Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!
    फूड काॅर्नर

    Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 18, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, तुपातील तुरीचे दाणे, वाणीचा हुरडा, कोवळ्या ज्वारीचा हुरडा, हिवाळा स्पेशल, विदर्भ स्पेशल, तुरीचे दाणे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    हिवाळा सुरू झाल्यावर हिरव्यागार आणि ताज्या भाज्या यायला सुरुवात झाली की, घराघरातील गृहिणींना या भाज्यांपासून किती पदार्थ करावे आणि किती नको असे होऊन जात. याच सीझनमधे तुरीच्या शेंगा, पोपटीच्या शेंगा, हुरडा, हरभरा असे कितीतरी फ्रेश प्रकार उपलब्ध असतात. हे पदार्थ असे आहेत की, जेवताना तोंडी लावणे म्हणून खा किंवा दुपारच्या वेळेस खा… कसेही आणि कोणत्याही वेळेस खाल्ले तरी चालतात. अशा पदार्थांचे सेवन करण्याची कोणतीही एक ठराविक वेळ नसते. तुरीचे तुपाच्या फोडणीतील दाणे आणि वाणीचा हुरडा (ज्वारीचे कोवळे, हिरवे दाणे) थंडीच्या दिवसांत दुपारी चहा न घेता एखादी मुव्ही किंवा सीरियल पहाताना टाइमपास म्हणून खाणे छान वाटते. तुरीचे तुपातील दाणे आणि त्यात असलेला ओल्या लसणाचा स्वाद गजब लागतो.

    तुपाच्या फोडणीतील तुरीचे दाणे

    साहित्य

    • तुरीचे ओले दाणे – 2 वाट्या
    • तूप – 2 मोठे चमचे
    • ओल्या लसणाची बारीक चिरलेली पात – 1 वाटी
    • ओल्या लसणाचे बारीक चॅाप केलेले तुकडे – 4 ते 5
    • हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट – 2 चमचे
    • आल्याची पेस्ट – 1 चमचा
    • जिरे – 1 चमचा
    • धणे पावडर – 1 चमचा
    • गरम मसाला – 1 चमचा
    • हळद – 1 चमचा
    • हिंग – 1 छोटा चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार
    • लिंबू – 1
    • थोडी कोथिंबीर

    हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मुगाचे सूप (कढण)

    कृती

    1. कुकरमध्ये तूरीचे दाणे थोडे मीठ टाकून एक शिट्टी टाकून वाफवून घ्यावे.
    2. कुकरचे प्रेशर गेल्यावर तुरीचे दाणे चाळणीवर काढून ठेवावे म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाईल.
    3. नंतर एका कढईत दोन चमचे तूप तापवून घ्यावे. ते तापले की, त्यामध्ये एक छोटा चमचा हिंग टाकून जिरे टाकावे.
    4. जिरे तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चॉप केलेले ओल्या लसणाचे तुकडे टाकून ते गुलाबीसर होऊ द्यावेत.
    5. लसूण गुलाबीसर झाला की, त्यात कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून ती परतून घ्यावी.
    6. नंतर त्यात आल्याची पेस्ट टाकून हे मिश्रण पुन्हा परतून घ्यावे.
    7. ते झाल्यावर यामध्ये एक चमचा हळद टाकून वाफवलेले तुरीचे दाणे टाकावे.
    8. नंतर त्यात एक चमचा गरम मसाला, धणे पावडर, चवीनुसार मीठ आणि साखर टाकून हलक्या हाताने सर्व पदार्थ मिक्स करावेत.
    9. हे सर्व झाले की, या दाण्यांवर बारीक चिरलेली ओल्या लसणाची पात भुरभरुन टाकावी व परत एकदा सर्व साहित्य छान मिसळून घ्यावे.
    10. त्यानंतर लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून हे तुरीचे दाणे सर्व्ह करावे आणि या तूपातील गरमागरम तूरीच्या दाण्यांचा आस्वाद घ्यावा.

    वाणीचा हुरडा

    साहित्य

    • वाणीचा हुरडा – 2 वाट्या
    • हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट – 1 चमचा
    • हुरडा परतण्यापुरते तेल
    • जिरे – 1 चमचे
    • मीठ – चवीनुसार
    • भाजलेले तीळ – 4 चमचे

    हेही वाचा – Recipe :  अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी

    कृती

    1. कढईत गरजेनुसार तेल टाकून ते तापले की त्यामध्ये जिरे टाकावे.
    2. जिरे तडतडल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट घालून ती थोडी परतावी.
    3. त्यानंतर लगेचच हुरडा टाकून हे मिश्रण मंद गॅसवर खालीवर करत हळूवारपणे परतत, हुरडा भाजून घ्यावा.
    4. हुरडा थोडा वाफवला गेला की गॅस बंद करुन त्यामध्ये भाजलेले तिळ टाकावे आणि चवीनुसार मीठ टाकावे.
    5. लिंबू पिळून कोवळा आणि भाजलेला हुरडा चवीने खात फस्त करावा.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn