Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी
    शैक्षणिक

    विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 8, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, School admission, शाळा प्रवेश, मुख्याध्यापिका जबाबदारी, शिक्षिका जबाबदारी, शाळा सेविका, सेविकेची जबाबदारी, Principal responsibility, teacher responsibility, school sevika, sevika responsibility
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रश्मी परांजपे

    मागील चार लेखांच्या माध्यमातून आपण शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी या व्यापक विषयासंबंधीत काही निवडक मुद्द्यांवर सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी या महत्त्वाच्या विषयाची प्रथम थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. पालकांप्रमाणे शाळेने देखील मुलांच्या प्रती असलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास मुलांची शैक्षणिक प्रगती तसेच सर्वांगीण विकास निश्चितच सुकर होणार आहे.

    शैक्षणिक क्षेत्रात बहुतांश संस्था पूर्व-प्राथमिक शाळा, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा असे शैक्षणिक उपक्रम राबवित असतात. (केवळ पूर्व-प्राथमिक शालेय उपक्रम राबविणाऱ्या संस्था असतात, पण त्यांचे प्रमाण तुलनेने कमीच आहे.) शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ, संस्थेशी निगडीत शाळेच्या विविध समितींच्या सहाय्याने संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडत असते. पूर्व-प्राथमिक शाळेच्या समितीत संस्थेच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापिका आणि शिक्षिक यांचा समावेश असतो.

    संस्थेचे कार्यकारी मंडळ शाळेच्या दैनंदिन कामात नेहमीच सक्रिय नसते, परंतु शालेय समितीच्या कामकाजावर लक्ष ठेवून असते. पूर्व-प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका इतर शिक्षिकांच्या मदतीने दैनंदिन कामकाज व्यवस्थितरीत्या चालविण्यास जबाबदार असतात. संस्थेच्या कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली, नियमावलीनुसार आणि आखून दिलेल्या परिघात राहून मुख्याध्यापिका जबाबदाऱ्या पार पाडत असतात. यासाठी त्यांना शाळेतील शिक्षिका आणि सेविका मदत करत असतात.

    प्रवेश प्रक्रियेतील मुख्याध्यापिकेची जबाबदारी

    • मुलांच्या पालकांना शालेय प्रवेशाबाबत संपूर्ण माहिती सविस्तरपणे द्यावी.
    • मुलांच्या प्रवेशासाठी आलेल्या पालकांना तीच तीच माहिती देत असताना, अजिबात कंटाळा करू नये आणि संयम ठेवून अगदी शांत राहून पालकांशी संवाद साधावा.
    • पालकांच्या शंकांचे व्यवस्थित निरसन करून त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करावे.
    • कधी कधी काही पालक प्रवेशाची वेळ संपल्यावर येऊ शकतात. अशा वेळेस न रागावता त्यांची अडचण समजून घ्यावी आणि त्यांना मार्गदर्शन करावे. असे केल्यास पालक खूश होऊन त्यांचे शाळेबद्दल मत सकारात्मक होते.
    • शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या तसेच सर्वच दृष्टिकोनातून विचार केल्यास अधिकाधिक प्रवेश देणे हितकारक असल्याने मुख्याध्यापिकेने प्रवेशाची जबाबदारी अगदी चोख बजावावी.

    शिक्षिकेची प्राथमिक जबाबदारी

    मुलांशी अत्यंत मृदू भाषेत बोलणे तसेच त्यांच्याशी वागताना चेहरा नेहमी प्रसन्न आणि हसरा ठेवणे, ही शिक्षिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. यामुळे मुलं शाळेत लवकर रमतात. मुलांना शिक्षिका आपल्या आईसारख्या वाटायला लागतात आणि मुले अशा शिक्षकांना कधीच विसरत नाहीत. (हे मी स्वानुभवाने सांगत आहे.)

    सेविकेची स्वच्छतेची जबाबदारी

    सेविकेचे काम मुख्यतः मुलांच्या स्वच्छतेशी निगडित असते. अशा कामाचा सेविकेने किळस वाटू न देता मनापासून स्वीकार करावा. किंबहुना, सेविकेची निवड करताना मुख्याध्यापिकेने ही बाब आवर्जून लक्षात ठेवावी.

    विद्यार्थी केंद्रस्थानी

    मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सेविका, या तिघींनी मनाशी कायमची खुणगाठ बांधावी की, विद्यार्थी हा शाळेच्या केंद्रस्थानी असतो. या तिघींनी ही मूलभूत बाब लक्षात ठेवून शाळेच्या कामकाजाशी संबंधित विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्यात. अशा विचारधारेवर चाललेली शाळा हमखास नावारूपास येते.

    शाळेच्या आणि घरच्या जबाबदारींमध्ये समतोल

    तिघींनी एक गोष्ट कटाक्षाने पाळावी ती अशी की, आपल्या वैयक्तिक चिंता आणि काळज्या शाळेबाहेर ठेवूनच शाळेत प्रसन्न चित्ताने यावे. तद्वतच शाळेतील कामात येणारे ताणतणाव घरी नेऊ नयेत. थोडक्यात, तिघींनी घर आणि शाळा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवाव्यात. सर्वार्थाने असे करणे नितांत गरजेचे आहे. हे सुरुवातीला जरा अवघड वाटू शकेल परंतु प्रयत्नांती सहजशक्य होईल.

    हेही वाचा – पालकांची जबाबदारी : नीटनिटकेपणा अन् स्पर्धेसाठी प्रोत्साहन

    या तिघींनी आणखीन एक बाब लक्षात ठेवावी. आपली मुलं ज्या शाळेत जातात, तेथील शिक्षिका आणि सेविका यांनी आपल्याशी पालक म्हणून कसे वागावे, अशी आपली अपेक्षा असते, तसेच आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी वागावे.

    या पुढील लेखांमधे या विषयावरील एका मागोमाग एक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्याचा माझा मानस आहे.

    क्रमश:

    (लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)

    मोबाईल – 9881943593

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn