Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»गोफ… सुखद आठवणींचा!
    ललित

    गोफ… सुखद आठवणींचा!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 6, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मंगळागौरीचा उत्साह, मंगळागौर पूजन, मंगळागौर खेळ, मंगळागौर गोफ, गोफ विणणे, सुखदु:खाचा गोफ, सुखद आठवणींचा गोफ, सुखद आठवणी, आठवणींचा गोफ विणणे, नव्याने गोफ विणू, गोफ सोडवणे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली मंगेश महाशब्दे

    आज वाड्यात खूप गडबड होती. शेजारच्या सुमाची मंगळागौर होती. मग काय विचारता सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. वाड्यामध्ये तुमचे आमचे असे काही नसते, त्यामुळे ही मंगळागौर सगळ्यांच्याच घरचा सोहळा होता. सकाळी सगळेजण आवरून पूजेच्या, स्वयंपाकाच्या तयारीला लागले. नुकतेच लग्न झालेली सुमा तिच्या नवऱ्याबरोबर पूजेला बसली होती. तिच्या दोन-तीन मैत्रिणी आणि वाड्यातील नवीन सूना अशा छान पाच-सहा जणी सुमाबरोबर पूजेसाठी बसल्या होत्या. यथासांग पूजा पार पडली. उखाणे घेत, एकमेकांना घास भरवत सगळ्यांची जेवणं झाली. संध्याकाळच्या कार्यक्रमाची आठवण करून देत सगळेजण घरी गेले.

    संध्याकाळी सगळेजण वाड्याच्या मधल्या चौकात जमा झाले. तसेतर मंगळागौरीचे खेळ हा बायकांचा कार्यक्रम… पण आमच्या वाड्यात पुरुषमंडळीपण उत्साहाने सगळे खेळ खेळतात बरं का! झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, लाट्या असे एकेक खेळ सुरू होते. वाड्यातील सर्वचजण आनंदाने उत्साहाने सगळे खेळ खेळत होते. सगळे खेळ गाणी म्हणत, एकमेकांना चिडवत, एकमेकांच्या बरोबरीने सुरू होते. नंतर सगळ्या पुरुष मंडळींनी गोफ विणायला आणला. वाड्यातील सगळ्यांच्या घरातून वेगवेगळ्या रंगाच्या ओढण्या, साड्या गोळा करून गोफ विणायला सुरुवात झाली. या वस्तू प्रत्येक घरातून आलेल्या होत्या, ते पण कोणाला काही न सांगता. मग काय विचारता आपल्या वस्तू दिसल्यावर सगळ्याजणी गोंधळ घालू लागल्या. पण पुरुष मंडळींनी गोफ विणायला सुरुवात केलेली होती, त्यामुळे कोणालाच साडी, ओढणी घेता येईना! येथे पण सगळ्या पुरुष मंडळींनी खूपच धमाल केली. गाणी तर इतकी छान म्हणत होते, इतक्या सफाईदारपणे नाचत होते की, कधी गोफ विणून झाला कळलेच नाही. सगळेजण खूपच खूश झाले…

    हेही वाचा – कडकलक्ष्मी… समाजातील एक अभागिनी!

    गोफ विणून झाला आणि पुरुष मंडळींनी ज्यांच्या-ज्यांच्या साड्या ओढण्या वापरल्या होत्या, त्या सगळ्या बायकांना बोलावले. गोफ त्यांच्या हातात दिला आणि गोफ सोडवून आपली साडी-ओढणी घेऊन जा, असे सांगितले… पण सोडताना आयुष्यातील एकेक छान आठवण सांगायची, असेही सांगितले. मग काय विचारतां सगळ्या बायका आठवणींचा हा गोफ सोडवू लागल्या. गोड आठवणी सांगताना कधी हसू येत होते तर, कधी नकळत डोळे पाणावत होते. आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात किती छान छान गोष्टी होऊन गेल्या, हे आपण कधी बघितलेच नाही, असेही क्षणभर सगळ्या जणींना वाटले. किती छान गोफ विणला गेला आणि तितक्याच छान पद्धतीने तो सोडवला पण गेला. सगळ्याच जणींना खूप छान आठवणी देऊन रात्रभर मंगळागौर जागून हा खेळ संपला आणि सगळे जण आपापल्या घरी गेले.

    हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…

    घरी आल्यावर पण सगळ्यांच्या डोळ्यासमोरून आठवणींचा गोफ काही जात नव्हता. खरंच, आयुष्यात आपण नेहमीच वेगवेगळ्या आठवणींचा गोफ विणतच असतो, पण आज लक्षात आले की, तो गोफ कधी-कधी सोडवून त्या आठवणी पुन्हा जगायच्या/ जागवायच्या असतात. त्यामधील व्यक्ती, घटना, जागा, वस्तू यांचा पुन्हा सुखद स्पर्श अनुभवायचा, नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी पहिले विणलेला गोफ थोडा मोकळा करायचा. कधी-कधी सगळ्यांच्या बरोबर तर, कधी एकटे असताना हा गोफ नक्की सोडवला पाहिजे, तसेच तो गोफ विणला पण पाहिजे! हा गोफ खूप हलका पण विणायचा नाही की, जेणेकरून मधील पोकळी जाणवेल आणि खूप घट्ट पण विणायचा नाही, जेणेकरून कधी जर सोडवायचे ठरवले तर, त्या धाग्यांवर वळ पडलेले दिसतील…

    मग काय चला गोफ नव्याने विणायला सुरुवात करू… तत्पूर्वी, आधी विणलेला थोडा मोकळा करू जेणेकरून थोडावेळ भूतकाळातील छान काळ पुन्हा अनुभवता येईल. असाच विचार घेऊन आपण सगळेजण हा गोफ विणणार आहोत. कधी दोन पावलं मागे जाऊ तर, कधी दोन पावलं पुढे… वेगवेगळ्या रंगांचा /आठवणींचा हा गोफ सगळेजण छान विणूया.


    मोबाइल – 9730020494

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn