Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 07 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 07 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 7, 2026Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 07 मार्च 2026; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 16 फाल्गुन शके 1947; तिथि : चतुर्थी 19:16; नक्षत्र : चित्रा 11:14
    • योग : ध्रुव अहोरात्र; करण : कौलव अहोरात्र
    • सूर्य : कुंभ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:55; सूर्यास्त : 18:45
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    संगीतकार रवी

    टीम अवांतर

    हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले संगीतकार रवी यांचा जन्म 3 मार्च 1926 रोजी दिल्ली येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव रविशंकर शर्मा. खरंतर त्यांना पार्श्वगायक व्हायचे होते. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत असताना ते हार्मोनियम आणि गाणे शिकले. 1950 साली गायक होण्यासाठी ते मुंबईला आले. दोन वर्षे संघर्ष करत राहिले. 1952 मध्ये हेमंत कुमार यांनी त्यांना ‘आनंदमठ’ या चित्रपटात ‘वंदे मातरम’ गीतात कोरसमध्ये गाण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांची योग्यता ओळखून हेमंत कुमार यांनी त्यांना सहाय्यक म्हणून आपल्याकडे ठेवून घेतले.

    दोन-तीन वर्षांनंतर हेमंत कुमार यांनी त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचा सल्ला दिला आणि देवेंद्र गोयल यांनी रवी यांना पहिला ब्रेक दिला. ‘वचन’ चित्रपटापासून त्यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील ‘चंदा मामा दूर के’ आणि ‘एक पैसा दे बाबू’ सारखी गीते लोकप्रिय झाली.

    हेही वाचा – पुरस्कार… एक नवा हुरूप देणारा!

    1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटामुळे रवी यांचे नशीब उजळले. उत्कृष्ट गाणी आणि अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाच्या यशाने रवी यांना चित्रपटसृष्टीत ‘संगीतकार’ म्हणून स्थापित केले. आजही या चित्रपटातील सदाबहार गाणी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. रवी यांनी त्यानंतर खऱ्या अर्थाने यशाची उंची गाठली. यानंतर ‘घुंघट’, ‘घराना’, ‘चायना टाऊन’, ‘आज और कल’,’ गुमराह’, ‘काजल’, ‘फूल और पत्थर’, ‘आंखें’, ‘नीलकमल’,  ‘एक फूल दो माली’, ‘एक महल हो सपनो का’ अशा चित्रपटात संगीत देऊन त्यांनी स्वतःला सिद्ध केले. त्यांनी शास्त्रीय संगीताचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते, तरीही शास्त्रीय संगीतावर अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली. आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी रवी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनेक अविस्मरणीय गाणी गायली आणि त्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

    1961 च्या ‘घराना’  या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक फिल्म पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1965 ला ‘खानदान’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना फिल्म पुरस्कार मिळाला. 1971 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. दक्षिण भारतीय सिनेमासाठी देखील त्यांना राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले होते. 1994 मध्ये ‘परिणयम’ आणि’ सुखरुथम ‘या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार प्राप्त झाला. 1993 मध्ये ‘सरगम’साठी  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर 1994 ला फिल्म फेअर पुरस्कार (मल्याळम) मिळाला. अशा या संगीतकाराचे 7 मार्च 2012 रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशीभविष्य

    मेष – नोकरीच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. नोकरदार जातकांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. एक दूरदर्शी नेता म्हणून ओळख प्रस्थापित कराल. आर्थिक फायद्यासाठी दिवस चांगला आहे. व्यावसायिकांना आज नफा मिळेल, मात्र राहूच्या प्रभावामुळे, कोणत्याही पद्धतीची धोकादायक, शॉर्टकट गुंतवणूक टाळा.

    वृषभ – तुमच्या कारकिर्दीला आज स्थिरता मिळून प्रगतीची वाट खुली होण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमच्याबद्दलची विश्वासार्हता वाढेल. महिला वर्गाला विशेष फायदे मिळू शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याची शक्यता आहे, परंतु तुमचे बजेट नियंत्रणात ठेवणे देखील आवश्यक आहे.

    मिथुन – संशोधन आणि नियोजनामुळे आज प्रगती होईल. कोणाशीही संभाषण करताना सावधगिरी बाळगा. परदेशातील प्रकल्पांमध्ये किंवा उच्च शिक्षणात गुंतलेल्यांना यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे हे आज सर्वात मोठे आव्हान असेल. प्रवास किंवा तंत्रज्ञानावर पैसे खर्च होऊ शकतात. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा.

    कर्क – तुमची प्रगती तुमच्या कठोर परिश्रमांवर अवलंबून आहे. आज टीमशी उत्कृष्टपणे समन्वय साधता येईल. कार्यक्षेत्र वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. अचानकपणे आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. जुनी गुंतवणूक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित योजना यशस्वी होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करण्यासाठी पावले उचला.

    सिंह – व्यावसायिक भागीदारांसोबत संयुक्तपणे केलेल्या गुंतवणुकीमुळे भविष्यात लक्षणीय नफा मिळू शकतो. भागीदारी आणि टीमवर्क हे तुमच्या यशाचे गमक आहेत. व्यावसायिक जगात तुमचा प्रभाव वाढेल. तुमचे राजनैतिक कौशल्य अधोरेखित होईल. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. सामायिक वित्तव्यवस्थेत पारदर्शकता ठेवा.

    कन्या – शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन प्रगतीकडे नेईल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो. मात्र, त्यामुळे तुमची कार्यक्षमता सिद्ध करता यईल. कर्ज वसूल करण्यासाठी किंवा जुन्या थकबाकीच्या परतफेडीसाठी दिवस अनुकूल आहे. नवीन बचत योजना यशस्वी होतील, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

    तुळ – सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यास मदत करेल. रागावर नियंत्रण ठेवा. डोकं शांत ठेवून परिस्थिती हाताळण्याला प्राधान्य द्या. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. सुखसोयींसाठी तसेच व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी पैसे खर्च करू शकता. शेअर बाजारात मोठी जोखीम घेणे टाळणे फायदेशीर ठरेल.

    हेही वाचा – स्वेटर… जुन्या विणी गेल्या विस्मरणात!

    वृश्चिक – काम आणि घर यांच्यात समतोल साधल्याने करिअरमध्ये प्रगती होईल. रिअल इस्टेट किंवा पायाभूत सुविधांमध्ये गुंतलेल्यांना लक्षणीय यश मिळेल. नवीन वास्तू, मालमत्ता किंवा वाहनात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. खर्चाचे प्रमाण थोडे विचलित करणारे असू शकते, म्हणून हुशारीने खर्च करा.

    धनु – धैर्य आणि धाडस तुमच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा देईल. मार्केटिंग आणि सेल्समध्ये एखादा मोठा करार करू शकाल. सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. लहान गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. आर्थिक सुरक्षेसाठी केलेले नियोजन आज फायदेशीर ठरेल.

    मकर – तुमचे गोड बोलणे आणि आर्थिक व्यवस्थापन कौशल्य कारकिर्दीला बळकटी देईल. व्यावसायिक जीवनाला आर्थिक शिल्पकारासारखा आकार द्याल. खर्चावर नियंत्रण ठेवून बचत वाढवता येऊ शकते. जुन्या छंदातून किंवा कलात्मक व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिरतेसाठी योग्य दिवस आहे.

    कुंभ – प्रगतीसाठी आजचा दिवस म्हणजे  क्रांतिकारी ठरण्याची शक्यता आहे. आज तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. तांत्रिक नवोपक्रमांमध्ये मोठे यश मिळेल. बजेट आणि आर्थिक बाजू मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा. कार्यक्षमता आणि व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे नवीन आर्थिक संधी उपलपब्ध होतील, परंतु घाईघाईने निर्णय घेऊ नका.

    मीन – नोकरीच्या ठिकाणी कामचा ताण वाढेल. पण सहकाऱ्यांबरोबरच्या सौहार्दपूर्ण संबंधांमुळे मदतही लगेच मिळेल. अशावेळी संवाद कौशल्य महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात कोणतीही जोखीम घेऊ नका. विचारपूर्वक सौदे अधवा करार करा. खर्चावर नियंत्रण ठेवा.


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn