Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : उर्वरित महत्त्वाचे मुद्दे
    आरोग्य

    निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : उर्वरित महत्त्वाचे मुद्दे

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेNovember 29, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, निरामय आरोग्य, कामाचे नियोजन, दैनंदिन कार्य, दिनचर्या, वैयक्तिक स्वच्छता, चालणे फिरणे, मौखिक स्वच्छता,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखांमधून आपण दिनचर्येतील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ठराविक वेळेस करावयाच्या विविध बाबींबद्दल सविस्तररीत्या जाणून घेतले. या लेखात आपण दिनचर्येतील उर्वरित महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी जाणून घेणार आहोत.

    वैयक्तिक स्वच्छता

    स्वस्थ आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छता नितांत आवश्यक आहे. दिनचर्येत यासाठी वेळ द्यायलाच पाहिजे. या दृष्टीने खालील मुद्द्यांकडे आवर्जून लक्ष द्यावे.

    • चेहर्‍याचे आरोग्य – तेल लावणे, भरपूर पाणी पिणे, अधूनमधून फेशियल आणि यासाठी पंचामृत पदार्थांचा वापर इत्यादी.
    • मौखिक आरोग्य – दातांचे आरोग्य हा शारीरिक आरोग्याचा आरसा समजतात. सकाळी उठल्यावर तसेच रात्री झोपण्यापूर्वी नियमित दंतमंजन, काहीही खाल्ल्यावर खळखळून चुळा भरणे, जीभेची स्वच्छता इत्यादी.
    • हातपाय, केस, डोळे, नाक, कान, जननेंद्रिय इत्यादीं अवयवांची निगा आणि स्वच्छता. यासाठी रोज स्नान, शक्य असल्यास सूर्यस्नान अधूनमधून अभ्यंग स्नान, मिठाच्या तसेच तुरटीच्या पाण्याने स्नान यांचा यथायोग्य अवलंब करावा.

    हेही वाचा – Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज

    चालणे, फिरायला जाणे

    चालणे हा उत्तम आरोग्यदायी विनाशुल्क व्यायाम आहे. सकाळी अथवा सायंकाळी सोयीनुसार चालावे.

    बाहेरची कामे

    सर्वांनीच दिवसातील काही वेळ बाहेरची कामे करण्यासाठी राखून ठेवावा.

    धार्मिक उपासना

    दिवसभरात धार्मिक उपासना करण्यासाठी ठराविक वेळ राखून ठेवावा. यात सर्वसाधारणपणे देवपूजा, आरती, प्रार्थना, स्तोत्र, पोथी वाचन, जप, होम, सणवार इत्यादींचा समावेश होतो.

    छंद जोपासणे

    दिवसभरातील थोडा वेळ तरी वाचन, लेखन, बागकाम, गायन/गाणी ऐकणे किंवा आवडीचा छंद यामधे रमावे. यामुळे खचितच मानसिक आरोग्य संवर्धन सुकर होते.

    हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची…

    अशा तऱ्हेने आपण दिनचर्येसंबंधीत सर्व लेखांमधून दिनचर्येतील विविध बाबींबद्दल वेळेच्या कोष्टकासहित मार्गदर्शन घेतले आहे. दिनचर्येविषयी नमूद केलेले विविध मुद्दे ध्यानात घेऊन प्रत्येकाने स्वतःला उपयुक्त असे वेळापत्रक तयार करून दिनचर्या आखावी आणि दिनचर्येचे नियमित पालन करावे. असे केल्याने मेंदूला सातत्य राखण्याची आणि लक्षपूर्वक काम करण्याची सवय आपसूकच लागते. यामुळे मनाची एकाग्रता वृद्धिंगत होण्यास साहाय्य लाभते. परिणामी, मानसिक आरोग्य समृद्ध होते. महत्त्वाची बाब म्हणजे दिनचर्येत कालानुरूप आवश्यकतेनुसार यथायोग्य बदलही करावेत.

    यासंदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत दिनचर्येतील विविध बाबींबद्दल उपयुक्त सर्वसमावेशक सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

    क्रमशः

    Author

    • रविंद्र परांजपे
      रविंद्र परांजपे
    रविंद्र परांजपे

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn