Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रकातील मुद्दे
    शैक्षणिक

    प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रकातील मुद्दे

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 29, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, School admission, शाळा प्रवेश, Post-admission, School Responsibility, Information Circular, प्रवेशोत्तर जबाबदारी, माहितीपत्रक, शाळेची जबाबदारी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रश्मी परांजपे

    मागील लेखात आपण पालकांच्या माहितीसाठी आणि पूर्ततेसाठी विद्यार्थीसंबंधित माहितीपत्रक तयार करताना समाविष्ट करावयाचे काही निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण माहितीपत्रकातील उर्वरित मुद्द्यांविषयी माहिती घेऊयात.

    अभ्यासक्रमातील व्यवसाय-पुस्तके

    मुलांच्या अभ्यासक्रमात व्यवसाय-पुस्तकांचा समावेश असतो. ही व्यवसाय-पुस्तके मिळण्याच्या ठिकाणाचा तपशील माहितीपत्रकात अवश्य द्यावा.

    फी भरणा

    फी भरण्याची तारीख, वेळ आणि मुदत याबाबतचा तपशील माहितीपत्रकात अवश्य नमूद असावा.

    शाळेत भेटण्याची वेळ

    • पालक शाळेत शिक्षक/शिक्षिकेला तसेच मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिकांना कधी भेटू शकतात, याविषयी सूचना माहितीपत्रकात अवश्य द्यावी.
    • वर्ग चालू असताना पालकांनी शिक्षिकेला भेटण्यास प्रतिबंध असावा.

    हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रक

    मुलांचा शाळेतील डबा

    सुरुवातीला मुलांच्या डब्यात खाऊ असू द्यावा, त्यामुळे मुलं शाळेत लवकर रमण्यास मदत होते. साधारण दोन आठवड्यानंतर शाळा पूर्ण वेळ झाल्यावर डब्यात पोळी-भाजी आणणे अनिवार्य करावे; मात्र आठवड्यातील एक दिवस खाऊ आणण्यास परवानगी द्यावी. डब्यात पोळी-भाजी आवश्यक करण्याचा नियम तंतोतंत लागू करावा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा नियम हितकारक असल्याने नक्कीच उपयुक्त ठरतो, हा माझा अनुभव आहे.

    साप्ताहिक सुट्टी

    शाळेला रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. काही शाळेत आठवड्यातील पाच दिवस वर्ग असतो आणि शनिवारी देखील सुट्टी असते. माहितीपत्रकात साप्ताहिक सुट्टीचा स्पष्ट उल्लेख असावा.

    पालकसभा

    शाळा वर्षात दोन किंवा तीन पालकसभा घेतात. पालकांना अशा सभांना अवश्य उपस्थित राहण्यास सांगावे.

    इतर सूचना

    • विद्यार्थ्यांच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने (अंगठी, रिंग, पैंजण इत्यादी) असू नयेत.
    • मुसळधार पाऊस, संप, हरताळ, आंदोलन आणि तत्सम घटना असलेल्या दिवशी मुलांना शाळेत पाठवू नये.
    • मुलाने शाळेची किंवा इतर विद्यार्थ्याची एखादी वस्तू घरी नेल्यास त्याच्याकरवीच परत करण्यास सांगावे.
    • ठोस कारण असल्याशिवाय मुलाला गैरहजर ठेवू नये.

    हेही वाचा – विद्यार्थी प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी

    सूचनापालन

    शाळेतून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन पालकांनी करावे, अशी सूचना देखील माहितीपत्रकात अवश्य असावी.

    माहितीपत्रकात समाविष्ट करावयाचे महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतल्यानंतर पुढील लेखात आपण ‘शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी’ याविषयी माहिती घेणार आहोत.

    क्रमश:


    (लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान दिले. तसेच, लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)

    मोबाईल – 9881943593


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avantar.creativemarketix.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn