Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»संवेदनशील हत्ती अन् इंग्रजी साहित्य…
    ललित

    संवेदनशील हत्ती अन् इंग्रजी साहित्य…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 6, 2025Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, हत्तींचा कळप, शीघ्रकोपी हत्ती, हत्ती माणसाळवणे, माणसाळलेले हत्ती, कोपीष्ट हत्ती, हत्ती माहूत, माहूतांचे बळी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    यश:श्री

    ‘ज्युरासिक पार्क’ चित्रपटाच्या निमित्ताने डायनॉसॉर हा अजस्र प्राण्याची कल्पना सर्वांना आली. पण अजस्र प्राण्याबद्दल कुतूहल हे कायम असते. आजघडीला हत्ती हा भूतलावरील अजस्त्र प्राणी आहे. असे म्हटले जाते की, हत्ती हा प्राणी मूळचा आफ्रिकेतला आहे. नंतर तो इतरत्र आढळला. म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि अॅन्टार्टिकाच्या निर्जन भागातही ते होते. पण नंतरनंतर इतर ठिकाणचे हत्ती नष्ट होऊन केवळ आफ्रिका आणि आशियामध्ये हत्ती अद्याप उरले आहेत. मोहेंजदडोच्या काळातील कलाकुसरींवर हत्तींचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. यावरून किती प्राचीन काळापासून हत्तीचे वास्तव्य होते, हे सिद्ध होते. तसेच, सांची येथील प्रसिद्ध स्तुपामध्येही हत्तींची विविध चित्रे आहेत आणि या चित्रांवरून त्या काळच्या कलाकारांची कुशलताही आपल्या लक्षात येते.

    कोल्हापूर येथे सापडलेले एक तांब्याचे शिल्प सातवाहन काळातील अत्यंत दुर्मीळ असे शिल्प आहे. एका बसलेल्या हत्तीवर चार जण स्वार झाले आहेत, असे त्यात दाखविले आहे. हे शिल्प केवळ दोन इंच उंचीची असून हत्तीच्या सोंडेवरील सुरकुत्या, त्याच्या पाठीवरील झूल तसेच वास्तवपणा आणण्यासाठी कोरलेले बारकावे पाहून ही मूर्ती घडविणाऱ्याची कुशलता तसेच बारीक निरीक्षणाचा आपल्याला अंदाज येतो. याशिवाय, अशा प्रकारे बारकाव्यांसह तयार केलेले ‘मिनीएचर’ कार्ला येथील चैत्य गुंफेत आहेत.

    एवढा अजस्त्र प्राणी असला तरी, तो खूप लवकर माणसाळत असल्याचे पाहिले आहे. विशेषत:, दक्षिण भारतात हत्तींना पकडून माणसाळले जाते. सम्राट अकबराच्या काळात, ‘लोहलंगर’ म्हणजे मोठ्या साखळीने हत्तीचा उजवा पाय बांधला जात असे. त्या साखळीचे दुसरे टोक एका जाड ओंडक्याला बांधण्यात येत असे. जेणेकरून हत्ती जेव्हा नियंत्रणातून सुटला तर, तो ओंडका पाहून सदर हत्तीची चाल मंद करू शकता येईल. तसेच, आपापसात लढणाऱ्या दोन हत्तींना वेगळे करावयाचे असेल, तर त्यांच्यामध्ये मशाल नेऊन त्यांना बाजूला केले जाई. त्याकाळी या मशालीला ‘चरखी’ म्हणत.

    हेही वाचा – हत्ती आणि युद्ध…

    मूळात हत्ती हा तसा संवदेनशील प्राणी आहे, असे निरीक्षण अनेकांनी नोंदवले आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी ‘हत्ती’ या प्राण्याबद्दल खूप लिहिले आहे. त्यांनी इंग्रजी साहित्याचा हवाला देत हत्तीच्या या संवेदनशीलतेची माहिती दिली आहे. ‘दि सोशल कॉन्ट्रॅक्ट’ मधील (लंडन 1970) ‘एक्सपिरीयन्स ऑफ ईव्हॅन बस’मध्ये (पान क्र. 18 ते 20) रॉबर्ट अरड्रे यांनी म्हटले आहे की, आफ्रिकेमध्ये एका हत्तिणीला इंजेक्शन दिले असता ती लगेच खाली पडली आणि तासभरातच ती मरण पावली. दुसऱ्या एका म्हाताऱ्या मादी हत्तीने त्या प्रेतावर झाडाच्या फांद्या आणि गवत टाकून ते झाकून ठेवले.

    तर, ‘दि डिअर अॅण्ड दि टायगर’ पुस्तकात जॉर्ज स्कबलर यांनी भारतातील हत्तींचे वर्णन केले आहे. वाघाने मारलेल्या म्हशीचे मांस वाघीण आणि छावे खात होते. मांस खाऊन झाल्यानंतर छावे आणि वाघीण परतले. एक छावा मात्र मांस खात होता. तितक्यात तिथे एक हत्ती आला. त्याला पाहून छावा घाबरला आणि पळाला. नंतर त्या हत्तीने ते प्रेत फांद्यांनी झाकून ठेवले.

    जॉर्ज एडर्सनची पत्नी एलसा हिने आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, आपल्या गावी जाण्यासाठी निघालेली एक महिला खूप चालल्यामुळे थकली आणि रस्त्याच्या कडेला कोलमडून पडली. ती जागी झाली तेव्हा ती खूप घाबरली. कारण, तिच्या सभोवताली हत्ती होते आणि आपल्या सोंडेने तिला हळूवारपणे स्पर्श करीत होते. तेव्हा ती स्तब्ध राहिली. नंतर त्या हत्तींनी तिला फांद्यांनी झाकले.

    दुसऱ्या ठिकाणी असे वर्णन आहे की, फळ झाडांच्या शोधात असलेला एक हत्ती एका बाईच्या गुलाबाच्या बागेत शिरला आणि त्याने बागेचे नुकसान केले. म्हणून तिने तक्रार केली असता अॅडरसनने त्या हत्तीला गोळी घालून ठार मारले. स्थानिक लोकांनी मग त्या हत्तीचे मांस नेले आणि उरलेले अवशेष एका ट्रकमध्ये भरून शहरापासून काही मैलावर नेऊन टाकले. नंतर तेथील लोकांनी ती जागाही साफ केली. परंतु काही दिवसांनी त्या गुलाबाच्या बागेत मेलेल्या हत्तीच्या खांद्याचे हाड घेऊन काही हत्ती तिथे आले आणि ज्या ठिकाणी त्याला मारले, त्या जागेवर ते हाड त्यांनी ठेवले…

    हेही वाचा – राजवैभवी मोर… तख्त-ए-ताऊस

    याच पुस्तकातील एलसा म्हणते… एखादा जाडजूड, भलामोठा, अजिंक्य हत्ती लिंपोपो नदीजवळील (दक्षिण आफ्रिका) झाडे तोडताना आपण पाहिला असेल. ज्या नासधुसीमुळे त्याला थोडावेळ किंवा कायमस्वरुपाचा आनंद मिळत असेल. परंतु आपणाला गाय, गोरीला मादी किंवा हत्तीण अशा तऱ्हेने मोडतोड करीत स्वतः किंवा आपल्या मुलासह फिरताना दिसणार नाही.

    अशा संवेदनशील प्राण्यांना घेऊन विविध भाषांमध्ये चित्रपटही झाले आणि ते लोकांना भावले देखील. त्यातही हत्तीचा संवेदनशीलपणाच पाहायला मिळतो. केवळ तो जेव्हा चवताळतो तेव्हा, तो आवरणं मोठ्या जिकरीचं असतं.

    क्रमश:

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn