Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : गूळ आणि कणकेचे शंकरपाळे!
    फूड काॅर्नर

    Recipe : गूळ आणि कणकेचे शंकरपाळे!

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 18, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Recipe, रेसिपी, दिवाळी स्पेशल, शंकरपाळे, कणकेचे शंकरपाळे, कणीक गूळ शंकरपाळे, पौष्टिक शंकरपाळे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    गूळ आणि कणीक यांचे शंकरपाळे म्हणजे अफलातून स्वाद! गुळाचे आणि गव्हाचे इतकं ‘गूळपीठ’ आहे ना की, एकमेकांमध्ये ते कधी अधीन होऊन एकजीव होतात, हे कळत नाही! कणकेमध्ये साखरेपेक्षा गुळाचा गोडवा चवीला जास्त छान लागतो नक्कीच! गूळ आणि कणकेचे शंकरपाळे करायला अगदी सोपे… फार काही जास्त तामझाम न करता सगळ्या पदार्थांमधे आपला गोडवा व वेगळेपण जपणारा पदार्थ आहे!

    साहित्य

    • गूळ – 1 वाटी (पावडर किंवा बारीक केलेला)
    • दूध – 1 वाटी
    • तूप – 1 वाटी (पातळ केलेले)
    • पाणी – 1 वाटी
    • मीठ – चिमूटभर
    • कणीक – दूध, तूप, पाणी आणि गूळ यांच्या मिश्रणात मावेल इतकी
    • बारीक रवा – अर्धी वाटी (ऐच्छिक)
    • तेल किंवा तूप – तळणासाठी

    हेही वाचा – दिवाळी फराळ… प्रथा आणि परंपरेची जपणूक

    कृती

    1. प्रथम एका कढईत एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
    2. त्यातच वितळलेले तूपही आणि एक वाटी गुळाची पावडर अथवा बारीक केलेला गूळ टाकावा.
    3. गूळ पूर्णपणे विरघळला की, दूध, पाणी, तूप आणि गुळाचे गरमसर मिश्रण एका मोठ्या पसरट भांड्यात घ्यावे.
    4. यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे आणि या मिश्रणात मावेल तितकी कणीक आणि अर्धी वाटी रवा टाकून कणकेचा घट्ट गोळा मळून घ्यावा. थोडा वेळ कणीक झाकून ठेवावी.
    5. कणकेचा हा गोळा थंड झाल्यावर हाताने चांगला मळून एकसारखा करावा.
    6. त्यानंतर पोळपाटावर याची एक पातळसर पोळी लाटून घ्यावी आणि शंकरपाळ्याच्या कापणीने किंवा सुरीने याचे चौकोनी तुकडे कापून घ्यावेत.
    7. सुरुवातीला मोठ्या आचेवर कढईत तेल किंवा तूप गरम करून घ्यावे. त्यानंतर मध्यम आचेवर गॅस करून कढईत हळूवार शंकरपाळे सोडावेत.
    8. गॅसची मध्यम-मंद आच करत हे गूळ आणि कणकेचे शंकरपाळे गुलाबीसर तळून घ्यावेत.

    हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… मिरचीची भाजी- भाकरी

    टीप

    • हे शंकरपाळे चवीला अत्यंत छान लागतात, शिवाय मैद्याचा वापर टाळल्याने पौष्टिकही होतात.
    • कणकेचे शंकरपाळे थोडे दिवसांनी वातड होतात. म्हणून ते खुसखुशीत करण्याकरिता मिश्रणात थोडा रवा घातला जातो.
    • कणकेचे शंकरपाळे गॅस लो-मीडिअम फ्लेमवर ठेवूनच तळावे. हाय फ्लेमवर ते जळतात आणि रंग हवा तसा येत नाही.

    एकूण कालावधी – एक ते दीड तास


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn