Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : मुलांची सुरक्षितता
    शैक्षणिक

    प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : मुलांची सुरक्षितता

    रश्मी परांजपेBy रश्मी परांजपेOctober 13, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, School admission, शाळा प्रवेश, Post-admission, School Responsibility, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, सुरक्षारक्षक, विद्यार्थ्यांची काळजी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    ‘प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी’ या मालिकेतील मागील लेखात आपण विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेतील तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेशी संबंधित काही महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी विद्यार्थ्यांची सुरक्षितता’ याविषयी माहिती खालील मुद्द्यांच्या माध्यमातून घेणार आहोत.

    • शाळेचे प्रवेशद्वार भक्कम तसेच टिकावू असावे. त्याचा कडी-कोयंडा सुस्थितीत असावा.
    • शाळा भरल्यावर सुरक्षिततेच्या दृष्टिने प्रवेशद्वाराला कुलुप घालावे, जेणेकरून शाळेत बाहेरून कोणी आत प्रवेश करणार नाही, तसेच कोणीही विद्यार्थी शाळा सुरू असताना बाहेर जाऊ शकणार नाही.
    • वर्गातील दिवा, पंखा यांची बटणे मुलांच्या सहजी हाताला लागणार नाहीत, अशा उंचीवर असावीत. मुलांना बटनांशी खेळायला आवडते, म्हणून ही काळजी घेणे आवश्यक आहे.
    • डब्याच्या पिशव्या ठेवण्यासाठी वर्गात भिंतींवर खिळ्यांची सोय केली असल्यास खिळे मुलांच्या उंचीपेक्षा अधिक वर असावेत. मुलं वर्गात पळापळ करतात, दंगामस्तीत काही वेळा ढकला-ढकली करतात. अशा वेळी मुलांना इजा होऊ नये, म्हणून ही काळजी अवश्य घ्यावी.

    हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा तसेच मुलांची स्वच्छता

    • वर्गात टोकदार वस्तू, उदाहरणार्थ कात्री, स्क्रू-ड्रायव्हर इत्यादी मुलांच्या हाताला येणार नाहीत, याची काळजी जरूर घ्यावी.
    • मुलांना खडू तोंडात घालण्याची तसेच डस्टरशी खेळताना एकमेकांना इजा करण्याची शक्यता असते, म्हणून खडू आणि डस्टर मुलांच्या हाताला येणार नाहीत, ही काळजी घेणे गरजेचे आहे.
    • पाटीवर लिहिण्यासाठी वापरायच्या पेन्सिली लांब असाव्यात, कारण मुलं पेन्सिलीचे छोटे तुकडे नाकात घालण्याची दाट शक्यता असते.
    • बालशाळेत डबा खाणे, हा अभ्यासाचा एक भाग असतो. डबा खाल्ल्यावर सेविका वर्गाची स्वच्छता करतात, त्यावेळेस शिक्षिकेने मुलांबरोबर वर्गाबाहेर थांबून मुलं दंगामस्ती करणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. हे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे.
    • मुलांना शी-शूसाठी नेताना मुले ढकला-ढकली करणार नाहीत, याबाबत सेविकेने / शिक्षिकेने दक्षता घ्यावी.
    • स्वच्छतागृहात मुलं पाय घसरून पडणार नाहीत, याबाबत योग्य खबरदारी घ्यावी.
    • शाळेत मुलांसाठी पटांगण असल्यास काही मुद्द्यांकडे विशेष लक्ष द्यावे. जसे – मुलांची खेळणी सुस्थितीत असणे, त्यांचे स्टॅन्ड भक्कम असावेत, घसरगुंडीची उंची योग्य असावी, पटांगणावर मुलांच्या पायाला काही टोकदार लागून दुखापत होणार नाही… इत्यादी.
    • मुलांसाठी ने-आण करण्याच्या बस / वाहन यात महिला मदतनीस / सुरक्षारक्षक असणे नितांत आवश्यक आहे.

    हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रकातील मुद्दे

    विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांच्या स्वच्छतेबरोबर सुरक्षितता देखील अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सेविका, शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका या सर्वांचीच असते आणि म्हणूनच सर्वांनी कायमच अतिशय दक्ष व जागरूक राहणे आवश्यक आहे.

    क्रमश:

    Author

    • रश्मी परांजपे
      रश्मी परांजपे
    रश्मी परांजपे

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn