Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»नाणेफेक… यशस्वीपणे जगण्याची!
    ललित

    नाणेफेक… यशस्वीपणे जगण्याची!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 5, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, नाईट कॉलेजचा विद्यार्थी, कबड्डीचे सामने, कबड्डी स्पर्धा, कबड्डी सामन्याची नाणेफेक, यशस्वी आयुष्याची नाणेफेक, गुरू विद्यार्थी, विद्यार्थी प्रसाद राणे,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सतीश बर्वे

    एका प्रसिद्ध कबड्डी सामान्यांच्या स्पर्धेला मी उपस्थित होतो. मैदान खचाखच भरलेले होते. मला जेमतेम मुख्य दरवाज्याजवळ उभे राहण्यापुरती जागा मिळाली होती. आयोजक प्रमुख पाहुण्यांची वाट बघत होते. इतक्यात गलका झाला… “आले रे पाहुणे.” इतरांप्रमाणेच मी देखील पाय उंचावून पाहुणे कोण आहेत, ते बघत होतो. पाहुणे आत शिरता शिरता त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि मी चपापलो. कारण प्रमुख पाहुणे म्हणजे माझा नाईट कॉलेजचा विद्यार्थी होता प्रसाद राणे. त्याला काहीतरी बोलायचे होते, असे वाटले मला क्षणभर… पण आयोजकाच्या गराड्यात ते जमले नसावे त्याला! तो सगळा लवाजमा स्टेजच्या दिशेने जायला लागला आणि माझ्या नजरेसमोर पंधरा वर्षांपूर्वीचा काळ उभा राहिला.

    सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्यापोटी मी एका नाईट कॉलेजमध्ये शिकवत असे. तिथे येणाऱ्या सर्वांबद्दल मला खूप अभिमान वाटायचा, कारण जगण्यासाठी ती मुले नोकरी करायची आणि आयुष्यात कोणीतरी मोठे होण्यासाठी ती शिकायला यायची. त्यातलाच एक होता प्रसाद राणे. कोकणातून लालबागला आपल्या मामाकडे रहायला आलेला. इथे राहून चार पैसे कमावून आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचे स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणारा एक होतकरू मुलगा! शेअर बाजारातील एका ब्रोकरकडे काम करून रात्री शिकायला यायचा. हुशार, चुणचुणीत होता. आकलनशक्ती चांगली होती त्याची. वाणिज्य शाखेतून पदवीधर होऊन त्याला बँकेत नोकरी करायची इच्छा होती.  बघता बघता तीन वर्षे निघून गेली आणि कॉलेज संपून बाहेरच्या जगात प्रवेश करायची वेळ आली. पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या मी… आणि तोच होता आमच्या सगळ्यांच्या भेटीचा शेवटचा दिवस.

    हेही वाचा – त्याची अन् माझी शेवटची इच्छा…!

    त्यानंतर जवळपास तीन-चार वर्षांनी प्रसादसारखाच दिसणारा एक मुलगा मला चर्चगेट स्टेशनवर गाडीतून उतरताना दिसला. त्याच्या पोषाखावरून तो बहुतेक बऱ्यापैकी आयुष्यात स्थिरावलेला वाटला. मी त्याला हाक मारली. त्याने क्षणभर मागे वळून बघितले खरे, पण ओळख न देताच तो निघून गेला पुढे! कदाचित माझी ओळखण्यात चूक झाली असावी, असे समजून मी ही गोष्ट विसरून गेलो. पण त्यावेळी मी बरोबर होतो, हे मला त्या दिवसानंतर सहा महिन्यांनी कळले… जेव्हा एका मित्रांसोबत मी योगायोगाने नरिमन पॉइंटला एका बँकेत त्याच्या कर्जाच्या कामासाठी गेलो होतो. तिथे चक्क प्रसाद दिसला मला, पण का कोण जाणे त्याने ओळख नाही दिली. मला आश्चर्य जरूर वाटले, पण तो असा का वागतो आहे? ते कळत नव्हते.

    त्या दिवसानंतर प्रसाद मला आज दिसला इतक्या वर्षांनी आणि ते देखील एका राजकीय पक्षाचा मोठा नेता आणि कबड्डी सामन्यांना आलेला प्रमुख पाहुणा म्हणून!

    इतक्यात माझ्या पाठीवर कोणीतरी थाप मारली. मी मागे वळून बघितले. एक अनोळखी मुलगा मला म्हणाला, “पाहुण्यांना तुम्हाला भेटायचे आहे…” मी साधा बर्मुडा आणि टी शर्ट घातला होता. त्यामुळे मी त्या मुलाला म्हटले, “अरे, अशा कपड्यात मला त्यांना भेटायला लाज वाटेल. स्टेजवर सगळे मोठे लोक बसलेले आहेत. त्यांना जाऊन सांग मला जमणार नाही म्हणून.” तो मुलगा गेला आणि मी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण प्रकरण एवढ्यावर थांबणारे नव्हते, हे मला पुढच्या पाच मिनिटांत समजले.

    नाणेफेकीसाठी सर्व पाहुणे मैदानात आले. पण प्रसाद आयोजकांसोबत आणखी काही पावले पुढे चालत येऊन माझ्याजवळ आला आणि मला हात जोडून नमस्कार केला. त्याच्या या अचानक अशा वागण्याने सगळे आजूबाजूचे जमलेले माझ्याकडे बघायला लागले…

    हेही वाचा – संसाराच्या आईस्क्रीमचे तीन फ्लेवर्स!

    मीच मग बोलायला सुरवात केली “नंतर बोलू आपण. आधीच उशीर झाला आहे. सामने सुरू कधी होणार? सगळे खोळंबले आहेत. तुम्ही पाहुणे मंडळी आरामात येता. जा आधी नाणेफेक कर तू!”

    असं मी म्हणताच प्रसादने मला हात धरून मैदानाच्या आत नेले, थोडे बाजूला आणि म्हणाला “तुम्ही दोनदा भेटलात, पण मी ओळख दिली नाही, त्याबद्दल माफ करा मला. मी असं का वागलो, तेच कळत नाहीये मला. नाईट कॉलेजमध्ये आयुष्याच्या मैदानावर उभं राहण्यासाठी ताकद दिलीत तुम्ही, ते नाही विसरलेलो मी. आता यशस्वीपणे जगण्याची नाणेफेक मला तुमच्या आशीर्वादाने जिंकायची आहे. मी एका राजकीय पक्षात जरूर मोठ्या पदावर आहे, पण तुम्हाला ओळख नाकारून मी माझ्याच नजरेतून उतरलो आहे. मला मोठ्या मनाने माफ करा आणि तुमचा मोबाइल नंबर द्या. आपण सवडीने भेटून बोलूया.”

    “ठीक आहे. तुझी चूक तुला कळली यात सगळे आले…” असे म्हणून मी त्याला माझा नंबर दिला आणि आम्ही दोघे त्याच्यासाठी खोळंबून उभ्या असलेल्या कबड्डीच्या दोन्ही संघांच्या जवळ गेलो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी…

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn