Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फिल्मी»लाइट… कॅमेरा… मोबाईलची रिंग
    फिल्मी

    लाइट… कॅमेरा… मोबाईलची रिंग

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 16, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, ऐतिहासिक चित्रपट, चित्रपटाचे शूटिंग, ऐतिहासिक चित्रपट शूटिंग, इमोशनल सीन, भावनिक सीन, कॅमेरा शूटिंग, सेटवर मोबाइलची रिंग, शूटिंगमध्ये मोबाइल वाजला, राणीचे गांभीर्य, राणीचे हसणे, राणीचे हसण्यावर नियंत्रण,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    आपण कधी कधी खूप महत्त्वाचं काहीतरी करत असतो आणि त्यात काही ना काही कॉमेडी घडून जाते. नकळतपणे घडणाऱ्या अशा घटनांवर रडावं की हसावं, हेच कळत नाही. असाच एक किस्सा आहे. मी एक ऐतिहासिक सिनेमा करत होते. महाराज आणि दिवस गेलेली महाराणी यांना त्यांचं राज्य वाचवण्याकरिता विभक्त व्हावं लागतंय. राजाचा जीव राणी आणि होणाऱ्या बाळात गुंतलाय. राणी नवऱ्यापासून किती काळ दूर रहावं लागेल म्हणून कष्टी…

    हा खूप मोठा, अतिशय महत्त्वाचा सीन होता. त्या सीनमध्ये कलाकार मंडळी पण भरपूर होती. टेक्निकली कठीण होता सीन… अतिशय भावनिक, गंभीर अशा या सीनमधील राणीची वाक्य संपत आली होती… वाक्य संपून राणी रडणार आणि सीन संपणार होता.. आम्ही शेवटाकडे आलो होतो… आणि अचानक कोणाचा तरी मोबाइल वाजला. खरंतर, शूटिंगच्या किंवा नाटकाच्या ठिकाणी मोबाइल बंद किंवा सायलेंटवर ठेवावा लागतो. आम्ही ठेवतोच! पण तो जो कोणाचा फोन होता, तो वाजला… ‘कुंडी लगाले सैंया, आ तुझे जन्नत दिखाऊं…’

    हेही वाचा – Reel पुरत्या नव्हे, Real भावना नातेसंबंधांच्या…

    झालं… आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. बरं, आमची राणी म्हणजे एकदा का हसायला लागली की, थांबतच नाही! आम्ही कोणीही आवाजाच्या दिशेने जरी पाहिलं नसलं तरी, डोळ्यांच्या कोपऱ्यातून एकमेकांना पाहात होतो. राणीने हिम्मत कायम ठेवली अन् अजिबात मूड न सोडता सीन पूर्ण केला. दिग्दर्शकांनी जसं कट म्हटलं, ती हसून हसून कोसळली. आम्ही सगळेच फुटलो होतो… खरंतर, सूर्य मावळतीला आला होता. जर राणी फुटली असती तर, तिचं हसणं आवारेपर्यंत किती वेळ गेला असता देव जाणे… आणि पुन्हा पहिल्यापासून तो सीन शूट करावा लागला असता ते आणि वेगळं!

    बापरे, अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा निर्माता आणि दिग्दर्शकाला काय टेन्शन येत असेल!

    हेही वाचा – माझ्या सेकंड इनिंगचा कौतुक सोहळा!


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avantar.creativemarketix.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026 फिल्मी

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026 फिल्मी

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    By Team AvaantarMarch 16, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आज माझ्या खूप लाडक्या अभिनेत्रीबद्दल सांगणार…

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026

    Flirting… काही असेही अनुभव!

    February 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn