Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : इडली ढोकळा, फिंगर चिप्स अन् बटाटेवडे…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : इडली ढोकळा, फिंगर चिप्स अन् बटाटेवडे…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 4, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, फूड कॉर्नर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, ढोकळा इडली, फिंगर चिप्स, बटाटेवडे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात –

    • झटपट उप्पिटाचे मिश्रण असे बनवून ठेवा – उप्पिटासाठी वापरतो ते सर्व साहित्य घ्यावे. नेहमीप्रमाणे रवा थोड्या तेलावर खमंग भाजावा. फोडणी करून फोडणीत मोहरी, उडीदडाळ, लाल सुकी मिरची, हिंग आणि रवा घालून चवीनुसार मीठ घालून मिश्रण परतावे. थंड झाल्यावर पिशव्या भरून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. पाहुणे आल्यावर अगर प्रवासात चटकन दोन वाट्या पाणी उकळून एक वाटी मिश्रण घालून वाफ आणली की उप्पीट तयार होते. सर्व्ह करताना खोबरे, कोथिंबीर घालावी.
    • ज्यावेळी आपण ढोकळा करतो, त्यावेळी तयार मिश्रण तेल लावलेल्या पसरट भांड्यात घालतो व ते भांडे कुकरमध्ये ठेवतो, पण काही वेळा ढोकळा मधूनच कच्चा होतो. काही वेळा भांडे वाकडे झाल्यामुळे वड्या लहान मोठ्या पडतात. म्हणून मिश्रण पसरट भांड्यात न घालता तेल लावलेल्या इडली पात्रात घालून त्याच्या इडल्या कराव्यात. हा इडली पात्रातील ढोकळा एकदम हलका होतो. बिघडत नाही. वरती खोबरे, कोथिंबीर घातल्यावर दिसायलाही आकर्षक दिसतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : खमंग भजी, दहिवडे, खुसखुशीत चकली बनवताना हे करून पाहा

    • आपण घरी ज्या वेळेला फिंगर चिप्स करतो, तेव्हा ते तळून झाल्यावर मीठ, तिखट लावतो. तसे न करता या पद्धतीने करून पाहावे. प्रथम एक-दोन बटाट्यांच्या चिप्सना मीठ चोळून थोडा वेळ ठेवावे. त्याला पाणी सुटते. ते ताटात पूर्ण निथळून घ्यावे. पहिल्या चिप्स तळून होईपर्यंत परत एका बटाट्याच्या चिप्स करून त्याला हे मिठाचे पाणी चोळावे. प्रत्येक वेळेला तळायच्या आधी चिप्समधून पाणी काढावे. साधारण चार-पाच बटाट्यांना हे पाणी पुरते. खारेपणा माफक प्रमाणात येतो, चिप्स सारख्या तळल्या जाऊन कुरकुरीत होतात.
    • बटाटेवड्याचे पीठ भिजवताना त्यात थोडेसे तुरीच्या डाळीचे वरण घालावे. त्यामुळे सोडा घातला नाही तरी चालतो. तसेच, पिठात थोडा भिजवलेला साबुदाणा घालावा. वडे तळल्यानंतर त्याला मोती लावल्याप्रमाणे दिसते. वडे आकर्षक दिसतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड…

    • अर्धा किलो मुगाची डाळ, एक वाटी चवळीची डाळ, चार चमचे ओवा हे सगळे मिळून अगदी बारीक दळून आणावे. त्या पिठात मोहन घालून, चवीला तिखट, मीठ घालून भिजवावे. एक किंवा अर्धा तास ठेवून मग बारीक साच्यातून शेव घालून तळावी. ही शेव फारच हलकी होते आणि दिसायला फारच नाजूक असते. ज्यांना डाळीचे पीठ म्हणजे हरभरा डाळीचे पीठ सोसत नाही, त्यांना ही शेव चांगली. मुलांना तसेच म्हाताऱ्या माणसांना पचण्यास चांगली.
    • कोणताही चिवडा करताना कांद्याची पात बारीक चिरून, धुऊन वाळवून फोडणीत घालावी. स्वाद चांगला लागतो आणि चिवड्यात मधूनमधून हिरवी पात दिसायला छान दिसते.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn