Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»गोरख गडाबद्दल प्रेम अन् भीतीसुद्धा!
    ललित

    गोरख गडाबद्दल प्रेम अन् भीतीसुद्धा!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 25, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मुरबाडजवळील गोरख गड, गोरख गड ट्रेकिंग, गोरख गडावरील प्रेम, गोरख गडाबद्दल भीती, गोरख गडावरचा अपघात, गोरख गडवरील घसरण,
    संग्रहित छायाचित्र
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राजीव जोशी

    27 सप्टेंबर 1990… त्या दिवशी मी त्याला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्या प्रेमात पडलो! तो म्हणजे मुरबाडजवळ देहेरी गावात असलेला ‘गोरख गड’. हा गड चढायला थोडासा अवघड. सुरुवातीला थोडीशी चढण आहे, त्या नंतर सरळ पायवाट, नंतर परत एकदा मातीची चढण आहे… त्यावरून घसरायला होतं आणि नंतर असलेला अतिशय अवघड रॉक पॅच. आजूबाजूला असलेला अतिसुंदर निसर्ग. खूप आवडला हा गड प्रेमात पडलो मी त्याच्या आणि ठरवलं की 100 वेळा तरी या गडावर यायचं!

    1990 ते 2009 या कालावधीत मी 65 वेळा गोरख गडावर आलो. या 19 वर्षांत खूप मित्र ओळखीचे माझ्याबरोबर आले. काहींना हा गड आवडला तर, काही घाबरले, काही अर्ध्या वाटेवरून परत माघारी गेले. पण…

    21 मे 2009 रोजी गडावर गेलो… बरोबर नेहमीचे चार मित्र होते. ही माझी 66वी वेळ. आम्ही गडावर गेलो नेहमी प्रमाणे एक रात्र राहिलो. रात्री खूप गप्पा झाल्या. आकाशातल्या चांदण्या वेगवेगळे तारे चंद्र. हे कधी आपण आवर्जून बघत नाही, ते बघायचो. त्या चार मित्रांपैकी एकाला खूप माहिती आहे आकाशाची! तो त्याबद्दल सांगत असे. सकाळी परत एकदा गडावर फिरलो, नास्ता केला आणि निघालो.

    हेही वाचा – फेरे नशिबाचे… तिचे भरडणे!

    गड चढताना मी नेहमी पुढे असायचो आणि उतरताना नेहमी ससगळ्यात मागे. त्या दिवशी पण मागेच होतो. हळू हळू गड उतरत होतो आणि तेवढ्यात मातीच्या उतरणीवरून माझा पाय घसरला आणि मी जवळजवळ दीडशे ते दोनशे मीटर खाली घसरून पडलो. दुपारी दोन वाजताचं ऊन… त्यात मे महिना… माती खूप तापली होती, चटके बसत होते. घसरत, वाटेतल्या दगडांवर आपटत, एका झाडावर येऊन धडकलो… थांबलो एकदाचा! पाच मिनिटं काहीच समजलं नाही. बसून राहिलो कपड्यांवरची माती झटकली आणि उभं राहायचा प्रयत्न करायला लागलो तर, मला उभं राहता येत नव्हतं. डाव्या पायाला खूप लागलं होतं, खूप खरचटलं होतं आणि गुडघा खूप सुजला होता. पाय जमिनीवर टेकवता येत नव्हता.

    हेही वाचा – मानखुर्द फलाट अन् सनी म्हणजेच ‘हृतिक’!

    खूप घाबरलो, आजूबाजूला कोणीच नाही. बरोबर असलेले मित्र खूप लांब गेले होते. माझी हाक त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. तेव्हा मीच हळू हळू बसत बसत खाली उतरायला सुरुवात केली. ऊन खूप असल्याने चटके बसत होते. पण इलाज नव्हता. खूप वेळ मी दिसलो नाही म्हणून माझे मित्र मला बघायला परत वरती आले आणि पाहतात ते माझा डावा पाय आणि गुडघा खूप सुजलेला. लगेच मित्रांनी मला पाणी दिलं आणि मला उचलून गडाखाली आणलं. खूप ठणका लागल्या होत्या, पाय सरळ पण करता येत नव्हता.

    तसंच घरी यायला निघालो, वाटेत हॉस्पिटल लागलं. त्या हॉस्पिटलमध्ये गेलो पाय दाखवला एक्सरे काढला. तेव्हा समजलं की, गुडघ्याची लिगमेंट फाटली आहे. नंतर घरी आलो ट्रीटमेंट सुरू केली. थोडं बरं वाटलं. त्या दिवसानंतर आजपर्यंत मी गोरख गडावर काय, कोणत्याच गडावर गेलो नाही.

    आज सुद्धा मला धावता येत नाही, उतरताना भीती वाटते. मनातली ही भीती गेली पाहिजे. पण पुन्हा एकदा मी गोरख गडावर जाणार आहे. माहीत नाही गड चढता येईल की, नाही आणि चढून वरती गेलो तर नीट उतरता येईल की नाही… बघूया..

    जो हॊगा देखा जयेगा। मोबाइल – 9004101589

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn