Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»वास्तू आणि वेध»Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 08 मार्च 2026
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 08 मार्च 2026

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 8, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 08 मार्च 2026; वार : रविवार
    • भारतीय सौर : 17 फाल्गुन शके 1947; तिथि : पंचमी 21:10; नक्षत्र : स्वाती 13:30;
    • योग : ध्रुव 07:03; करण : कौलव 08:10;
    • सूर्य : कुंभ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:54; सूर्यास्त : 18:45;
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण;
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    रंगपंचमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!


    दिनविशेष

    प्रसिद्ध कवी, कथा-कादंबरीकार, नाटककार चिं. त्र्यं. खानोलकर

    टीम अवांतर

    प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार आणि नाटककार तसेच  ‘आरती प्रभु’ या नावाने कवितालेखन करणारे चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म 8 मार्च 1930 रोजी बागलांची राई (ता. वेंगुर्ले, जि. रत्नागिरी) इथे झाला. ‘गुरूकुल’ (लोणावळा), आकाशवाणीचे मुंबई केंद्र आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणी 1959 ते 1965 या कालखंडात त्यांनी नोकऱ्या केल्या. त्यानंतर मात्र केवळ लेखनासच वाहून घेतले.

    जोगवा, दिवेलागण, नक्षत्रांचे देणे यासारखे कवितासंग्रह, रात्र काळी घागर काळी, अजगर, कोंडुरा, त्रिशंकू यासारख्या कादंबऱ्या, एक शून्य बाजीराव, सगेसोयरे, अवध्य, कालाय तस्मै नमः यासारखी नाटके तर सनई, गणुराया आणि चानी, राखी पाखरू सारखे कथासंग्रह अशा साहित्याची निर्मिती त्यांनी केली. शिवाय बालगीते (गोपाळ गाणी), ललितनिबंध (वारा वाहे रुणझुणा) आणि  व्यक्तिचित्रे (दीपमाळ) असेही लेखन त्यांनी केले आहे. याव्यतिरिक्त रंगभूमीवर आलेली सुमारे 15 ते 20 नाटके आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या अनेक दीर्घकथा आणि  कादंबऱ्या असेही खानोलकरांचे लेखन आहे.

    आधुनिक पाश्चात्य विचारसरणी किंवा कलाविष्कार यांचे प्रत्यक्ष संस्कार खानोलकरांच्यावर नसूनही आधुनिक जाणिवेची अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात आढळतात. त्यामुळे नव-अनुभववाद, अस्तित्ववाद किंवा व्यस्ततावाद अशा कुठल्यातरी विचारसरणीत त्यांना बसविण्याचा प्रयत्न टीकाकार करतात.

    हेही वाचा – कपालभाती अभ्यासातून निरामय आरोग्य

    महाराष्ट्र शासनाची आठ पारितोषिके त्यांच्या विविध साहित्यकृतींना मिळाली. 1964 मध्ये ‘रायटर्स सेंटर’ या संस्थेतर्फे लेखनसंकल्प पुरे करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची अभ्यासवृत्ती देण्यात आली. ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ने दशावतार या लोकनाट्यप्रकाराच्या अभ्यासासाठी त्यांना संशोधन-शिष्यवृत्ती दिली (ऑक्टोबर 72 ते सप्टेंबर 74). कालाय तस्मै नमः या त्यांच्या नाट्यकृतीचे 1972 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून आकाशवाणीतर्फे निवड झाली. तिचा सर्व भारतीय भाषांत अनुवाद करण्यात आला. अशा या चतरस्त्र व्यक्तिमत्वाचे 27 एप्रिल 1976 रोजी निधन झाले.


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 17, 2026

    दर्शन कुलकर्णी शिवरात्री मधुकृष्ण त्रयोदशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 16 मार्च 2026

    March 16, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 15 ते 21 मार्च 2026

    March 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 15 मार्च 2026

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn