माधवी जोशी माहुलकर
साहित्य
- मोड आलेले मेथीदाणे – एक वाटी
- लाल तिखट – एक चमचा
- हळद – एक चमचा
- बडीशेप – एक चमचा
- मोहरीची डाळ – चार मोठे चमचे
- जिरे – दोन चमचे
- धणे – दोन चमचे
- मिरी – तीन ते चार
- लवंग – दोन ते तीन
- मीठ – चवीनुसार
- हिंग – एक लहान चमचा
- गूळ – चवीपुरता
- एका लिंबाचा रस
- तेल – अर्धी पळी (फोडणीकरिता)
हेही वाचा – Recipe : मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण
कृती
- रात्रभर मेथीदाणे भिजत घालून दुसऱ्या दिवशी ते उपसून पाणी काढून घ्यावे आणि एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून बंद डब्यात ठेवावे.
- दोन दिवसांनी त्यांना छान मोड येतात. मेथीला मोड यायला वेळ लागतो.
- लोणचे करताना प्रथम मसाला तयार करावा.
- मोहरी डाळ कढईत मंद आचेवर थोडी भाजून घ्यावी.
- त्याचप्रमाणे धणे, बडीशेप, जिरे हेदेखील मंद आचेवर भाजून घ्यावे. मीठसुद्धा भाजावे म्हणजे त्यामधील ओलसरपणा कमी होतो आणि लोणच्याला बुरशी येत नाही.
- हा मसाला थंड झाला की, यामध्ये एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून मिक्सरवर भरडून घ्यावे. खूप बारीक करू नये.
- कढईत तेल तापवून त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी, जिरे टाकावे आणि ते तडतडल्यावर त्यात एक चमचा हिंग, मिरी, लवंग, थोडी हळद, तिखट आणि मसाला बारीक न केलेला मसाला टाकावा.
- हे मिश्रण थंड व्हायला ठेवावे.
- नंतर एका पसरट बाऊलमध्ये वाटीभर मोड आलेले मेथीदाणे घेऊन त्यात हा सर्व मसाला टाकावा.
- चवीनुसार गुळ आणि मीठ तसेच लिंबाचा रस टाकावा आणि ते मिक्स करून घ्यावे.
- तेलामध्ये हे लोणचे छान मिक्स करून घ्यावे.
- हे मेथीदाण्याचे लोणचे तुमच्या जेवणाची लज्जत वाढवेल हे निश्चित!
हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का?
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

