Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 10, 2026Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 10 मार्च 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 19 फाल्गुन शके 1947; तिथि : सप्तमी 25:53; नक्षत्र : अनुराधा 19:04
    • योग : हर्षण 08:20; करण : विष्टी 12:39;
    • सूर्य : कुंभ; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:53; सूर्यास्त : 18:46;
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    समाजसुधारक अप्पासाहेब पटवर्धन

    टीम अवांतर

    कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसुधारक सीताराम पुरुषोत्तम तथा अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1894 रोजी आगरगुळे, रत्नागिरी येथे झाला. अप्पासाहेब पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण रत्‍नागिरीत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. केल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात 1917–18  या काळात एक वर्ष प्राध्यापकी केली. तत्पूर्वी, मुंबईत 1916 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी अप्पासाहेबांना गांधीचे पहिल्यांदा दर्शन झाले होते. 21 वर्षांचे अप्पासाहेब गांधींचे विचार ऐकून इतके भारावून गेले की, त्यांनी नोकरी सोडली आणि ते पूर्णकाळ समाजकार्य करण्यासाठी गांधींच्या आश्रमात दाखल झाले, आणि गांधीजींचा पत्रव्यवहार सांभाळू लागले. याच काळात गांधींनी 1919 साली सुरू केलेल्या ‘यंग इंडिया’ या साप्ताहिकाची, साबरमती आश्रमात चालू असलेल्या राष्ट्रीय शाळेत शिकवण्याची आणि शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कामाची जबाबदारी अप्पासाहेब पटवर्धनांनी स्वीकारली.

    पुढे अप्पासाहेब कोकणात आले. तेथे त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्‍नागिरीत सूतकताई आणि ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही होते. दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यातील कणकवली शहरात अप्पासाहेब पटवर्धनांनी ‘गोपुरी आश्रम’ सुरू केला. कणकवलीत ‘गोपुरी आश्रम’ चालवत असताना मानवी विष्‍ठेपासून सेंद्रिय खत तयार करणे हे काम त्यांनी सुरू केले. या खताला त्यांनी ‘सोनखत’ असे नाव दिले, जे आजही प्रचलित आहे.

    हेही वाचा – ऑफिसचा डबा आणि आलू पराठे!

    अप्पासाहेबांनी त्याकाळात सोलर, कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लांट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोग केले. त्यावर त्यांनी पुस्तकेही लिहिली. ग्रामपंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात यायच्या पूर्वी ग्रामपंचायतीच्याच धर्तीचे काम अप्पासाहेबांनी गोपुरीत सुरू केले. त्यानुसार रस्ते, विहिरी, जलसंधारण, प्राथमिक शिक्षण आदी कामे होऊ लागली. 10 मार्च 1971 रोजी अप्पासाहेबांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त थोडी धावपळी होईल, पण हळूहळू सर्वकाही तुमच्या इच्छेनुसार होईल. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल. पैसे हुशारीने खर्च करा. आज आरोग्य चांगले राहील, मात्र आहाराकडे थोडे लक्ष द्या.

    वृषभ – आज करिअरच्या दृष्टीने काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. काही योजना आखत असाल, तर आता पुढे जाण्यासाठी चांगला काळ आहे. नोकरीत किंवा व्यवसायात कुटुंबीय आणि हितचिंतकांचे पाठबळ मिळेल. घरातील वातावरणही शांततापूर्ण असेल. जुन्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी संवाद साधू शकाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

    मिथुन – आज थोडे सावध राहण्याची गरज आहे. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु तुम्ही त्या चांगल्या प्रकारे हाताळाल. कुटुंबात एखाद्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो, म्हणून बजेटवर लक्ष ठेवा. दिवसाच्या अखेरीस मनावरील ताण बऱ्यापैकी कमी होईल.

    कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामांमध्ये हळूहळू प्रगती होताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. सहलीचे किंवा प्रवासाचे नियोजन आनंददायी ठरेल. आरोग्य सामान्य राहील, परंतु विश्रांती घेण्याची गरज असेल.

    सिंह – आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण घाबरून जाण्याची गरज नाही. हळूहळू सगळं काही शांत होईल. कामाच्या ठिकाणी कोणाशी मतभेद असू शकतात, म्हणून शांतपणे गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका.

    कन्या – आजचा दिवस संमिश्र अनुभव देणारा असेल. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणे आवश्यक असेल. एखादे जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. आज मित्रांकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून मदत मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. व्यवसायासाठी नवीन योजनांचा विचार कराल.

    तुळ – आज कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. काही महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब होऊ शकतो, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. ​​थोडासा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करता येईल, मात्र त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. दिवसाच्या शेवटी, मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत असाल.

    वृश्चिक – आजचा दिवस धावपळीचा असू शकतो, दिवसअखेर कष्टाचे चांगले फळ मिळू शकते. एखाद्या जुन्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटण्याचा योग आहे. तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि जास्तीचा ताण टाळा.

    हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…

    धनु – आज काही नवीन कल्पनांवर विचार करू शकता. काहीतरी नवीन सुरू करायचे असेल, तर त्यासंदर्भात योजना आखण्याची चांगली वेळ आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकेल. कुटुंबातील वातावरणही चांगले राहील. आज आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या, जोखीम घेऊ नका.

    मकर – आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा आहे. कामात घाई केल्याने नुकसान होऊ शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला धैर्य देईल. खर्च वाढू शकतो. आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका, आवश्यकता भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

    कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नोकरीच्या ठिकाणी वातावारण हळूहळू अनुकूल होईल. एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करत असाल तर पुढे जाण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. कटुंबासह धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

    मीन – नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढल्याने थोडे गोंधळल्यासारखे वाटू शकते, परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. संयम आणि शांतपणा योग्य उपाय शोधण्यास मदत करेल. अशा वेळी रागावर पूर्णपणे ताबा ठेवण्याची गरज आहे. आर्थिक बाबी चांगल्या राहतील. आरोग्याची काळजी घ्या आणि थोडीशी  विश्रांती घ्या.


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn