Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : बीटचा मठ्ठा, मेथीची कोफ्ताकरी, स्वादिष्ट पन्हे बनविण्याच्या टिप्स
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बीटचा मठ्ठा, मेथीची कोफ्ताकरी, स्वादिष्ट पन्हे बनविण्याच्या टिप्स

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 7, 2026Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, बीटचा मठ्ठा, मेथीची कोफ्ताकरी, स्वादिष्ट पन्हे, पावभाजीचा लालपणा, चविष्ट अळूची भाजी, भाजीत नारळाचा वापर, भाजीत दाण्याचे कूट,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. बीटचा मठ्ठा, मेथीची कोफ्ताकरी, स्वादिष्ट पन्हे बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा.

    • पानकोबी आणि फुलकोबी या भाज्यांची काही वेळा चव जाते. अशा वेळी भाजीला फोडणी देताना तेलात मोहोरी फुटल्यावर पाच-सहा मेथ्या आणि चिमूटभर ओवा टाकल्यास भाजी चवदार होते.
    • संक्रांतीनंतर हलवा आणि तिळगूळ वड्याचा भुगा उरतो. तो सर्व बारीक कुटून वांग्यांच्या भाजीत किंवा रसदार भाजीत घातल्यास दाटपणा येतोच आणि खमंगपणाही येतो.
    • साखरांबा किंवा गुळांबा उरल्यास त्यात पाणी आणि मीठ घालून, मिक्सरमध्ये घुसळून घेतल्यास स्वादिष्ट पन्हे होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, मिरचीचा ठेचा बनविताना…

    • भाजीला पीठ लावताना पाण्यात भिजवून लावावे; कमी पुरते, फार लागत नाही. त्यासाठी चणाडाळ अर्धा किलो, तांदूळ पाव किलो, तूरडाळ आणि उडीदडाळ मिळून अर्धा किलो दळून आणावे. पौष्टिकता आणि रुची वाढते.
    • नारळ खवून त्याचे दूध काढून ते अनेक पदार्थांत घातले जाते आणि त्याचा चव फेकून दिला जातो. पण हा जर फ्रीजमध्ये ठेवून, परतून केलेल्या पालेभाजीत घातला तर भाजीला फारच छान चव येते.
    • कोणत्याही पातळ भाजीमध्ये खलबत्त्यात कुटलेले शेंगदाणा कूट न घालता मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घेतलेले कूट घातल्यास नेहमीपेक्षा निम्मेच कूट लागते आणि रस्सा घट्ट होतो.
    • बीट उकडल्यावर त्याचे पाणी टाकून न देता त्यात ताक घालावे. ताकाला आले, मिरची वाटून लावून जिऱ्याची फोडणी द्यावी. मीठ आणि साखर घालून केलेला बीटचा मठ्ठा पिण्यास फारच छान लागतो.
    • अळूची भाजी प्रथम शिजल्यानंतर सर्व साहित्य घालून (मीठ, तिखट, चिंच, गूळ) सारखी करतो, तेव्हा अर्धा वाटी ताडी कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा मेथी कुटून त्यात घालावी. छान चव येते.
    • रात्रीची मेथीची भाजी उरली असल्यास, त्यात डाळीचे पीठ, मीठ, तिखट आणि चिमूटभर सोडा टाकून चांगले मळावे आणि गोल गोळे करून गुलाबी रंगावर तळावे. त्याची रसगोळ्यांची भाजी (कोफ्ताकरी) करावी. छान लागते.

    हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स

    • पावभाजीसाठी फ्लॉवर आणि मटार उकडताना त्याच्याबरोबर एक चांगले लालबुंद बीट किसून घालावे. त्यामुळे पावभाजीस तिखट कमी घालूनसुद्धा छान लाल रंग येतो आणि पावभाजीच्या चवीतही काही फरक पडत नाही.
    • टोमॅटो कापताना सुरीला किंवा विळीला तेल लावल्यावर भराभर कापला जातो. बारीक फोडी हव्या असतील तर (दोन भाग केल्यावर) आतील बाजूने कापावा.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn