Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»आरोग्य»दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
    आरोग्य

    दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेFebruary 28, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, दीर्घ श्वसन अभ्यास, श्वसन अभ्यास, श्वसन पद्धती, श्वसन क्रिया, संथ श्वसन, जलद श्वसन,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.

    श्वसन अभ्यास

    दैनंदिन योगाभ्यासात श्वसन अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वास्तविक, दैनंदिन योगाभ्यास करताना ओंकार आणि गुरुवंदना झाल्यानंतर श्वसनमार्गशुद्धी केली जाते. यामुळे आपला योगाभ्यास सहज, सुकर आणि अधिक लाभदायक होतो.

    आता आपण श्वसन म्हणजे काय, हे जाणून घेऊयात.

    श्वसन म्हणजे काय?

    सोप्या भाषेत श्वसन म्हणजे श्वासोच्छ्वास म्हणजेच श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया होय. योगाच्या भाषेत या क्रियांना अनुक्रमे पूरक आणि रेचक असे म्हणतात.

    श्वसन क्रिया अगदी सहज आणि नैसर्गिक असून श्वसन हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा घेतलेल्या हवेतून आपल्या शरीराला प्राणवायू मिळतो आणि श्वास सोडताना शरीरातील अनावश्यक घटक हवेद्वारे बाहेर टाकले जातात आणि शरीरशुद्धी होते.

    हेही वाचा – ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    श्वसन पद्धती

    श्वसन क्रियेत पुढील पद्धतींचा समावेश होतो :

    • उदरश्वसन
    • वक्षश्वसन
    • स्कंधश्वसन
    • पूर्ण योगिक श्वसन

    आता आपण श्वसन प्रकारांबाबत जाणून घेऊयात.

    श्वसनाच्या गतीनुसार श्वसनाचे तीन प्रकार पुढील प्रमाणे आहेत :

    1. संथ श्वसन
    2. दीर्घ श्वसन
    3. जलद श्वसन

    लेखाच्या विषयानुसार आपण आता दीर्घ श्वसनाबद्दल माहिती घेऊयात.

    दीर्घ श्वसन

    विशेष प्रयत्न करून संथ श्वसनाची गती अधिक कमी केली असता होणारे श्वसन म्हणजे दीर्घ श्वसन होय. दीर्घ श्वसन ही एक ऐच्छिक क्रिया आहे.

    दीर्घ श्वसन अभ्यासाची पूर्वतयारी

    पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन अथवा सहजासन घेऊन ताठ बसावे. हातांची ज्ञानमुद्रा करावी. संथ श्वसन करत रहावे. तद्नंतर दीर्घ श्वसन अभ्यास सुरू करावा.

    दीर्घ श्वसनात दीर्घ पूरक आणि प्रदीर्घ रेचक अपेक्षित आहे. सुरुवातीला पूरक आणि रेचक यांचा कालावधी सारखा असावा. यासाठी मनातल्या मनात आकडे मोजावेत. पूरक आणि रेचक यांचे 1:1 हे प्रमाण सरावाने 1:2 असे करावे, तसेच पूरक-रेचकाचा कालावधी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.

    हेही वाचा – योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य

    दीर्घ श्वसनाचे मानसिक आरोग्य लाभ

    • मन शांत होते.
    • मनाची एकाग्रता वाढते.
    • मानसिक ताणतणाव कमी होतात.
    • मानसिक स्वास्थ्य लाभते.

    नियमित दीर्घ श्वसनाचा सराव केल्यास प्राणायाम अभ्यासाचा भक्कम पाया तयार होतो.

    योगसाधनेतील श्वसन पद्धती आणि प्रकार तसेच दीर्घ श्वसन या सर्व अभ्यासाच्या कृती तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक व मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.

    योगाभ्यासातील अशाच एका समाविष्ट विषयाच्या अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सअॅप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    Author

    • रविंद्र परांजपे
      रविंद्र परांजपे
    रविंद्र परांजपे

    Related Posts

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    By रविंद्र परांजपेMarch 14, 2026

    मागील लेखात आपण योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले.…

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    March 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn