Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 10, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, व्हेजिटेबल सूप, मेथी उसळ, गाजराची कोशिंबीर, उकडलेला बटाटा सोलण्याची टिप, कोबीची भाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर बनविताना या टिप्स वापरून पाहा.

    • कडधान्याची उसळ किंवा मटण, चिकन शिजवताना त्यात नारळाच्या करंवटीचा एक तुकडा धुऊन टाकावा. उसळी किंवा तसेच पदार्थ मऊ आणि लवकर शिजतात. कडकडीत रहात नाहीत. करवंटीत एक प्रकारचे पाचक असते. त्यामुळे उसळ शिजायला मदत होते. वाढताना करवंटीचा तुकडा काढायला विसरू नका.
    • सॅलेडच्या भाज्या चिरताना बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा म्हणजे भाज्या ताज्या राहतील.
    • उकडलेले बटाटे सोलताना सालासकट त्याचे चार तुकडे सुरीने करा. घाईच्या वेळेस बटाटे लवकर थंड होऊन सोलले जातील.

    हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…

    • व्हेजिटेबल सूप उकळताना चमचाभर मिल्क पावडर सुपात घातल्यास मळी दूर होऊन, स्वच्छ नितळ सूप तयार होते.
    • बऱ्याचदा भाजी नसताना काय करावे, हा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यासाठी आदल्या दिवशी अर्धी वाटी मेथ्या एक वाटी पाण्यात भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी मेथ्या पाण्यासकट फोडणीस टाकाव्यात. त्यात अर्धी वाटी खोवलेल्या ओल्या नारळाचा किस आणि कोथिंबीर घालावी. चवीप्रमाणे तिखट, मीठ घालून मऊ शिजवाव्यात. जास्त पाणी घालू नये. अतिशय वेगळ्या चवीची ही उसळ तयार होते. मेथ्या मुळातच पौष्टिक आहेत. भिजवल्यामुळे त्या अधिक पौष्टिक होतात. नारळाने पौष्टिकता वाढते आणि मधुमेहींनादेखील पथ्यकारक म्हणून देण्यास योग्य आहे.
    • कोबीची भाजी करताना, चिरून झाल्यावर धुऊन मीठ लावून ठेवावे. त्यामुळे कोबी चटकन शिजतो आणि उग्र वास येत नाही.
    • गाजराच्या कोशिंबिरीत दोन-तीन कुटाच्या (भरलेल्या) मिरच्या तळून चुरा करून घालाव्यात. कोशिंबिरीची लज्जत वाढते.

    हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना…

    • अळूची पाने खाजरी असतील तर प्रथम ती पाने धुवावीत नंतर बारीक चिरून एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे. 10-15 मिनिटे ते तसेच ठेवावे. अळूची पाने चाळणीत निथळून घ्यावीत म्हणजे खाज कमी होईल.
    • 50 ग्रॅम मेथ्यांचे पीठ आणून कोरडेच भाजून बाटलीत भरून ठेवावे आणि इडली, डोसे, धिरडी, थालिपीठ, उत्तप्पा, तांदळाचे वडे यांत पीठ भिजवताना अर्धा चमचा या प्रमाणात टाकावे. पदार्थ स्वादिष्ट आणि पौष्टिक होतो.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : बीटचा मठ्ठा, मेथीची कोफ्ताकरी, स्वादिष्ट पन्हे बनविण्याच्या टिप्स

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn