Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»गैरसमज… पुत्राचे पितृप्रेम!
    ललित

    गैरसमज… पुत्राचे पितृप्रेम!

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 27, 2026Updated:March 17, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, गैरसमज, पुत्राचे पितृप्रेम, मुलाचे पितृप्रेम, बाप मुलाचे नाते, एक कोटीची लॉटरी, राज आणि वडील, तरुणाचा इंटरव्ह्यू, पित्याचा मृत्यू, राजचा मुलगा, राजचा आजारी मुलगा,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिलीप कजगांवकर, पुणे

    सकाळचे साधारण 9 वाजले असावेत. ऑफिसला जाण्याची घाई, वाहनांचा आवाज आणि गर्दीच्या रस्त्याच्या कडेला समीर रिक्षाची वाट पाहत उभा होता. समोरून येणाऱ्या साधारणतः सत्तरीच्या घरातल्या आजोबांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळणार, तेवढ्यात समीरने पटकन पुढे जाऊन त्यांना सावरले.

    आजोबांना खूप घाम येत होता, छाती धडधडत होती. समीरने रिक्षा थांबवली आणि त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. आजोबांची एकंदर परिस्थिती पाहून रिक्षावाल्या काकांनी रिक्षाचे भाडे सुद्धा घेतले नाही. त्यांनी स्वतःहून आजोबांना रिसेप्शनमध्ये समीरला नेण्यात मदत केली. समीरने रिसेप्शनिस्टला काय झाले ते थोडक्यात सांगितले आणि मी घाईत असल्याचे सांगून तो निघून गेला.

    डॉक्टरांनी आजोबांना तपासले. केस खूप क्रिटिकल होती. आजोबा कोण, कुठले काहीच माहीत नव्हते. डॉक्टरांना आजोबांच्या खिशात एक कागद आणि एक एन्व्हलप मिळाले. कागदावर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून त्यांच्या मुलाचे नाव आणि अमेरिकेतील फोन नंबर होता. डॉक्टरांनी राज, म्हणजे आजोबांच्या अमेरिकेतील मुलाला फोन लावला. बराच वेळ त्याने फोन उचललाच नाही. डॉक्टरांनी चौथ्यांदा फोन केला तेव्हा राजने फोन उचलला. डॉक्टरांनी राजला त्याच्या वडिलांच्या गंभीर परिस्थितीची माहिती देऊन काय उपचार करावे लागतील, ते सांगितले. तसेच, परिस्थितीचे गांभीर्य पाहता तुम्ही इथे असावे, असे मला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

    ‘डॉक्टर, कसे शक्य आहे? मला यायला जमणार नाही. परंतु तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट द्या. कितीही खर्च झाला तरी चालेल. जो काही खर्च होईल तो मी तुम्हाला पाठवीन.’

    हा सरकारी दवाखाना आहे, त्यामुळे काहीच खर्च येणार नाही. पण लक्षात घ्या की, कदाचित तुमचे वडील फक्त एक-दोन दिवसांचेच सोबती असतील. हे सांगितल्यावरही राजने यायला स्पष्ट नकार देत, “डॉक्टर, मी जरा घाईत आहे,” म्हणत फोन ठेवला. निर्लज्जपणाचा कळस पाहून डॉक्टर क्षणभर सुन्न झाले. एक डॉक्टर म्हणून नव्हे, तर एक मुलगा म्हणूनही त्यांचे मन अस्वस्थ झाले. वीस वर्षांच्या वैद्यकीय कारकीर्दीत डॉक्टरांना असा अनुभव कधीच आला नव्हता.

    हेही वाचा – आभास… की वास्तव?

    डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, परंतु ते आजोबांना वाचवू शकले नाहीत. पुढच्याच दिवशी आजोबा गेले. डॉक्टरांनी राजला परत एकदा फोन केला.

    ‘डॉक्टर, मी येऊ शकत नाही. तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या. त्यासाठी लागणारा खर्च मी तुम्हाला पाठवीन.’

    ‘गरज नाही पैसे पाठवण्याची. तुमचे वडील माझ्या वडिलांसारखे आहेत. मी करीन खर्च,’ डॉक्टर म्हणाले. पुढे काहीही न बोलता राजने फोन ठेवला. जन्मदात्याच्या अंत्यसंस्काराला यायला मुलाला वेळ नाही, सरळसरळ यायला ‘नाही’ म्हणतो, हे खूपच धक्कादायक होते! आजची पिढी पैशामागे धावताना नातेसंबंध विसरते याचे हे ज्वलंत उदाहरण होते.

    “डॉक्टर, मी आत येऊ का?” असे विचारत एका तरुणाने डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश केला.

    “मी समीर. काल मी एका आजोबांना हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यांची तब्येत कशी आहे?” समीर विचारत होता.

    “काल मला एका इंटरव्ह्यूला जायचे होते, म्हणून मी त्यांना येथे सोडले आणि घाईघाईत गेलो. खूप दिवसांपासून मी नोकरीच्या शोधात होतो. काल इंटरव्ह्यू झाला आणि आज हवी तशी ऑफर मिळाली. आजोबांच्या आशीर्वादानेच हे सर्व शक्य झालं. आजोबांच्या औषधासाठी म्हणून मी दहा हजार रुपये द्यायला आलोय. मला त्यांना भेटता येईल का?” समीरने विचारले.

    डॉक्टरांनी त्याला आजोबांच्या मृत्यूबद्दल सांगताच समीरला रडू कोसळले. आजोबांचा मुलगा अंत्यसंस्कार करायलादेखील यायला तयार नव्हता आणि एक अनोळखी मुलगा आजोबांच्या आशीर्वादाची ताकद जाणून त्यांना भेटायला आला होता — दहा हजार रुपये घेऊन…  आणि त्यांच्या जाण्याचे कळल्यावर ढसाढसा रडत होता. डॉक्टरांनी समीरचे सांत्वन करून त्याचा पत्ता आणि फोन नंबर घेतला.

    अचानक डॉक्टरांच्या लक्षात आले की, आजोबांच्या खिशात एक एन्व्हलप होते. डॉक्टरांनी ते उघडले. त्यामध्ये एक लॉटरीचे तिकीट होते. लॉटरीचा काल लागलेला निकाल आजच्या पेपरमध्ये जाहीर झाला होता. डॉक्टरांनी मोठ्या कुतूहलाने निकाल पाहिला आणि काय आश्चर्य! त्या तिकिटाला एक कोटी रुपयांचे बक्षीस लागले होते.

    हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!

    डॉक्टरांनी राजला परत एकदा फोन केला आणि एक कोटीच्या बक्षिसाबद्दल सांगितले. “बक्षिसाच्या रकमेचे काय करायचे?” डॉक्टरांनी विचारले.

    “तुम्ही डेड बॉडी शीतगृहात ठेवा, मी येतो.” पैशाच्या मोहाने किमया केली असावी — राजने येण्याचे मान्य केले. हेही नसे थोडके!

    सांगितल्याप्रमाणे राज भारतात आला. डॉक्टरांना भेटला. आजोबांना दवाखान्यात कोणी आणले, त्यांना काय ट्रीटमेंट दिली वगैरे सर्व थोडक्यात सांगत डॉक्टरांनी राजला समीरचे डिटेल्सही दिले.

    “तुम्ही अंत्यसंस्कार करून या. त्यानंतर मी तुम्हाला लॉटरीचे तिकीट देईन,” डॉक्टरांनी सांगितले. राज वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी डेड बॉडी घेऊन गेला.

    पाच वाजले तरीही राज परत आला नाही, म्हणून डॉक्टरांनी राजला फोन केला.

    “राज, मी अजून एक तास हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यानंतर मी घरी जाईन. मी हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्येच राहतो. तुम्ही आल्यावर रिसेप्शनमधून मला फोन करा. मी तुम्हाला लॉटरीचे तिकीट देईन,” डॉक्टरांनी सांगितले.

    “आता तुम्ही कुठे आहात? किती वेळ लागेल तुम्हाला?” डॉक्टरांनी विचारले.

    “डॉक्टर, मी येणार नाही. मी आत्ताच एअरपोर्टवर पोहोचलोय.”

    “काय सांगता?” डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले.

    “मला माफ करा, डॉक्टर. मी तुम्हाला न भेटताच परत जायला निघालो.”

    “राज, अहो, पण त्या लॉटरीच्या तिकिटाचे काय करायचे? तेवढ्यासाठीच तर तुम्ही भारतात आलात ना?”

    “डॉक्टर, मी तुमच्या रिसेप्शनिस्टकडे एक ऑथॉरिटी लेटर दिले आहे. त्यामध्ये मी लिहिले आहे की, बक्षिसाच्या रकमेतील एक लाख रुपये समीरला द्यावेत आणि उरलेले हॉस्पिटलला डोनेशन द्यावे.”

    “राज, तुम्हाला पैसे नको होते तर तुम्ही इतक्या दूर का आलात?” डॉक्टरांनी आश्चर्याने विचारले.

    “डॉक्टर, तुम्ही मला बाबा क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत असा फोन केला, त्यावेळी माझ्या एकुलत्या एक मुलाला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते आणि त्याची कंडिशन सुद्धा खूप क्रिटिकल होती. मी आणि माझी पत्नी काही वर्षांपूर्वीच विभक्त झालो, त्यामुळे मुलाजवळ फक्त मीच होतो. मला तेथून निघता येत नव्हते. माझा नाईलाज होता.

    बाबा गेल्याचे तुम्ही सांगितले, त्यावेळी माझ्या मुलाचे ऑपरेशन सुरू होते. रक्ताची आवश्यकता होती. मी माझे रक्त देत होतो आणि म्हणूनच काळजावर दगड ठेवून मी सांगितले की मी येऊ शकत नाही. तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या.

    दोन तासांनी तुम्ही फोन केला. तोपर्यंत ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले होते आणि डॉक्टरांनी सांगितले की, आता काळजी करण्यासारखे नाही. मी माझ्या एका मित्राला हॉस्पिटलमध्ये थांबवले आणि भारतात आलो. मित्राला तिथे किती वेळ थांबवणार? म्हणून मी घाईघाईतच अमेरिकेला परत जातोय.”

    “डॉक्टर, तुम्ही केलेल्या मदतीबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो,” असे म्हणताना राजला आणि ते ऐकताना डॉक्टरांना अश्रू आवरता आले नाहीत.

    राजच्या वागण्याची डॉक्टरांना आलेली चीड क्षणात नाहीशी झाली आणि सत्य परिस्थितीची माहिती नसताना राजबद्दल करून घेतलेल्या गैरसमजाबद्दल त्यांना स्वतःचीच कीव आली. त्यांना जाणवले की निर्दयी वाटणाऱ्या राजच्या वागणुकीमागे असहाय्यतेची वेदना दडलेली होती.

    डॉक्टर राजला धीर देत म्हणाले, “तुमचा मुलगा लवकर बरा होवो, ही माझी परमेश्वरापाशी प्रार्थना.”

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn