Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी
    फूड काॅर्नर

    Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी

    Team AvaantarBy Team AvaantarAugust 8, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, रेसिपी, अळूवडी, नारळरस, पात्रा, खमंगअळूवडी, Recipe, AlooVadi, CoconutJuice, Patra, Tasty Aloo Vadi
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शीला जोशी

    साहित्य

    वडीच्या अळूची पाने – 10

    बेसन –1 वाटी

    तांदळाची पिठी – पाव वाटी

    चिंचेचा कोळ – 4 चमचे

    गूळ – चवीनुसार

    हळद – अर्धा चमचा

    तिखट – चवीनुसार

    मीठ – चवीनुसार

    तेल – तळण्यासाठी, फोडणीसाठी

    नारळ – 1 मोठा

    फोडणीचे साहित्य

    वडीचा मसाला

    धणे – 50 ग्रॅम

    जिरे – 50 ग्रॅम

    काळीमिरी पावडर – अर्धा टी-स्पून

    दालचिनी पावडर – पाव टी-स्पून

    लवंग – 4 नग

     

    पुरवठा संख्या (Servings) : 4 जणांसाठी

    तयारीस लागणारा वेळ : अर्धा तास

    शिजवण्याचा वेळ : अळूवडीचा उंडा वाफवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे

    • अळूवडी तळण्यासाठी 10 मिनिटे
    • नारळाच्या दुधात अळूवडी शिजवण्यासाठी 10 मिनिटे
    • एकूण वेळ: 40 मिनिटे

    हेही वाचा – Recipe : श्रावण स्पेशल… फराळी मिसळ

    कृती

    1. अळूची पाने स्वच्छ धुवून, पुसून त्याची देठे काढून घ्या. पानांच्या मागील जाड शिराही जितक्या काढता येतील तितक्या काढून घ्या. राहिलेल्या शिरा लाटण्याने लाटून चपट्या करून घ्या. अशी सर्व पाने तयार करा.
    2. वडीच्या मसाल्यातील सर्व साहित्य किंचित भाजून मिक्सरवर पावडर करून घ्या.
    3. बेसन, तांदूळ पिठी, वर तयार केलेल्या मसाल्यातील दोन मोठे चमचे मसाला, हळद, तिखट, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट भिजवून घ्या.
    4. अळूचे एक पान घेऊन शिरा काढलेल्या भागाला भिजवलेलं बेसन पिठ नीट लावा. त्यावर दुसरे पान ठेवून त्यालाही पिठ लावा. त्यावर तिसरे पान ठेवा, पिठ लावा. मग या पानांची आधी खालची बाजू दुमडून घ्या. मग दोन्ही बाजू दुमडून घट्ट अशी गुंडाळी करत उंडा तयार करा.
    5. उरलेल्या पानांनाही बेसनाचे मिश्रण लावून उंडे तयार करून घ्या.
    6. हे उंडे तेल लावलेल्या ताटलीत ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवून घ्या.
    7. उंडे वाफवून होईपर्यंत एक नारळ फोडून खोबऱ्याचे तुकडे करून त्याचे दोनदा दूध काढून घ्या.
    8. वाफवलेले उंडे पूर्ण गार झाले की, त्याच्या वड्या कापून तेलात तळून घ्या. या वड्या गार झाल्यावर त्याचे लहान लहान तुकडे करा.
    9. आता दुसऱ्या कढईत फोडणीसाठी तेल घ्या. तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, हिंग घालून तळलेल्या अळूवडीचे तुकडे घाला. नंतर त्यात नारळाचे काढलेले दूध घालून एक वाफ येईपर्यंत नीट शिजवून घ्या. गरज पडल्यास यात चवीनुसार मीठ घाला.
    10. एक वाफ आल्यावर गॅस बंद करा. नारळाच्या दुधातील अळूवडी खाण्यासाठी तयार आहे.

    हेही वाचा – Recipe : फणसाची भाजी अन् कांदा भजी

    टीप

    • ही वडी न तळता उंडे वाफवून गार झाल्यावर तुकडे करून मग फोडणीला टाकले आणि वरून नारळाचे दूध घालून वाफ दिली तरी चालते.
    • ही वेगळ्या चवीची वडी एकदा नक्की खाऊन बघा.

      तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

      avaantar.recipe@gmail.com

      या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn