Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»मानसिक आधार देणारा सलाइनचा स्टँड!
    ललित

    मानसिक आधार देणारा सलाइनचा स्टँड!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 9, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सलाईन स्टँड, सलाइनचा स्टँड, सलाईनचा स्टँड, सलाइन स्टँड, सलाइन स्टॅण्ड, मानसिक आधार, भावनिक आधार, पेशंटशी जवळीक, पेशंटशी हितगुज,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सतीश बर्वे

    मी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. दुसऱ्या मजल्यावरच्या नितीनच्या खोलीत प्रवेश केला. नितीन माझा जवळचा मित्र. जवळपास दीड महिन्यांपूर्वी याच हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत दाखल झाला होता. रात्रीच्या वेळी ऑफिसमधून घरी परतत असताना रस्त्यावरील खड्डे चुकवताना त्याच्या मोटरसायकलची एका ट्रकसोबत जोरदार टक्कर झाली. नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला होता तो. नितीन ॲडमिट झाल्यावर साधारण आठवडाभराने त्या खोलीत सहरुग्ण म्हणून 25 वर्षांचा अशोक दाखल झाला होता, अशाच काहीशा अपघाताचं निमित्त होऊन. पण नितीनच्या मानाने अशोक खूपच सुदैवी होता जखमांच्या बाबतीत.

    नितीनच्या बेडजवळच्या खुर्चीवर मी बसलो, इतक्यात नितीनने खुणेनेच मला अशोककडे बघायला सांगितले. एरवी मी खोलीत शिरता क्षणी ‘गुड मॉर्निंग चाचू’ असं माझं हसतमुखाने स्वागत करणारा अशोक आज बाजूच्या खिडकीकडे तोंड फिरवून बसला होता. त्याला बोलतं करण्यासाठी मी त्याच्या बेडजवळ जाऊन जरा जोरातच म्हणालो “आज सूर्य उगवला नाही की, काय?”

    तितक्यात मान माझ्याकडे फिरवून अशोकने माझा हात त्याच्या हातात घट्ट धरून ठेवला आणि तो अस्वस्थपणे मला म्हणाला, “चाचू मला नाही जायचं इथून, तुला सोडून!”

    “आता हे काय नवीन?”

    “मला उद्या सकाळी डिस्चार्ज देणार आहेत.”

    “अरे व्वा छान! पण मग एवढी आनंदाची बातमी सांगताना तुझ्या डोळ्यांत पाणी का बरं?”

    हेही वाचा – मनाची श्रीमंती… मित्राची अनोखी कहाणी!

    “चाचू, मी इथे या खोलीत दाखल झाल्यापासून कालपर्यंत तू मला खूप सांभाळून घेतलंस. तू तुझ्या बोलण्यातून मला खूप मानसिक आणि भावनिक आधार दिला. झालं गेलं विसरून पुन्हा नव्याने आयुष्याला हसतहसत सामोरे जाण्याची प्रेरणा दिलीस. मीच काय आपल्या या दुसऱ्या मजल्यावरच्या प्रत्येक खोलीतल्या पेशंटच्या मनात हीच भावना असेल तुझ्याबद्दल. चाचू तू नं त्या सलाइनच्या स्टँडसारखा आहेस. झाल्या आजारातून खचून न जाता लवकरात लवकर यातून बाहेर पडून जुनं आयुष्य नव्याने कसं सुरू करायला हवे, याचं सखोल मार्गदर्शनरूपी सलाइन तू आजवर प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी पोहोचवत राहिलास. तू बोलायला लागलास की, सगळं सगळं विसरून तुझं बोलणं ऐकत रहावंस वाटतं. छोटी छोटी सहज पटणारी उदाहरणं देऊन तू तुझं म्हणणं किती सहजपणे पटवून देतोस सगळ्यांना. खरंच तू फार मोठं काम करत आहेस आम्हा सगळ्या पेशंट्ससाठी. प्रत्येक जण आणि त्याच्या घरची माणसे तुला खूप दुवा देतात हे ठाऊक आहे मला. पण उद्यापासून आपली भेट होणार नाही, हे दुःख मी कसं पचवू?”

    अशोक जे बोलत होता ते तंतोतंत बरोबर होते. पण काळवेळ कोणासाठी थांबत नाही. त्याची समजूत काढायच्या हेतूने मी त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, “अशोक तुझं म्हणणं अगदी खरं आहे. देवाने दिलेलं काम समजून मी हे नि:स्वार्थीपणे करत आलोय आजवर. तू आणि इतर पेशंटना माझं बोलणं सकारात्मक विचार करायला भाग पाडतं, हेच माझे खरे समाधान आहे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अशा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जावं लागतं. अशा वेळी खचून न जाता वेळीच स्वतःला सावरून त्या नुकसानातून कमीतकमी त्रासात त्याला बाहेर पडायला लागतं. माझं बोलणं, सकारात्मक विचार, संकटातून बाहेर पडण्यासाठी पावलं कशी उचलायला हवीत, त्याचं मार्गदर्शन त्याला या कामी नक्की मदतीला येत असतील, अशी माझी खात्री आहे. माझ्याकडे बघ. मी एकटा माणूस आहे. पण म्हणून मी दुःखी नाही. मी त्यासाठी कधीच नशिबाला किंवा देवाला दोष दिला नाही. उलट, नुसत्या माझ्या बोलण्यातून इतरांच्या सर्व प्रकारच्या वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी मला भरपूर वेळ मिळाला म्हणून मी त्यांना कायमच धन्यवाद देत आलो. माझी पण आता साठी उलटून गेली आहे. तरीसुद्धा यापुढे शक्य होईल तितकी वर्ष हे काम मी नि:स्वार्थीपणे करतच रहाणार.”

    “तुला उद्या डिस्चार्ज मिळणार असला म्हणून काय झालं आपण फोनवर एकमेकांच्या संपर्कात राहूच की! तुला वाटेल तेव्हा तू मला खुशाल फोन कर. मला नक्की आवडेल ते. तू आज म्हणतोस खरा, पण हळूहळू तू तुझ्या नेहमीच्या आयुष्यात इतका गुंतून जाशील की, तुला माझी आठवण देखील येणार नाही.”

    हेही वाचा – सागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!

    “तू म्हणतोस तसा मी खरंच आहे, सलाइनचा स्टँड… जिथे गरज आहे तिथे उभं राहून आपलं काम निमूटपणे करणारा! फरक इतकाच आहे की, माझं सलाइन मनाला आवश्यक तेवढी उभारी देण्याचे काम करते जेणेकरून तुमची आजारातून लवकर सुटका होऊन तुम्ही तुमच्या घरी परतता.”

    “चाचू तू खरोखरच ऑसम आहेस. लाखात एक आहेस. आजच्या ‘मी बरं की आपलं बरं’ असं मानणाऱ्या जगात म्हणूनच तू खूप वेगळा म्हणून उठून दिसतोस. तुझ्यासारखे चाचू प्रत्येक हॉस्पिटलमधल्या पेशंटना भेटो, हीच मी प्रार्थना उद्या सकाळी इथून निघताना परमेश्वराला करणार आहे.”

    एवढं बोलल्यावर अशोकच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान मला बरंच काही सांगून गेलं.

    आज अशोक आहे. उद्या आणखी कोणी येतील… पण सलाइन स्टँडला मात्र त्याच्या आवडीचे काम करतच राहायचं आहे, त्याला स्वतःलाच सलाइन लावायला लागेल त्या क्षणापर्यंत!


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn