Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट
    फूड काॅर्नर

    Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 19, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, फूड कॉर्नर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, लो कार्ब वेजी टोस्ट, मैदाविहरिहत टोस्ट, ब्रेडविरहित टोस्ट, व्हेज टोस्ट,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    बाहेरील आवरणासाठी साहित्य

    • बेसन – अर्धी वाटी
    • ज्वारीचे पीठ – अर्धी वाटी
    • बारीक रवा – पाव वाटी
    • हळद – पाव टीस्पून
    • तिखट – 1 टीस्पून
    • चाट मसाला – 1 टीस्पून
    • काळी मिरी पावडर – अर्धा टीस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • पाणी – आवश्यकतेनुसार

    भाज्यांच्या मिश्रणासाठी साहित्य

    • गाजर – 1 मध्यम
    • कोबी – 1 वाटी
    • हिरवा वाटाणा – अर्धी वाटी
    • हिरवी सिमला मिरची – अर्धी वाटी
    • लसूण – 2 पाकळ्या
    • आलं – एक इंच
    • कोथिंबीर – मूठभर
    • तेल – टोस्ट भाजण्यापुरते

    हेही वाचा – Recipe : वांग्याचे खानदेशी भरीत

    चटणी साहित्य

    • हिरवी मिरची – 1
    • कांदा – अर्धा मध्यम आकाराचा
    • कोथिंबीर – मूठभर
    • पुदीन्याची पाने – कोथिंबीरीचा पाव भाग
    • घट्ट दही – 2-3 टेबलस्पून
    • मीठ – चवीनुसार

    पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी

    तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे

    शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे

    एकूण वेळ : 25 मिनिटे

    कृती

    1. एका बाऊलमध्ये आवरणासाठी वर दिलेल्या साहित्यातील पाणी वगळता इतर सर्व साहित्य एकत्र करा.
    2. आता यात लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवून घ्या. या पिठाचा आपण ब्रेड तयार करणार आहोत. त्यामुळे पीठ सहज पसरेल इतपत पाणी त्यात घाला. पण पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
    3. आता हे मिश्रण थोडावेळ बाजूला ठेवा.
    4. चटणीसाठी दिलेले सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये त्याची चटणी वाटून घ्या.
    5. आता भाज्यांच्या साहित्यातील गाजर, कोबी व्हेज कटरमधून बारीक करून घ्या. मग त्यात मटार आणि चिरलेली सिमला मिरची घालून कटरमधून बारीक करून घ्या.
    6. आता या बारीक केलेल्या भाज्या भिजवून बाजूला ठेवलेल्या मिश्रणात घाला.
    7. बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला. सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
    8. आता गॅसवर चालणाऱ्या टोस्टरला एका बाजूने थोडेसे तेल लावा.
    9. या टोस्टरमध्ये वरील तयार केलेले मिश्रण घालून व्यवस्थित पसरवून घ्या.
    10. टोस्टर बंद करून दोन्ही बाजू गॅसवर नीट भाजून घ्या. याला साधारण 7 ते 8 मिनिटे लागतील. अर्थात, गॅसची आच आणि टोस्टरच्या जाडपणावर हा वेळ कमी जास्त होऊ शकतो.
    11. गरमागरम टोस्ट हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
    12. ब्रेडचा वापर न करता तयार होणारा हा  व्हेज टोस्ट एकदा करून बघा.

    विशेष आहार माहिती : शाकाहारी, लो कार्ब, मिलेट बेस

    हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा

    टीप्स

    • चटणीच्या साहित्यात साखर दिलेली नाही. पण आवडत असेल आणि साखर चालत असेल तर एक टीस्पून साखरही चटणी वाटताना घाला.
    • इलेक्ट्रीक टोस्टरपेक्षा गॅसवर चालणाऱ्या टोस्टरमधील सॅण्डविच अधिक कुरकुरीत होते.
    • टोस्टरला तेल लावल्यानंतर टोस्टचं मिश्रण घालण्याआधी थोडेसे तीळ घालून मग मिश्रण घालून, भाजून घेतले तर कॅल्शिअमचा थोडासा डोस सहज पूर्ण होईल.
    • घरात व्हेजिटेबल कटर नसेल तर, सर्व भाज्या बारीक चिरून किंवा मिक्सर काढून घेऊ शकता.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn