Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»अलंकार… भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे
    अवांतर

    अलंकार… भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारे

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 27, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीसाहित्य, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी भाषेतील अलंकार, मराठी भाषा अलंकार, भाषेचे सौंदर्य, भाषेचे दागिने, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा गौरव, मराठी स्वाभिमान, मराठी भाषा सौंदर्य,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    प्रणाली मंगेश महाशब्दे

    अलंकार म्हणजे दागिने. प्रत्येक दागिना महत्त्वाचा. प्रत्येक दागिना आकारात वेगळा तसेच वेगवेगळे धातू वापरून तयार होतो… आणि जेव्हा हे तयार झालेले अलंकार घालून एखादी स्त्री मिरवते,, तेव्हा ती अजूनच सौंदर्यवती दिसते.

    खरंच अलंकार हे सौंदर्य वाढवतात…

    आपली माय असो नाही तर, आपली माय-मराठी… सौंदर्याची खाणच आहेत! संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” आणि असे रत्नजडीत अलंकार लेवून आपली माय मराठी खूपच सुंदर दिसते. शुद्धलेखन, विरामचिन्हे, व्याकरणातील वेगवेगळे नियम हे आपल्या भाषेतील रत्ने आहेत.

    आपल्या या मराठी भाषेचे वर्णन सर्वांनीच वेगवेगळ्या प्रकारे केले आहे…

    अलवार कधी, तलवार कधी

    कधी पैठणी सुबक नऊवार

    कधी कस्तुरीचा दरवळ दैवी

    तर कधी सप्तसुरांवर स्वार

    तर कधी

    माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट,

    माझ्या मराठीचा छंद, मना नित्य मोहवीत,

    ज्ञानोबांची, तुकयांची, मुक्तेशांची, जनाईची

    माझी मराठी चोखडी, रामदास, शिवरायांची…

    यामध्ये महत्त्वाचे हेच आहे की,

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

    जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी,

    धर्मपंथ जात एक जाणतो मराठी,

    एवढ्या जगात माय मानतो मराठी…

    अशा या आपल्या माय मराठी मध्ये ‘अलंकार’ हा खूप छान व्याकरणामध्ये भाग आहे. तसे तर शब्दालंकार, अर्थालंकार आणि उभयालंकार असे अलंकाराचे एकूण तीन प्रकार मानले आहेत. परंतु, त्यामध्ये परत अनेक प्रकार येतात.

    हेही वाचा – अबोला… जास्त किंवा कमी दोन्ही घातकच!

    यातील काहींची नावे :

    1. उपमा – दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते, तेथे उपमा अलंकार होतो.

    उदा. – सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी…

    2. विरोधाभास – एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.

    उदा. – जरी आंधळी मी तुला पाहते…

    3 व्यतिरेक – जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा ‘व्यतिरेक’ अलंकार होतो.

    उदा. – अमृताहूनि गोड नाम तुझे देवा…

    सावळा गं रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहून लाजून, चंद्र आभाळी लोपतो…

    4. दृष्टान्त – एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.

    उदा. – लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा…

    हरिणीचे पाडस | व्याघ्रे धरियले || मजलागी जाहले | तैसे देवा ||

    5. चेतनगुणोक्ती – जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे, असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते, तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ हा अलंकार होतो.

    उदा. – चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ||

    हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!

    6. स्वभावोक्ती – एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.

    उदा. – यासाठी बा.सी.मर्ढेकर यांची ही पूर्ण कविताच :

    गणपत वाणी

    गणपत वाणी बिडी पिताना
    चावायाचा नुसतीच काडी;
    म्हणायचा अन मनाशीच की
    या जागेवर बांधिन माडी;

    मिचकावुनि मग उजवा डोळा
    आणि उडवुनी डावी भूवयी,
    भिरकावुनि ती तशीच द्यायचा
    लकेर बेचव जैसा गवयी.

    गिर्‍हाईकाची कदर राखणे;
    जिरे, धणे अन धान्यें गळित,
    खोबरेल अन तेल तिळीचे
    विकून बसणे हिशेब कोळित;

    स्वप्नांवरती धूर सांडणे
    क्वचित बिडीचा वा पणतीचा
    मिणमिण जळत्या; आणि लेटणे
    वाचित गाथा श्रीतुकयाचा.

    गोणपटावर विटकररंगी
    सतरंजी अन उशास पोते;
    आडोशाला वास तुपाचा;
    असे झोपणे माहित होते.

    काडे गणपत वाण्याने ज्या
    हाडांची ही ऐशी केली
    दुकानातल्या जमीनीस ती
    सदैव रुतली आणिक रुतली.

    काड्या गणपत वाण्याने ज्या
    चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
    दुकानांतल्या जमीनीस त्या
    सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

    गणपत वाणी बिडी बापडा
    पितांपितांना मरून गेला;
    एक मागता डोळे दोन
    देव देतसे जन्मांधाला!

    7. यमक – एखादा शब्द किंवा अक्षर पुनः पुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.

    उदा. – मना चंदनाचे परी त्वा झिजावे |परी अंतरी सज्जना नीववावे ||

    सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो

    8. अनुप्रास – जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा पद्यचरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्यनिर्मिती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

    उदा. – काकांच्या कामाची कागदपत्रे काकींनी कात्रीने कराकरा कापली.

    9. अन्योक्ती – जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये अगर पद्यात दुसऱ्याला स्पष्टपणे न बोलता उद्देशून बोललेले असते, तेव्हा अन्योक्ती अलंकार होतो.

    उदा. – सरड्याची धाव कुंपणापर्यंत…

    आज मराठी भाषा गौरव दिन त्यानिमित्त हे काही अलंकार लेवून आपली माय मराठी आपल्या सर्वांबरोबर बोलत आहे. तेव्हा नक्कीच आपण सर्वजण या गप्पांमध्ये सहभागी होऊ.


    मोबाइल – 9730020494

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn