Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : नियमित योगाभ्यास
    आरोग्य

    निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : नियमित योगाभ्यास

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेNovember 15, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, व्यावसायिक आरोग्य, सखोल योगाभ्यास, पतंजली अष्टांग योग, अष्टांग योग,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दररोज ठराविक वेळेस उठणे, शौच, आहार सेवन आणि झोपणे या दिनचर्येतील विविध क्रिया केल्यास मिळणारे आरोग्य लाभ याबाबत आपण मागील लेखांमधे सविस्तररीत्या जाणून घेतले. या लेखात आपण दिनचर्येतील नियमित योगाभ्यास या  विषयासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत.

    योगाभ्यासाविषयी थोडक्यात…

    भारतीय परंपरेत योगशास्त्र हे निरामय शारीरिक आणि मानसिक आरोग्यरक्षक तसेच आरोग्यसंवर्धक वरदान आहे. मनोकायिक व्याधी-विकारांचे नियंत्रण करून त्यातून मुक्ती मिळवणे आणि मनाची एकाग्रता तसेच शरीराची निरोगी अवस्था प्राप्त करणे, हा योगाभ्यासाचा उद्देश आहे. अष्टांगयोगातून योगाभ्यासाची विशाल व्याप्ती अधोरेखित होते.

    दैनंदिन योगाभ्यासात ओंकार गुरुवंदना, सूक्ष्म व्यायाम/ पूरक हालचाली, श्वसन तथा प्राणायाम अभ्यास आणि यथाशक्ती सूर्यनमस्कार आणि योगासने यांचा समावेश असावा.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : रात्री झोपण्याची वेळ महत्त्वाची

    मला योग करायला जमेल का?

    योगाभ्यास आबालवृद्ध, विद्यार्थी, पुरुष, महिला, संसारी आणि व्याधीग्रस्त… म्हणजे सर्वांनाच सहजसाध्य आहे.

    योगाभ्यासाविषयी महत्त्वाचे निवडक मुद्दे

    • दैनंदिन नित्यकर्मात किमान एक तास स्वतःसाठी राखून ठेवणे निरामय आरोग्यासाठी नितांत आवश्यक आहे. या राखीव वेळेत योगाभ्यास म्हणजे योग साधना करावी.
    • सकाळी 6 ते 7 यावेळेत यथायोग्य आणि यथाशक्ती नियमित योगाभ्यास करावा. काही कारणास्तव सकाळी योगाभ्यास करणे शक्‍य नसेल तर, संध्याकाळी रिकाम्या पोटी योगाभ्यास करावा.
    • योगाभ्यास आणि इतर व्यायाम एकाच वेळी जोडून न करता स्वतंत्रपणे करावेत.
    • योगाभ्यास योग्य प्रमाणात तथा सुखकारक असावा.
    • योगाभ्यास मनापासून श्रद्धायुक्त अंतःकरणाने करावा.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : सकाळी लवकर उठावे

    नियमित योगाभ्यासाचे थोडक्यात फायदे

    • शारीरिक व्याधी-विकारांपासून मुक्ती आणि सुदृढ तसेच निरोगी शरीर
    • मानसिक ताणतणावांपासून मुक्ती आणि स्वास्थ्य
    • मानसिक शांती, आनंद आणि समाधान
    • जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन
    • सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास

    नियमित योगाभ्यासाचा दिनचर्येत समावेश करून नियमित वेळेस यथाशक्ती योगाभ्यास केल्यास निरामय आरोग्यप्राप्ती सुकर होईल.

    Practice Yoga Regularly. Stay Fit & Healthy.

    या संदर्भात इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ या पुस्तकात ‘नियमित योगाभ्यास’ या विषयावर सर्वांगीण सर्वसमावेशक सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे. तसेच ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकात ‘नियमित योगाभ्यासातून मनःस्वाथ्य आणि मनःशांती’ या विषयावर उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

    क्रमशः

    Author

    • रविंद्र परांजपे
      रविंद्र परांजपे
    रविंद्र परांजपे

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn