Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : सांबार वडी अर्थात पुडाची वडी!
    फूड काॅर्नर

    Recipe : सांबार वडी अर्थात पुडाची वडी!

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 10, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, नागपूर स्पेशल, नागपूर विशेष, विदर्भ स्पेशल, कोथिंबीर वडी, सांबार वडी, पुडाची वडी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    विदर्भातील विशेषतः नागपूरातील सांबार वडी किंवा पुडाची वडी प्रसिद्ध आहे. विदर्भात कोथिंबीरीला ‘सांबार’ म्हणतात, म्हणून या वडीला ‘सांबार वडी’ असे नाव पडले आहे. नागपूरातील महाल, इतवारी या भागात या पुडाच्या वडीसोबत कढी देतात, असं ऐकलं आहे. या वडीसारखाच ‘पाटोडी’ नावाचा प्रकार अमरावती, नागपूर, वर्धा या भागात मिळतो, परंतु यामध्ये दाण्याचे कुट जास्त प्रमाणात वापरतात आणि कोथिंबिरीचे प्रमाण कमी असते. तरीही काही लोक त्यालाच सांबार वडी म्हणतात, याचे सारण थोडे बाकरवडीसारखे असते. खसखस, खोबऱ्याचे प्रमाणही कमी असते. चवीकरिता चिंच गुळाचे पाणी किंवा आमचुर पावडर आणि साखर वापरल्यामुळे ही पाटोडी चवीला आंबटगोड लागते. परंतु खरी सांबार वडी तीच की ज्यामध्या कोथिंबीर, खसखस आणि खोबऱ्याचे प्रमाण बरोबरीने वापरून ती वडी पुडक्याच्या आकारात केली जाते, आणि त्यामुळेच तिला ‘पुडाची वडी’, ‘सांबार वडी’ किंवा ‘कोथिंबीर वडी’ असे म्हटले जाते. अशा या पुडाच्या वडीची कृती खाली दिलेली आहे. करून पाहा आणि आवडल्यास मला अभिप्राय द्यायला विसरू नका!

    साहित्य

    • कोथिंबीर – 1 मोठी जुडी
    • खोबरे – 1 वाटी किसलेले
    • तीळ आणि दाण्याचे कुट – अर्धी वाटी
    • खसखस – अर्धी वाटी
    • आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
    • कांदे – 2 मध्यम आकाराचे
    • बेसन – तीन वाट्या
    • तांदळाचे पीठ – एक वाटी
    • मीठ – चवीनुसार
    • साखर – चवीनुसार
    • लिंबु – 1
    • दही – 1 वाटी
    • हळद – 1 चमचा
    • लाल तिखट – 1 चमचा
    • गोडा मसाला – 1 चमचा
    • मोहरी – 1 लहान चमचा
    • जिरे – 1 लहान चमचा
    • हिंग – 1 लहान चमचा
    • तेल – 3 टेबलस्पून
    • चारोळी – 1 लहान चमचा

    हेही वाचा – Recipe :  विदर्भ स्पेशल… दाणेभात अन् ठेचा

    कृती

    1. कोथिंबीर स्वच्छ धुऊन थोडी सुकवून घ्यावी. नंतर बारीक चिरावी. काड्या कमी वापराव्यात.
    2. कोथिंबीर सुकेपर्यंत कांदा बारीक चिरून त्याची पेस्ट करून घ्यावी.
    3. बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करून दोन टेबल स्पून किंवा छोटी अर्धी पळी तेलाचे मोहन घालून घट्ट गोळा मळून घ्यावा.
    4. प्रथम सुके खोबरे लालसर भाजून घ्यावे.
    5. सारण तयार करताना प्रथम कढईत खसखस टाकून थोड्या तेलावर परतून घ्यावी.
    6. यानंतर कढईत फोडणीसाठी तेल तापवून त्यामध्ये मोहरी, जिरे तडतडल्यावर एक चमचा हिंग टाकावा.
    7. नंतर त्यातच कांद्याची पेस्ट टाकून ती लालसर परतून घ्यावी.
    8. कांदा लालसर आणि कोरडा झाला की, त्यात आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकून तीसुद्धा परतून घ्यावी.
    9. नंतर त्यात चवीनुसार थोडी हळद, तिखट, थोडा गोडा मसाला आणि मीठ टाकावे.
    10. त्यानंतर लगेच तीळ-शेंगदाण्याचे कूट आणि खोबऱ्याचा भाजलेला किस टाकावा.
    11. या कुटात खसखस आणि थोडी चारोळी टाकून चवीपुरता साखर टाकावी.
    12. हे सारण थोडे थंड झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सगळे घटक एकजीव करून घ्यावे. त्यानंतर वरून लिंबु पिळावे
    13. एक चमचा गरम मसाला आणि मीठ टाकून दही फेटून घ्यावे.
    14. आता बेसन आणि तांदूळ पिठाचा गोळा घेऊन त्याची पोळी लाटावी आणि त्यावर मसाला घातलेले दही एका छोट्या चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यावे.
    15. त्यावर मध्यभागी कोथिंबिरीचे सारण भरावे.
    16. त्यानंतर पोळीचे दोन्ही भाग दुमडून घ्यावे आणि दोन्ही बाजुच्या कडांनी आवरण बंद करावे.
    17. तेल गरम करून या वड्या खरपूस तळून घ्याव्या.
    18. आवडीनुसार त्रिकोणी किंवा चौकोनी तुकडे करून पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करावे.

    एकूण वेळ – साधारणपणे 45 मिनिटे

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!

    टीप

    • दही आणि मसाल्याचे मिश्रण सांबार वडीच्या पोळीला लावण्याऐवजी तेलामध्ये गरम मसाला टाकून ते पोळीला लावावे. त्यानंतर कोथिंबीरीचे सारण पसरवावे.
    • ही वडी खाताना खसखस आणि खोबऱ्याचा स्वाद खूप छान लागतो. त्यामुळे खसखस आणि खोबरे थोडे जास्त झाले तरी काही हरकत नाही.
    • आवडत असल्यास चारोळीसह काजू तुकडा देखील वापरू शकता.
    • पुडाची वडी, श्रीखंड किंवा गाजराचा हलवा यांची जादू आजमवायची असेल तर या त्रिकुटाची भट्टी एकदा तरी जमवून बघा!

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn