Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 14 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 14 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 14, 2026Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 14 मार्च 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 23 फाल्गुन शके 1947; तिथि : दशमी 08:10; नक्षत्र : उत्तराषाढा 28:48;
    • योग : वरियान 10:41; करण : बव 20:48;
    • सूर्य : कुंभ; चंद्र : धनु 09:32; सूर्योदय : 06:49; सूर्यास्त : 18:47;
    • पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : विश्वावसू;
    • शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

    टीम अवांतर

    या विश्वाचं गूढ केवळ एका सिद्धांतामध्ये सांगता येईल का? यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये 8 जानेवारी 1942 रोजी झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक तर आई वैद्यकीय संशोधन सचिव होती.  त्यामुळे संशोधनाचं बाळकडू त्यांना आपल्या आई-बाबांकडून मिळालं. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड निर्माण झाली.

    ऑक्सफर्ड विद्यापीठामधून भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. मात्र वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांना मोटार न्यूरॉन डिसीजने गाठले. या आजारामुळे हळूहळू शरीर पक्षाघातानं ग्रस्त होते. आपल्या शारीरिक मर्यादांवर विजय मिळवून ते पुढं चालत राहिले. हातांमधली शक्ती जशी क्षीण होऊ लागली तसं ते किचकट गणितं आपल्या मनातच सोडवू लागले.

    हेही वाचा – आठवणींचे कपाट!

    विश्वाची निर्मिती ही बिग बॅंगपासून झाली आहे असा सिद्धांत 1940मध्ये मांडण्यात आला होता. पण या सिद्धांताला सर्वांनी मान्य केलं नव्हतं. स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे सहकारी रॉजर पेनरोज यांनी यावर अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी कृष्णविवरांवर अभ्यास सुरू केला. वयाच्या 35 व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जातं. न्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते. त्यामुळे हॉकिंग यांना न्यूटनचे वारसदार मानले जाते.

    1988 साली हॉकिंग यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम (काळाचा संक्षिप्त इतिहास) हे पुस्तक लिहिलं. आपण केलेल्या अभ्यासाचा उपयोग सामान्य वाचकाला व्हावा, या उद्देशाने त्यांनी हे पुस्तक लिहिलं. वैज्ञानिक क्षेत्रात सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइमची गणना होते. 2009 मध्ये स्टीफन हॉकिंग यांना लुकाशियस प्रोफेसरच्या पदावरुन निवृत्त व्हावं लागलं. त्यावेळी ते 67 वर्षांचे होते. मात्र संशोधनावरील प्रेमापोटी ते केंब्रिज विद्यापीठात दुसऱ्या पदावर रूजू झाले.

    हॉकिंग यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर आपलं काम सुरूचं ठेवलं होतं. आपल्या ‘द ग्रॅंड डिजाइन’ या पुस्तकात त्यांनी म्हटलंय, “फक्त एकच विश्व नसून अशी अनेक विश्व असू शकतात. त्यामुळे या विश्वाचं गूढ उकलण्यासाठी केवळ एकच ‘थेअरी ऑफ एव्हरीथिंग’ लागू होईल असं म्हणता येणार नाही.” आयुष्यातील तीन दशकं त्यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर काम केलं, पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते म्हणाले, “अशी एकच थेअरी सापडणं हे कठीण काम आहे.”

    ऐन तारुण्यात झालेल्या आजारामुळे पुढे संपूर्ण आयुष्य व्हील चेअरवर काढणाऱ्या या वैज्ञानिकाच्या विजिगीषु वृत्तीमुळेच ते लाखो जणांच्या गळ्यातील ताईत बनले होते. 14 मार्च 2019 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – दिवस थोडा धावपळीचा असू शकतो. कामाच्या जबाबदाऱ्या कदाचित जास्त वाटतील. मात्र तुम्ही प्रत्येक कामाकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिले तर, सर्वकाही व्यवस्थित होईल. आज जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी सकारात्मक संवाद साधल्यास ताण कमी होईल. आरोग्य सामान्य राहील, परंतु मानसिक आरोग्यासाठी ध्यानधारणा करा.

    वृषभ – आज तुमच्या मेहनतीचे फळ दिसून येईल. मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू शकता, जी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. पैसे खर्च करताना काळजी घ्या. घरातील वातावरण चांगले राहील, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल. आरोग्यही चांगले असेल. आहार मात्र हलका आणि संतुलित घ्या.

    मिथुन – एकाच वेळी तुमच्या मनात अनेक गोष्टींबद्दल विचार सुरू असतील. त्यामुळे मानसिकदृष्ट्या थोडे गोंधळलेले असाल. अशा परिस्थितीत, आधी सर्वात महत्त्वाची कामे पूर्ण करणे योग्य ठरेल. एखाद्या जुन्या सवंगड्याशी गप्पा मारू शकता. दिवसाच्या उत्तरार्धात काहीसा थकवा जाणवेल. कामं बाजूला ठेवून थोडा वेळ आराम करावासा वाटू शकतो. तो आराम नक्की करा.

    कर्क – कामाच्या ठिकाणी फारसे चढ-उतार होणार नाहीत. कुटुंबात एखादा मुद्दा उद्भवू शकतो, ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जवळच्या मित्राचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. कोणत्याही बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कामानिमित्त बाहेर पडताना जवळ पाण्याची बाटली अवश्य ठेवा. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा.

    सिंह – तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. एखादा नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करू शकता. कठोर परिश्रम करत राहिलात तर हळूहळू गोष्टी तुमच्या बाजूने व्हायला लागतील. एखाद्या वादग्रस्त मुद्द्यावर मित्र किंवा कुटुंबाशी सकारात्मक संवाद होऊ शकतो. उन्हामुळे डोळ्यांची जळजळ किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.

    कन्या – काही कामांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत संयम आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. आर्थिक बाबतीत मात्र काहीसे काळजी करण्यासारखे वातावरण असेल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला पाठिंबा देतील. उन्हाळ्याच्या सुट्टीत चार दिवस कुठेतरी फिरून यायचे प्लॅनिंग कराल.

    तुळ – काही कामे सहज पूर्ण होतील, तर काहींना थोडा जास्त वेळ लागू शकतो. जुनी समस्या सोडवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. कार्यालयात बोलताना विचारपूर्वक शब्द वापरा. मित्रांसोबत गप्पा मारणे तुम्हाला रिलॅक्स करेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.

    वृश्चिक – एखाद्या महत्त्वाच्या कामात हळूहळू प्रगती दिसून येईल. बऱ्याच काळापासून रखडलेले काम पुढे सरकू शकेल. परिणामी चिंता काही प्रमाणात कमी होऊ शकेल. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायी असेल. आर्थिक संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. उन्हाचा प्रकोप वाढत असल्याने काळजी घ्या. शक्य तितके पाणी प्या. उन्हात जाताना छत्री किंवा टोपी वापरा.

    हेही वाचा – डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    धनु – काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही एखाद्या कामासाठी नवीन दृष्टिकोनाचा विचार करू शकता. तथापि, घाईघाईने निर्णय घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला यासाठी उपयुक्त ठरू शकतो. घरातील वातावरण शांत राहील. आरोग्याच्या लहानसहान कुरबुरी असतील. ताक, लिंबू पाणी पिणे फायद्याचे असेल.

    मकर – कामाच्या जबाबदाऱ्यांचा कदाचित भार वाटेल, विचलित होऊ नका. हळूहळू गोष्टी स्थिर होतील. संयमाने काम केले तर परिस्थिती नियंत्रणात राहील. जवळच्या मित्राकडून मदत मिळू शकते. आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे महत्वाचे आहे. मुख्य म्हणजे कोणताही आजार अंगावर काढू नका. लगेच वैद्यकीय सल्ला घ्या.

    कुंभ – बदल हवा आहे, असे कदाचित वाटेल. त्यादृष्टीने नवीन तांत्रिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. त्याचा अनुकूल परिणाम दिसेल. कामाच्या ठिकाणी गोष्टी हळूहळू स्पष्ट होतील. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. आज पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. पाणी भरपूर प्या.

    मीन – भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. व्यवहारीकदृष्ट्या विचार करा. शांत मन तुम्हाला चांगला मार्ग शोधण्यास मदत करू शकते. कुटुंबाचा पाठिंबा कायम राहील. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळले. जवळच्या मित्राशी बोलल्याने तुम्हाला हलके वाटू शकते. आरोग्य चांगले असेल. योग्य प्रमाणात हलका आणि सात्विक आहार घ्या.


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn