिचे नसणे!

    March 8, 2026

    ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!

    March 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn