Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे…

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 31, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे, भाजीच्या इडली, मूगडाळीची सुरळी वडी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात –

    • चार ते पाच बटाटे उकडून, निवल्यावर बारीक कुस्करावेत. त्यात दोन-तीन कांदे चिरून, तळून मिसळावेत. आले, लसूण, मिरची यांची बारीक पेस्ट करून त्यात मिसळावी. वरून कोथिंबीर घालावी. आवडीप्रमाणे मीठ टाकावे. हा गोळा फ्रीजमध्ये ठेवावा. याचा उपयोग अनेक प्रकारे होईल. आयत्या वेळेस पाहुणे आल्यास बटाटेवडे करता येतील. कोणतीही रस्सा भाजी दाट आणि चवदार होण्यासाठी फोडणीमध्ये थोडेसे सारण टाकल्यास आले-लसूण वाटण्याचा त्रास वाचेल. केव्हाही पटकन खुसखुशीत पराठे करता येतील. आयत्या वेळेस पाहुणे आल्यास ‘कोफ्ता करी’सुद्धा करता येईल. फक्त कोणताही जिन्नस करावयाच्या अगोदर पंधरा-वीस मिनिटे किंवा अर्धा तास फ्रीजमधून काढून बाहेर ठेवावे.

    हेही वाचा – Kitchen Tips : आज साऊथ इंडियन डिशचा बेत आहे तर…

    • ढोकळा करण्यापूर्वी कुकरमध्ये पाणी घालून उकळायला ठेवावे. ज्या भांड्यात ढोकळा करायचा असेल त्या भांड्याला तेलाचा हात लावून तेही त्याच कुकरमध्ये गरम करायला ठेवावे. नंतर तयार असलेल्या पिठात सोडा घालून चांगले फेसावे. फेसायला लागल्यानंतर पीठ फुगू लागते. फुगलेले असतानाच ते कुकरमध्ये गरम झालेल्या भांड्यात ओतावे. भांड्यावर झाकण आणि कुकरवर शिट्टी ठेवू नये. दहा पंधरा मिनिटांनी ढोकळा सुंदर फुलून येतो. ढोकळा जास्त प्रमाणावर करायचा असेल, तर प्रत्येक घाण्यासाठी वेगळा सोडा घालणे आवश्यक आहे. सर्व पिठात एकदम सोडा घालू नये.
    • बेसन पिठाऐवजी मुगाच्या डाळीच्या पिठापासून सुरळीच्या वड्या कराव्यात. या पिठाला चिकटपणा असल्याने वड्या बिघडण्याचा शक्यता कमी आणि आहाराच्या दृष्टीनेही त्या चांगल्या. ताकाऐवजी लिंबाचा रस वापरल्यास वड्या तजेलदार आणि चकचकीत दिसतात, तसेच त्या चवीलाही उत्तम लागतात. खोबऱ्याच्या सारणाऐवजी फ्लॉवर, कोबी, गाजर यांपैकी कशाचाही कीस वाफवून त्यात मीठ, साखर, कोथिंबीर यांचे सारण घालून वड्या गुंडाळाव्यात.

    हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे…

    • आपल्या घरात नेहमी काही ना काहीतरी उरतेच, कधी चटणी तर कधी उसळ किंवा पावभाजीसारखी भाजी. तेव्हा इडलीचे पीठ नेहमीप्रमाणे करून घ्यावे. इडली तयार करताना इडलीपात्रात थोडे इडली पीठ घालावे. त्यावर ही भाजी किंवा उसळ किंवा चटणी घालावी. वरून इडली पीठ घालून बंद करावे आणि नेहमीप्रमाणे इडल्या कराव्यात. दोन-चार इडल्या चटणी आणि भाजी घालून करण्यासही हरकत नाही. ही ‘सरप्राइज्ड’ इडली सर्वांना आवडते. याच्याबरोबर चटणी किंवा सांबाराचीही जरुरी लागत नाही.
    • उडीदवडे करताना एक वाटी उडीदडाळ, मूगडाळ आणि तांदूळ या डाळी आदल्या दिवशी किंवा रात्री भिजत टाकताना कढईत थोड्या भाजून (चांगल्या गरम करून) नंतर भिजत घालाव्यात. वडे कुरकुरीत आणि खमंग होतात. वड्यांना जास्त तेल लागत नाही आणि सोडा अजिबात घालावा लागत नाही.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn