Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»मैत्रीण»मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!
    मैत्रीण

    मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 10, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मोठी आई, मोठी आईचे प्रेम, मुलांचा सन्मान, लहानांचा सन्मान राखणे, मोठ्या आईची शिकवण, मोठ्या आईचे विचार, देवभोळी मोठी आई, मोठ्या आईचा अबोला,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    माझ्या आयुष्यातली हीरोइन म्हणजे माझी मोठी आई. म्हणजे आप्पांची (बाबा) आई. तशा मला दोन मोठी आई. एक आप्पांची आई आणि एक मामाची, म्हणजे आईची आई. आजची उत्सवमूर्ती आहे, आप्पांची मोठी आई, म्हणजे इंदिराबाई वसंतराव नाईक. तिच्याबद्दल नाईकांची ‘इंदिरा गांधी’ असे बरेच जण बोलायचे. आप्पाई असे माझा मुलगा तिला म्हणायचा.

    काळा नाही, पण गडद सावळा रंग. खूप देखणा चेहरा. अतिशय हुशार (फक्त प्राथमिक शिक्षण; लिहता-वाचता येईल एवढंच). रोज वर्तमानपत्र वाचलंच पाहिजे, हा दंडक. राजकारणावर अगदी हिरीरीने बोलायची. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रभात फेरीमध्ये देशभक्तीपर गाणी गात फिरायची. न शिकता उत्तम हार्मोनियम वाजवायची… सकाळी उठल्यावर सर्वप्रथम  चहा, मग आंघोळ, पूजा आवरून गिरगावात सगळ्या देवळांना भेट देऊन घरी. अगदी पार माधव बागेत फेरफटका असायचा. तोपर्यंत तोंडांत पाण्याचा थेंब नाही घ्यायची. देवांची भेट घेऊन घरी आली की, आधी चहा पाव खाऊन मग पाणी प्यायची. माझ्या मुलीच्या जन्मापर्यंत तिचा हाच परिपाठ होता.

    हेही वाचा – सदाफुली, माईफुली अन् राजूफुली…

    शिस्तप्रिय होतीच ती, पण एक भारी गुण होता तिच्यात… मी भारी हूड होते. मस्ती, मारामारी करण्यात एक्सपर्टच होते. जर का कोणी माझी तक्रार घेऊन घरी आलच तर, ती काही त्यांना सोडायची नाही. त्या मुलांच्या आईलाच रडवेली करून पाठवायची. कशावरून माझ्या नातीने त्रास दिला? तुझा मुलगा काय कमीचा आहे का? असे म्हणून समोरच्या पार्टीला पळवून लावायची. पण, ती मूर्ख नव्हती. तिला तिची नात कशी आहे, ते चांगलंच माहीत होतं. या सगळ्या प्रकरणानंतर ती माझ्याशी कट्टी घ्यायची. पूर्ण अबोला…!

    बरं, तिला एक सवय होती. दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर ती केळी खायची आणि घरातल्या सगळ्यांना ती प्रसाद दिल्यासारखा तुकडा हातावर ठेवायची. आता हा सुद्धा आमचा रोजचा परिपाठ. पण जेव्हा ती अबोला धरायची तेव्हा केळ्यांचा तुकडा मला मिळायचा नाही. ती माझी शिक्षा असायची.

    हेही वाचा – अभ्यास एके अभ्यास… पाठ सोडेना!

    एकदा मोठी आई चार दिवस आत्याकडे राहायला गेली होती, तेव्हा खेळताना काहीतरी कुरबुर झाली. एक मुलगा त्याच्या आईला घेऊन आला. झालं तेव्हा आई पुढे आली आणि कसलाही विचार न करता मला मस्त धोपटलं. तेव्हापासून कानाला खडा लावला. मोठी आई नसताना वाडीत मस्ती करायची नाही. जबरदस्त मार मिळतो!

    वय वाढत गेलं… जग बदललं नाही, पण विस्तारलं. काही गोष्टी मागे पडल्या. एक गोष्ट नेमाने केली, मुलांचा बाहेरच्या माणसासमोर अपमान करायचा नाही, पण न मारता शिक्षा मात्र करायची. मोठी आजीकडून ही एक महत्त्वाची गोष्ट शिकले. आज मोठी आई नाही… पण तिने सांगितलेल्या काही गोष्टी, बऱ्याच गोष्टी अजूनही पाळते.


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    March 11, 2026 मैत्रीण

    जागतिक महिला दिन विशेष… तिचे असणे, तिचे नसणे!

    March 8, 2026 मैत्रीण

    स्वेटर… जुन्या विणी गेल्या विस्मरणात!

    March 6, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    सौंदर्याचा सुवर्णपाश!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    रेवती निलेश पांडे पंचवीस-एक वर्षांपूर्वी जवळपास सगळ्यांच्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्या नातेवाईकांकडे जायच्या. काका, मामा, मावशी यांच्याकडे…

    जागतिक महिला दिन विशेष… तिचे असणे, तिचे नसणे!

    March 8, 2026

    स्वेटर… जुन्या विणी गेल्या विस्मरणात!

    March 6, 2026

    ‘आदर्श’ बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!

    March 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn