Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»शैक्षणिक»गेले ते दिन गेले…
    शैक्षणिक

    गेले ते दिन गेले…

    Team AvaantarBy Team AvaantarJune 13, 2025Updated:March 17, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    school
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    संजय श्रीराम जोग

    ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे 13 जून या इंग्रजांना त्याज्य अशा 13 तारखेला आमच्या वेळेस शाळा नेमेचि सुरू व्हायची. उन्हाळ्याने त्रासलेले मुंबईकर ज्या ओढीने आभाळाकडे डोळे लावतात, त्याच चातकाच्या ओढीने सुट्टीचे अजीर्ण झालेले विद्यार्थी 13 जूनची वाट पहायचे. 1 तारखेपासूनच याची आद्य तयारी सुरू व्हायची. नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके वह्या, दप्तर आणि रेनकोट असा जामानिमा असायचा.

    जूनच्या 7 तारखेला मृग नक्षत्र लागूनही बरेचदा पाऊस लांबायचा आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागताला हजर व्हायचा. कमालीचा दुर्मिळ योगायोग पहा की, मातीत पडणार्‍या पहिल्या थेंबाने दरवळणारा सुगंध आणि कोर्‍या वह्या-पुस्तकांचा सुगंध एकाच दिवशी घ्यायला मिळायचा.

    आमच्या पार्ले टिळक विद्यालयात, रोज शाळा सुरू होताना एका गाण्याची ध्वनीफित वाजवली जायची. पहिल्या दिवशी बरेचदा निसर्गाचे यथार्थ वर्णन करणारे “नाच रे मोरा आंब्याच्या वनात…” या गाण्यातील “ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे…” या चपलख ओळी कानावर पडायच्या.

    तसे रोजच शाळा सुरू होताना कोणती ना कोणती ध्वनीफित वाजायचीच, जी एक वातावरण निर्मिती करायची. सकाळच्या सत्राची सुरुवात बहुतेक वेळा “उठी उठी गोपाळा…” या ध्वनीफितीने केली जायची.

    हेही वाचा – शिक्षा नको, सुसंवाद हवा

    आमची शाळा 1920 साली स्थापन झाली. तेव्हापासून पु. ल. देशपांडे यांच्यासारखे अनेक दिग्गज नामवंत या शाळेने घडवले, जे वेगवेगळ्या क्षेत्रात नावारुपाला आले. शाळा खर्‍या अर्थाने नावारुपाला आली ती नी. र. सहस्रबुद्धे सरांच्या काळात! त्यांच्या परीस स्पर्शाने शाळेचे इवलेसे रोप थेट गगनावेरी गेले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्तायादीत निदान डझनभर तरी विद्यार्थी आमच्याच शाळेचे असायचे.

    शाळेत जसे अभ्यासाचे वातावरण होते तसे खेळांचेही होतेच की! बाकीच्या शाळांना हेवा वाटावा असे पटांगण होते, जिथे विद्यार्थी मनोसोक्त खेळायचे अगदी कब्बडी, खो खो यासारख्या स्पर्धाही व्हायच्या, ज्याच्या अनेक ट्रॉफी आजही शाळेत पहावयास मिळतील.

    अशा या शाळेचा पहिला दिवस नेहमीच खास वाटायचा, कारण निसर्ग जसा पहिल्या पावसात कात टाकतो, तसे सर्व विद्यार्थी गतवर्षीच्या यशापशयाची कात टाकून पुढे प्रवेश करताना दिसण्याचा तो दिवस असे. बऱ्याचशा जुन्या आणि काही नव्या मित्रमंडळींबरोबर प्रवास सुरू व्हायचा हा दिवस, जो नेहमीच स्मरणात राहतो, हे खरे!

    हेही वाचा – ऋणानुबंधांच्या गाठी

    आता हा सगळा भूतकाळ झाला असला तरी, सगळे कसे चलचित्राप्रमाणे अजूनही मनात रुंजी घालते… आणि नकळत ओठांवर शब्द उमटतात…

    गेले ते दिन गेले
    वेगवेगळी फुले उमलली
    रचुनी त्यांचे झेले
    एकमेकांवरी उधळले
    गेले ते दिन गेले…

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026 शैक्षणिक

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026 शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026 शैक्षणिक

    No Comments

    1. VINAY GOGATE on June 13, 2025 9:30 pm

      Excellent Mr.Sanjay Jog

      Reply
    2. VINAY GOGATE on June 13, 2025 9:30 pm

      Excellent Mr.Sanjay Jog
      Thanks

      Reply
      • Team Avaantar on July 13, 2025 11:25 pm

        धन्यवाद

        Reply
    3. Pingback: आजचे पंचांग आणि दिनविशेष : 22 जून 2025 - Avaantar

    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    शैक्षणिक

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    By रश्मी परांजपेMarch 16, 2026

    मागील लेखात आपण शिशुगटातील विज्ञान शिक्षण या विषयी सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालगटातील…

    शाळाशाळांमध्ये नाट्यकलावंतांचा शोध घेण्याची गरज

    March 10, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : शिशुगटातील विज्ञान शिक्षण

    March 9, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना गणित उत्तमरीत्या शिकवूया

    March 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn