Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 23, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, सुरळीच्या वड्या, बटाटा वेफर्स, ऑम्लेट, ब्रेडरोल, दहिवडे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटा वेफर्स, ऑम्लेट, ब्रेडरोल, दहिवडे बनविण्याच्या टिप्स पाहुयात.

    • बटाट्याचे वेफर्स करताना ते बटाट्याच्या सालांसकट करावेत. त्यामुळे वेफर्स अधिक कुरकुरीत होतात आणि सत्त्वही कायम राहते.
    • अळूवडी करताना पानांना पुसटसे तेल लावले तर वड्या कुरकुरीत होतात.
    • नेहमीच्या कुकरमध्ये (शिटीशिवाय) इडली करताना चांगली वाफ आल्यावर गॅस बारीक करून झाकण थोडा वेळ काढून ठेवावे. यामुळे इडली ओलसर होते. चिकट न राहता इडलीला चांगली छिद्रे पडतात.
    • स्पाँज केक बनवताना अंड्यांच्या पांढऱ्या बलकात जाड साखर घातल्यास स्पाँज केक अधिक हलका होतो. 4 अंडी, 90 ग्रॅम जाड साखर, 60 ग्रॅम मैदा हे प्रमाण आहे.
    • रव्याचा डोसा करताना रवा फडक्यात बांधून वाफळावा आणि नंतर वाटलेल्या उडीदडाळीत मिसळावा. त्याने डोसेसुद्धा जास्त चांगले होतात आणि तांदूळ वाटण्याची मेहनत वाचते.

    हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनवताय, मग हे वाचा!

    • चकलीच्या भाजणीत एक किलो भाजणीचे साहित्य असल्यास एक मूठ गच्च भरून तुरीची डाळ भाजून घालावी. चकलीला सुंदर नळी पडून अतिशय खुसखुशीत होते.
    • ऑम्लेट अथवा हाफ फ्राय करताना आपण आधी तव्यावर तेल घालतो. त्यातच थोडे मीठ भुरभुरावे आणि ते तव्यावर पसरावे. अंडे तव्याला चिकटत नाही.
    • ब्रेड रोल करताना ब्रेडचे स्लाइस कडा काढल्यावर पाण्याऐवजी दुधाचा वापर करा. रोल तेलकट होत नाही. तळायला तेल कमी लागते.

    हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे…

    • सुरळीच्या वड्या हमखास चांगल्या होण्याचा फॉर्म्युला – एक वाटी डाळीच्या पिठाला नेहमीपेक्षा थोडे कमी ताक घालून चांगले ढवळा. नंतर गॅसवर घाटत बसण्याऐवजी ते सर्व मसाल्यासहितचे मिश्रण सरळ डाळ-भाताबरोबर कुकरमध्ये ठेवा. कुकर झाल्यावर शिजलेले मिश्रण कालथ्याने ताटात भरभर पसरून लावा. (प्लास्टिकच्या पेपरवर पसरले किंवा किचन प्लॅटफॉर्मवर पसरले तरी चालेल.) रेघा पाडून सुरळ्या करा.
    • एक कप गार दुधात एक सपाट चमचा कॉर्नफ्लोअर एकजीव करून घ्यावे. सतत ढवळत हे दूध उकळेपर्यंत तापवावे. हे मिश्रण गार झाल्यावर दहीवड्यासाठी करावयाच्या दह्यात घालून खूप घुसळावे. दह्याला अजिबात पाणी सुटत नाही.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn