Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips :  कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips :  कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 12, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, झटपट दही, फोडणीचा भात, टिकाऊ लोणी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स –

    • भाजीसाठी कोथिंबीर आवश्यक असते. पण उन्हाळ्यात पाहिजे तेव्हा ती मिळतेच असे नाही. त्यासाठी जेव्हा स्वस्त मिळेल तेव्हा जास्त प्रमाणात घ्यावी आणि निवडून ठेवावी. नंतर चिरून थोडे गोडेतेल लावून वाळवावी आणि डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरावी. जेव्हा भाजीत टाकायची असेल तेव्हा वाटीत पाणी घेऊन त्यात हवी तेवढी घ्यावी. पाच मिनिटे पाण्यात ठेवावी आणि धुऊन भाजीत टाकावी. याप्रमाणे कढीलिंबसुद्धा वाळविता येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : कढीपत्त्याची चटणी, कोकम सार…

    • सकाळी भाजी-आमटी (स्वयंपाक) करताना रोजच्या अंदाजाने थोडी जास्त फोडणी करून ठेवावी म्हणजे पदार्थात घालताना दर वेळी पातेले तापवून फोडणी करण्याचा त्रास होत नाही आणि झटपट फोडणीभात वगैरे गोष्टी कराव्या लागल्या तर करता येतात. थोड्या प्रमाणातसुद्धा म्हणजे थोडासाच भात फोडणी घालून द्यायचाय मुलांना डब्यात, अशा वेळी तयार फोडणी वापरून भातात कालवून गरम तव्यावर ताटलीत घालून ठेवल्यास छान भात तयार होतो.
    • एखादे वेळी दही आदल्या दिवशी लावायचे विसरले जाते, अशा वेळी सकाळी दुधाला विरजण लावावे आणि ते भांडे दुसऱ्या डब्यात ठेवून झाकण लावून तो डबा उन्हात ठेवावा, दोन-अडीच तासांत जेवणाच्या वेळेपर्यंत दही तयार होते. वृद्ध आणि आजाऱ्यांना हे दही पथ्थ्यकर आहे. कारण ते आंबट होत नाही. नंतर फ्रीजमध्ये ठेवावे म्हणजे थंड राहील आणि घट्टपणा येईल.

    हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस…

    • राहिलेले जास्तीचे लोणी फ्रीजमध्ये ठेवू नका, त्यालाही वास येतो. त्याकरिता लोणी बटरपेपरमध्ये गुंडाळून पॉलिथिन बॅगमध्ये ठेवावे आणि ही पिशवी बर्फाच्या कप्प्यात म्हणजेच फ्रीझरमध्ये ठेवावी. हे लोणी दोन महिने चांगल्या स्थितीत राहते. पाहिजे तेव्हा बाहेर काढून कढवता येते. लोणी कढवताना सुरुवातीपासून उलथण्याने कढईच्या तळाला खरडत रहावे. बेरी अजिबात खाली चिकटत नाही. तूप गाळल्यावर बेरीत पिठीसाखर मिसळून पोळीबरोबर चांगली लागते.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn