Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»चाफा बोलेना… आईचा एकटेपणा वाढतच गेला!
    ललित

    चाफा बोलेना… आईचा एकटेपणा वाढतच गेला!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 3, 2026Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, चाफा बोलेना, जोशी काकूंचा मृत्यू, सुबोधचे हस्तलिखित, अरविंदचा मृत्यू, अरविंदचा अपघाती मृत्यू, सतीश बर्वे कथा, आईचे एकाकीपणा, आईचे डायरीलेखन, आईची डायरी,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सतीश बर्वे

    भाग – 2

    मी हळूहळू भानावर आलो. माझे खांदे गदागदा हलवून आई घामाने थबथबली होती. मान वर करून मी समोर बघितले तर दिवाणखान्यातून आतल्या खोल्यांमध्ये जाणाऱ्या पॅसेजला लावलेल्या पडदा अर्धवट बाजूला करून अरविंदची बायको सुचित्रा उभी होती… मी काय सांगणार आहे, ते ऐकायला! देव न करो आणि कोणावर अशी वेळ येवो. आजवर वर्तमानपत्रातून आणि टीव्हीवरील बातम्यांतून अशा अपघाताने घरादारावर पसरलेली शोककळा आपण वाचलेली आणि बघितलेली असते. पण आज तोच प्रसंग आमच्या घरात घडला होता! पुढच्या काही क्षणांत जेव्हा मी तोंड उघडून फोनवर काय ऐकलं ते सांगणार होतो आईला… मन बिलकुल धजावत नव्हतं, पण आणखी वेळ दवडून चालणार नव्हता मला. शेवटी देवाचं नामस्मरण केलं आणि आईला उद्देशून मी चार शब्द उच्चारले, “आई तू उपास सोड!”

    “म्हणजे रे?” असं म्हणून आईने अरविंदच्या नावाने टाहो फोडला. ती थरथरत होती. मी तिला सावरत सोफ्यावर बसवलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागलो. पडद्याआडून माझं बोलणं ऐकणारी सुचित्रा बाहेर आली आणि सोफ्याच्या एका कडेने आईला मिठी मारत रडायला लागली. प्रसंग बाका होता… आमच्या घराची कठोर परीक्षा घेणारा होता. मी आईच्या मांडीवरून डोकं बाजूला करून उभा राहिलो आणि सुचित्राला आईला तिच्या खोलीत न्यायला सांगितले…

    माझा मित्र सुबोधने त्याच्या हस्ताक्षरातील मजकूर आणि जोशी काकूंची डायरी मला आणून दिली, त्यातील हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. सुबोध म्हणतो…

    सोसायटीतील माझ्या जवळच्या चार-पाच मित्रांना फोन करून ताबडतोब घरी यायला सांगितले. अक्षरशः पुढच्या पाचच मिनिटांत सगळे आमच्या घरी येऊन थडकले. मी थोडक्यात त्यांना काय झालं ते सांगितले. शेवटी विचार करून इथूनच शववाहिनी घेऊन जायचं ठरलं. माझ्या स्वभावामुळे सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी माझ्या ओळखीचे होते. तीच ओळख कामाला आली. फोनाफोनी झाली. लोणावळ्याला जायला तीन गाड्या उपलब्ध झाल्या पुढच्या अर्ध्या तासात! प्रवासात सगळे मित्र मला धीर देत होते. स्थानिक पोलीस आणि शवविच्छेदन करणाऱ्या हॉस्पिटलमधली ओळख निघाली होती, त्यामुळे आमचं तिथलं काम लवकर होण्याची शक्यता होती.

    आम्ही लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. मी तिथल्या ड्युटी ऑफिसरला माझी ओळख सांगून आलेल्या फोनविषयी माहिती दिली. पोलिसांनी गाडीत सापडलेल्या वस्तूंचा पंचनामा करून त्या माझ्या ताब्यात दिल्या. अरविंदचं घड्याळ, गाडीच्या चाव्या, पैशाचं पाकीट, मोबाइल, कागदपत्रे यासोबत चितळ्यांच्या बाकरवडी आणि आंबा बर्फीचे खोके देखील होते. गाडीला अपघात होऊन देखील दोन्ही खोके जसेच्या तसे होते. गाडीची अवस्था बिलकुल बघवत नव्हती. अपघात झाला त्या क्षणाला अरविंदची काय अवस्था झाली असेल हा विचार मनात येताच माझा थरकाप उडाला. पुढचा विचार करण्याची ताकद माझ्यात नव्हती.

    हेही वाचा – चाफा बोलेना… अरविंदच्या मृत्यूची आईला चाहूल

    शवविच्छेदन करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये बराच वेळ ताटकळत बसायला लागले. त्या दरम्यान मित्राने आणलेला चहा आणि नाश्ता आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतला, कारण कालपासून आम्ही सगळेच उपाशी होतो. ओळख पटवून मी अरविंदच्या देहाचा ताबा घेतला. सगळे सोपस्कार पूर्ण करून लोणावळ्याहून निघायला आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचे दहा वाजले होते. कारण शवविच्छेदन दिवसाउजेडी केलं जातं. सारखं वाटत होतं की, शांतपणे झोपलेला अरविंद एकदा तरी डोळे उघडेल. पण तसं होणार नव्हतं… कारण, नियतीसमोर आपण खरंच असहाय असतो. आमच्या गाड्या आणि शववाहिनी जसजशी मुंबईच्या जवळ चालली होती, तसतशी माझी धाकधूक वाढत चालली होती. सोसायटीत काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नव्हती. शिवाय, मोठा प्रश्न होता अरविंदला बघून आई आणि सुचित्राला बसणाऱ्या धक्क्याचा! पण आम्ही घरून निघाल्यावर माझ्या मित्रांच्या आयांनी आमच्या घराचा ताबा घेत सगळ्यांना रात्रभर सोबत करण्याचा आणि धीर देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, असं एका मित्राने जेव्हा मला सांगितले तेव्हा माझा जीव थोडा शांत झाला.

    आम्ही घरी पोहोचलो तेव्हा सोसायटीच्या आवारात तुडुंब गर्दी झाली होती. आमच्या गाड्या बाहेर रस्त्यावर लावून शववाहिनी जेमतेम आत आली आणि आमच्या बिल्डिंगच्या दरवाजाजवळ येऊन थांबली. वातावरण कमालीचं गंभीर झाले होते. माझ्या मित्रांचे आईवडील आम्हाला सामोरे गेले. थोड्या वेळाने शववाहिनीचे मागचे दार सावकाशपणे उघडलं गेलं. आजूबाजूच्या शांततेत ते दार उघडताना झालेला आवाज सुद्धा अंगावर शहारे आणणारा होता. पुढचे सगळे सोपस्कार लिहीत नाहीये, कारण माझा हात आज देखील थरथर कापत आहे. एकच सांगतो शांतपणे झोपलेल्या अरविंदचा चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाहीये…

    अरविंदचं जाणं आईने फार मनाला लावून घेतलं होतं. अरविंदची बायको सुचित्रा धीराची मुलगी. तिने तिच्या मुलांना म्हणजे गंधार आणि शौनकला जवळ घेऊन सगळं नीट समजावून सांगितले. पण तरीही अरविंदचं नसणं त्या दोघांनी मनाला लावून घेतलं होतं. ती पोकळी बऱ्यापैकी भरून यायला पुढचे 6-8 महिने गेले. मुलांच्या शाळांना नाताळच्या सुट्ट्या लागल्या आणि सुचित्रा वातावरणात बदल म्हणून मुलांना घेऊन तिच्या माहेरी कोल्हापुरला गेली.

    आई सावरलेली वाटत होती, पण तरीही तिच्या खोलीत बेडवर बसून खिडकीतून बाहेर बघत बसायची तासंतास. निव्वळ उपचार म्हणून जेवायची आणि आवश्यक तेवढंच बोलायची. खरंच, आईची परिस्थिती बघवत नव्हती तेव्हा! पण ह्या सगळ्याला काळ हेच औषध होते. अरविंदचं वर्षश्राद्ध झालं आणि त्यानंतर मात्र पहिल्यांदा घराने आनंदाचं वातावरण अनुभवलं, जेव्हा गंधारच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. तो शाळेत पहिला आला होता. त्याचं घवघवीत यश बघायला अरविंद मात्र नव्हता. खूप महिन्यांनी आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. त्यादिवशी मोठ्या कौतुकाने आणि उत्साहाने आईने गंधारची दृष्ट काढली. नंतर हट्टाने त्याला आणि सुचित्राला जवळच्या गणपती मंदिरात घेऊन गेली.

    हेही वाचा – मातृत्वाची दिवाळी!

    एकंदरीत घर पूर्वीचं वाटायला लागलं आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. सगळ्यांना सावरता सावरता आणि धीर देताना माझी काय अवस्था झाली होती, ती परवा सहज आरशासमोर उभा राहिलो, तेव्हा माझ्या लक्षांत आली. माझ्या एकंदर दिसण्यात झालेला बदल धक्कादायक होता. माझं पूर्वीचं रूप परत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे मी ठरवले आणि त्या दृष्टीने खरोखरच पावलं टाकायला सुरुवात केली.

    आई तिच्या खोलीत असायची जास्त वेळ. कधी तिच्या जवळ विचारपूस करायला गेलो की, जवळची उघडी डायरी बंद करून मग बोलायला सुरुवात करायची. ती डायरी बघून माझी उत्सुकता ताणत होती आणि एक दिवस न रहावून मी तिला डायरीबद्दल विचारले तेव्हा ती त्यात जुन्या आठवणी लिहिते आहे, असं मोघम म्हणाली खरी.

    पण डायरीतील गुपिते ती गेल्यावर अचानक कळली… जेव्हा मी तिची खोली आवरायला घेतली आणि ती डायरी माझ्या दृष्टीस पडली! ती एकटी पडत चालली आहे, हे कधीच कोणाच्या लक्षातही आलं नाही… तीच गोष्ट पुढे वाढत गेली आणि त्यातून आई शेवटपर्यंत बाहेर पडू शकली नाही. पण जेव्हा पडली तेव्हा ती थेट बाबांना भेटायला जाणाऱ्या रस्त्यावर सावकाश पावलं टाकत होती.

    क्रमशः

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn