Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 28 डिसेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 28 डिसेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 28, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 28 डिसेंबर 2025; वार : रविवार
    • भारतीय सौर : 07 पौष शके 1947; तिथि : अष्टमी 11:59; नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 08:42
    • योग : वरियान 10:12; करण : बालव 23:10
    • सूर्य : धनु; चंद्र : मीन; सूर्योदय : 07:09; सूर्यास्त : 18:08
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    दुर्गाष्टमी

    शाकंभरीदेवी नवरात्रौत्सव आरंभ

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा – योग आणि आयुर्वेद या एकाच वैदिक ज्ञानाच्या शाखा


    दिनविशेष

    भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी रतन टाटा

    टीम अवांतर

    भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी अशी जगभर ओळख असणाऱ्या रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होते. रतन टाटांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले होते. पुढे त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून आर्किटेक्चर बीएस आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अ‍ॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅम हे अभ्यासक्रम पूर्ण केले.

    रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहासोबत आपले करिअर सुरू केलं होतं. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे ते पाचवे अध्यक्ष बनले होते. रतन टाटा  जेव्हा टाटा समूहात आले, तेव्हा कंपनीची एकूण उलाढाल एक हजार कोटी रुपये होती. तर, 2011-12 मध्ये समूहाचा महसूल 475.721 कोटी रुपये झाला होता. टाटाने विकसित देशांमधील अनेक अशा कंपन्यांचे अधिग्रहण केले, ज्या त्यांच्या देशात सुपर ब्रॅण्ड होत्या. आज टाटा समूहाचे जाळे जगभरात पसरलेले आहे. रतन टाटा यांनी त्यांचा दोन दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत टाटा समूहाला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले.

    रतन टाटांनी टेटली, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस यासारख्या कंपन्यांचे टाटा समूहात अधिग्रहण केले. त्यांनी नॅनोसारखी कार बनवून सर्वसामान्यांचे कार घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवले होते. याशिवाय, इंडिकासारखी प्रसिद्ध कारही बाजारात आणली होती.

    हेही वाचा – स्वस्थ आरोग्य आणि आरोग्याचे विविध पैलू

    26 जुलै 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्यात टाटा समूहाचे ताज हे पंचतारांकीत हॉटेलही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. यात हॉटेलचे तर मोठे नुकसान झालेच, शिवाय तिथले काही कर्मचारीही या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यावेळी रत्न टाटा यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सढळ हाताने मदत केली होती. ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर रतन टाटा स्वत: तिथे पोहचले होते. तिथली पाहाणी करून हॉटेलला परत एकदा पूर्वीची शान मिळवून देण्यासाठी त्यांनी आर्थिक पाठबळ दिले.

    2002 मध्ये वयाच्या 65 व्या वर्षी रतन टाटांनी पहिल्यांदा निवृत्ती घेण्याचे जाहीर केले होते, मात्र, तेव्हा कंपनीनेच त्यांना निवृत्त होऊ दिले नव्हते. त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती आल्यावर कंपनीने सेवानिवृत्तीचे वय 75 वर्षे केले. त्यामुळे 28 डिसेंबर 2012 रोजी ते टाटा समूहातून निवृत्त झाले.

    रतन टाटा यांना वर्ष 2000 मध्ये पद्मभूषण तर 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये उद्योगरत्न पुरस्कारासाठी रतन टाटा यांचीच निवड केली होती. याशिवाय, अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि विविध विद्यापीठांच्या डी.लिट् नेही त्यांना गौरविण्यात आले होते. ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा सर्वोच्च ऑस्ट्रेलियन नागरी सन्मान देखील 2023 मध्ये त्यांना मिळाला.

    रतन टाटा फक्त उद्योग विश्वासाठीच नव्हे तर, सर्व भारतीय समाजासाठीच आदर्श होते. ज्यांच्यापुढे सर्वांनीच आदराने नतमस्तक व्हावे, अशा काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते. 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn