Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : हिरवे टोमॅटो आणि दाण्याची भाजी
    फूड काॅर्नर

    Recipe : हिरवे टोमॅटो आणि दाण्याची भाजी

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 8, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, हिरव्या टोमॅटोची भाजी, टोमॅटो दाण्याची भाजी, हिरवे टोमॅटो दाणे, टोमॅटो शेंगदाणे भाजी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    साहित्य

    • मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो – 3 ते 4
    • तुरीची डाळ – 1/3 वाटी
    • हिरव्या मिरच्या – 3 ते 4
    • लसूण पाकळ्या – 3 ते 4
    • धणे पावडर – 1 टीस्पून
    • गरम मसाला – 1 टेबलस्पून
    • बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
    • शेंगदाणे – 3 ते 4 टेबलस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • तेल – 2 टीस्पून (फोडणीसाठी)
    • फोडणीसाठी – जिरे, मोहरी आणि हळद
    • पाणी – 2 ते 3 कप गरम (किंवा भाजी सरसरीत होण्यासाठी लागेल इतके)

    पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी

    तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे

    शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे

    एकूण वेळ : 20 मिनिटे

    हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट

    कृती

    1. डाळ स्वच्छ धुवून घ्या.
    2. टोमॅटोच्या थोड्या मोठ्या आकाराच्या फोडी करून धुतलेल्या डाळीत घाला.
    3. यात 1 कप पाणी घालून डाळ कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून शिजवून घ्या.
    4. एका कढईत शेंगदाणे भाजायला ठेवावेत. ते नीट भाजल्यावर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. त्यानंतर मिरच्या भाजून घ्या.
    5. शेंगदाणे गार झाले की, ते व्यवस्थित सोलून घ्या.
    6. मिरच्या, शेंगदाणे, लसूण पाकळ्या, गरम मसाला, धणेपावडर आणि अर्धी वाटी कोथिंबीर मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्या.
    7. एकदा जाडसर वाटून झाले की, नंतर अगदी थोडे पाणी घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्या.
    8. आता एका जाड बुडाच्या कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापले की, जिरे, मोहरी, हळद घालून फोडणी करा.
    9. त्यात वाटलेला मसाला घालून परतायला ठेवा. मंद आचेवर साधारण 4-5 मिनिटे मसाला परतत राहा.
    10. वाटलेला मसाला नीट परतला गेला की, कुकरमध्ये शिजवलेले डाळ-टोमॅटोचे मिश्रण त्यात घाला.
    11. सुरुवातीला साधारण एक कप गरम पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण ढवळून त्याला एक उकळी आणा.
    12. आणखी थोडे सरसरीत हवे असेल तर उकळण्यापूर्वीच लागेल इतके पाणी घाला.
    13. उकळी आली की, गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.
    14. वाफाळणारा भात किंवा गरम भाकरी, पोळी बरोबर ही भाजी अप्रतिम लागते.

    विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त

    हेही वाचा –  Recipe : खानदेशी पद्धतीची शेव भाजी

    टिप्स

    • टोमॅटो घेताना नीट मोठे रसदार बघून घ्यावेत.
    • ही भाजी थोडी तिखट केली तरच छान लागते.
    • घरी शेंगदाण्याचे कूट तयार असेल तर दाण्यांऐवजी कूटही वापरू शकता.
    • यात गूळ, साखर असा गोडवा देणारे पदार्थ घालत नाहीत. पण तुम्हाला गोडसर चवीची सवय असेल तर, दीड टीस्पून साखर यात घालू शकता.
    • ही भाजी रसभाजीसारखी सरसरीत ठेवा, खूप दाट किंवा आमटीसारखी पातळ करू नका.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn