Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Recipe : अतिशय खमंग अन् सर्वांच्या पसंतीचं थालिपीठ!
    फूड काॅर्नर

    Recipe : अतिशय खमंग अन् सर्वांच्या पसंतीचं थालिपीठ!

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 27, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, थालिपीठ, थालिपीठ भाजणी, कांद्याचे भाजणी, खमंग थालिपीठ, तव्यावरचे थालिपीठ, कढईतील थालिपीठ
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    थालिपीठ हे थालिपीठच असतं! मग ते कढईतील असो अथवा तव्यावर थापलेले असो… थालिपीठ म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा आवडता पदार्थ! भाजणीचे थालीपीठ करावे ते मराठी माणसानेच! कारण ते फक्त त्यांनाच योग्य प्रकारे जमतं. थालिपीठाचा खमंगपणा आपली जादू सदैव कायम राखून असतो. मराठी लोकांना कांद्याचे थालीपीठ तर जरा जास्तच प्रिय आहे. थालिपीठाची भाजणी नसेल मराठी गृहीणी गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि थोडे बेसन एकत्र घेऊन इन्स्टंट थालिपीठ तयार करते, परंतु भाजणीअभावी आपला थालिपीठ करण्याचा शिरस्ता मोडू देत नाही! पोळीसारखे मऊसर थालिपीठ खववय्ये मंडळींच्या घशाखाली उतरत नाही. आजचे थालिपीठ भाजणीचे नसून घरात असेलेली पीठं वापरून केले आहे.

    साहित्य

    • गव्हाचे पीठ – दोन वाट्या
    • बेसन – अर्धी वाटी
    • ज्वारीचे पीठ – अर्धी वाटी
    • मोठे कांदे – 2 उभे चिरलेले
    • हिरव्या मिरच्या – 4
    • चिरलेली कोथिंबीर – मूठभर
    • आलं-लसणाची पेस्ट – 1 चमचा
    • तिखट – 3 चमचे
    • हळद – 1 चमचा
    • हिंग – 1 लहान चमचा
    • ओवा – 1 चमचा
    • तीळ – 2 चमचे
    • मीठ – चवीनुसार
    • दही – 2 चमचे
    • (गरजेनुसार तेल किंवा तूप हे आवडीनुसार घ्यावे)

    हेही वाचा – Recipe : शॅलोट्सचे चटपटीत लोणचे!

    कृती

    1. गव्हाचे पीठ, बेसन, ज्वारीचे पीठ एकत्र करुन त्यामध्ये पातळ उभे काप करून चिरलेला कांदा टाकावा.
    2. नंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चिरलेली कोथिंबीर, आले-लसणाची पेस्ट, तिखट, हळद, हिंग टाकावा; नंतर ओवा हातावर भरडून टाकावा, तीळ आणि मीठ टाकून सर्व मिश्रण कांद्याला सर्व बाजूने लागेल, असे मिक्स करावे.
    3. नंतर दोन चमचे दही टाकून परत एकदा मिक्स करुन नंतर त्यात गरजेनुसार पाणी टाकून सर्व साहित्य घट्ट, पण थोडे सैलसर भिजवावे.
    4. एकीकडे तवा थोडा गरम करुन त्यावर सर्व बाजूने तेल पसरवून लावावे.
    5. आता या तव्यावर थालिपीठाच्या मिश्रणाचा एक मोठा गोळा ठेवून तो तवाभर सर्व बाजूने काठाने दाबत थापून घ्यावा.
    6. नंतर त्याला मध्यभागी एक छिद्र करून त्यामध्ये थोडेसे तेल सोडावे आणि गॅसची आच  कमी-जास्त करत थालिपीठ दोन्ही बाजूने  भाजून घ्यावे.
    7. थालिपीठ खमंग होण्यासाठी ते भाजताना तव्यावर कडेने तेल किंवा तूप सोडावे म्हणजे थालिपीठातील इतर जिन्नसांचा फ्लेव्हर त्यामध्ये उतरेल आणि चविष्ट असे थालीपीठ तयार होईल.

    पुरवठा संख्या – चार व्यक्तींसाठी

    तयारीचा कालावधी – 15 मिनिटे

    थालिपीठ भाजण्याचा कालावधी – 20 मिनिटे

    एकूण कालावधी – साधारणपणे

    हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!

    टिप्स

    • हिवाळ्यात पातीचा कांदा, हिरवा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेले थालीपीठ आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी गोड घट्टसर दही, लोणी, साजूक रवाळ तूप, लिंबाचे गोड लोणचे… झालंच तर एखादी चटणी असली म्हणजे दुसरे काही लागत नाही.
    • जसे तव्यावर थालिपीठ करतो तसेच कढईतले थालिपीठ करता येते. फक्त कढई खोलगट असल्याने थालिपीठ बुडाकडून लवकर लागण्याची आणि थालिपीठ काढताना तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कढईतील थालिपीठ शक्यतो मंद आचेवर करावे, जेणेकरून ते जळणार नाही आणि कढईतून काढताना सहजपणे निघेल.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn