Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेMarch 14, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, प्राणायाम प्रकार, योगाभ्यासातून निरामय आरोग्य, प्राणायाम अभ्यासातून निरामय आरोग्य, प्राणायामाचे लाभ, प्राणायामाचे आरोग्य लाभ, प्राणायाम मुद्रा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास याबाबत जाणून घेणार आहोत. प्राणायाम ही अष्टांग योगातील चवथी पायरी आहे. आता आपण प्राणायाम या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

    प्राणायाम म्हणजे काय?

    प्राणायाम हा संस्कृत शब्द आहे.

    प्राण + आयाम  = प्राणायाम

    प्राण म्हणजे चेतना अथवा शक्ती अथवा ऊर्जा होय. सजीवांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक शक्ती म्हणजे प्राणशक्ती होय. आयाम म्हणजे नियंत्रण करणे. प्राणायाम म्हणजे प्राणशक्तीवर नियंत्रण. श्वसनपद्धती नियंत्रण करण्याची कला म्हणजे प्राणायाम होय.

    प्राणायामाची आवश्यकता

    आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करण्याचे प्राणायाम हे अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त साधन आहे. प्राणायाम अभ्यासाचा उद्देश मनःशांती आणि मनःस्वाथ्य प्राप्त करणे असा आहे. यावरून प्राणायाम अभ्यासाची आवश्यकता खचितच अधोरेखित होते.

    हेही वाचा – दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    प्राणायामाची पूर्वतयारी आणि महत्त्वाचे मुद्दे

    • प्राणायाम सकाळी रिकाम्या पोटी करावा. तसे न जमल्यास सायंकाळी रिकाम्या पोटी करावा.
    • प्राणायामाची जागा शांत, स्वच्छ आणि हवेशीर असावी.
    • पोषाख सैलसर आणि सुटसुटीत असावा.
    • प्राणायामासाठी ध्यानोपयोगी आसनात बसावे. जमिनीवर बसणे अवघड वाटत असेल तर खुर्चीवर बसावे.
    • प्राणायाम अभ्यास यथाशक्ती करावा आणि अतिरेक टाळावा.
    • प्राणायाम अभ्यास शांत आणि प्रसन्न मनाने करावा.

    प्राणायामाचे प्रकार

    प्राणायामाचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत :

    1. सुलभ प्राणायाम
    2. चंद्रानुलोम – विलोम प्राणायाम
    3. सूर्यानुलोम – विलोम प्राणायाम
    4. चंद्रभेदन प्राणायाम
    5. सूर्यभेदन प्राणायाम
    6. अनुलोम-विलोम प्राणायाम
    7. भ्रामरी प्राणायाम
    8. उज्जायी प्राणायाम
    9. भस्त्रिका प्राणायाम
    10. सीत्कारी प्राणायाम
    11. शीतली प्राणायाम

    प्राणायामाच्या काही प्रकारांचा अभ्यास करत असताना प्राणायाम मुद्रा म्हणजे प्रणव मुद्रा याचा उपयोग करावा लागतो.

    त्रिबंध आणि प्राणायाम

    प्राणायाम अभ्यास कुंभकरहित अथवा कुंभकसहित करतात. श्वास रोखण्याच्या क्रियेला कुंभक म्हणतात. प्राणायाम अभ्यास कुंभकसहित अधिक कालपर्यंत करावयाचा असल्यास पुढील त्रिबंधांचा उपयोग करणे अनिवार्य आहे :

    • जालंधर बंध
    • मूलबंध
    • उड्डियान बंध

    हे त्रिबंध विशिष्ट पद्धतीने बांधण्यासाठी तसेच सोडण्यासाठी सखोल शास्त्रशुद्ध तसेच प्रत्यक्ष वैयक्तिक मार्गदर्शन आवश्यक आहे.

    वास्तविक, कुंभकरहित प्राणायाम सहजसाध्य आहे. कुंभकरहित प्राणायामाचे यथायोग्य आरोग्य लाभ खचितच मिळतात.

    हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    प्राणायामाचे आरोग्य लाभ

    • प्राणायामाच्या विविध प्रकारांच्या अभ्यासातून साधकास अनंत शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ प्राप्त होतात.
    • प्राणायामाने रक्तशुद्धी, श्वसनशुद्धी तसेच शरीरातील सर्व नाड्यांची शुद्धी होते.
    • प्राणायाम अभ्यासाने मानसिक विकार दूर होण्यास साहाय्य लाभते.
    • प्राणायाम ही आपल्या निरामय आरोग्याची संजीवनी आहे.

    दैनंदिन योग साधना करताना कपालभाती अभ्यास झाल्यावर प्राणायामाचा अभ्यास यथाशक्ती क्षमतेनुसार करावा.

    योगाभ्यासातील विविध प्राणायाम प्रकार, कृती आणि फायदे तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


    Author

    • रविंद्र परांजपे
      रविंद्र परांजपे
    रविंद्र परांजपे

    Related Posts

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    By Team AvaantarMarch 14, 2026

    डॉ. श्रीकांत राजे होमिओपॅथी चिकित्सक वजन वाढीला मानसिक चिंता आणि ताण कारणीभूत असतो. अगदी “आपण…

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn