Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अवांतर»वेगवान मुंबईचा लागतो लळा!
    अवांतर

    वेगवान मुंबईचा लागतो लळा!

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 29, 2026Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मुंबई महानगरी, मुंबईप्रेम, स्वप्नांची मुंबई, स्वप्नपूर्तीची मुंबई, आपलेसे करणारी मुंबई, कष्टकऱ्यांची मुंबई, जागती मुंबई, कधीही न झोपणारी मुंबई,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मानसी देशपांडे

    आजचा विषय थोडा वेगळा आहे, तो आहे ‘मुंबई’! मला कल्पना आहे, हा लेख वाचणारे सगळेच मुंबईकर नाहीत, पण मी स्वतः मुंबईची असल्यामुळे थोडा हळवेपणा आहे. मुंबई ही काहीजणांसाठी मायानगरी आहे. पण ही कधीच झोपत नाही. आजच्या तारखेला सुद्धा नोकरीनिमित्ताने अनेक लोक येथे येतात, ज्यांना ही मुंबई आपल्यात सामावून घेते. बघा, काहींना नाईलाजास्तव देखील इथे यावं लागतं. कारण, उदरनिर्वाहाला इथे कमी नाही. जसं व.पु. म्हणतात, ” प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण केवळ स्टेशनपर्यंत पोहोचवतो, पुढचा प्रवास तो स्वतःच्या हिमतीवर करतो…” अगदी काहीसं असंच आहे. मुंबई ही अतिशय वेगवान आहे. इथे तुम्हाला आणून जरी ठेवलं तरी वेळ पाळणं आणि मेहनत करून आपला जम बसवणं, हे तुम्हालाच करणं भाग आहे.

    अनेकांच्या कुटुंबाचं पालनपोषण या आपल्या मुंबईने केलं आहे आणि अजून करते आहे. जसं पहाटे तीन वाजता पहिली गाडी पकडून दादरला फुलं घेऊन उतरणारे अनेक स्त्री-पुरुष आहेत, हे कष्ट कशासाठी तर याची दोन कारणे आहेत, पहिलं म्हणजे या फुलांमुळे त्यांचा चरितार्थ चालतो आणि दुसरं, ही ‘ताजी फुलं’ लोकांच्या नजरेत भरतात…

    हेही वाचा – कवी ग्रेस अन् “भय इथले संपत नाही…” कविता

    व.पुं.चा अजून एक विचार मनात येतो, “समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की, आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते…” आपण बघतो, विरार लोकल असो किंवा चर्चगेट, तुम्ही लेडिज किंवा जनरल, दोन्ही डबे बघा खचाखच भरलेले असतात. अनेक लोक जबाबदारीमुळे जो संघर्ष करतात, वेळेला दोन-दोन तास उभ्याने प्रवास करतात, त्याची साक्षीदार ही लोकल असते. म्हणून तर मुंबईत तुफान कष्ट आहेत, पण एकदा तुम्हाला ती सवय झाली की, याच मुंबईचा तुम्हाला लळा लागतो. तुमच्या कष्टाचं फळ द्यायला इथे मुंबादेवी आहे तसंच, सिद्धिविनायक मंदिर आहे. कारण, आयुष्यात कितीही अपयश आलं तरी, तो कर्ताकरविता तुमच्यावर प्रामाणिकपणाचं फळ म्हणून पुष्पवृष्टी करतोच. म्हणून, तुम्ही मुंबईत एकटे नसता. जसं व.पुं.नी म्हटलं आहे, “हजारो देणग्यांची पुष्पवृष्टी करायला परमेश्वर तयार आहे, तुम्ही फक्त स्वीकारण्याची तयारी दाखवा…”

    एक सांगू का, इथे आज असे देखील संसार करणारी लोकं आहेत, जे दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत राहतात. पण मनाचं समाधान महत्त्वाचं! कारण, परिस्थिती ही नंतर सुधारते पण, तुम्ही जे सुंदर क्षण जगलेले असता, ते परत येत नाहीत. खूप काही दिलंय या मुंबईने. घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडेल, पण मुंबई ही तिच्याकडे आलेल्यांना कधी नाराज करत नाही, हे मात्र नक्की. इथे गाड्यांचे प्रचंड हॉर्न आहेत, ट्रॅफिक आहे, तरीही समाधानाचं तेज देखील आहे! माझ्यासाठी ही मुंबई म्हणजे सर्व काही आहे…

    हेही वाचा – सुरेश भट… शब्द, स्वरांचा पारिजात

    मराठमोळे खाद्यपदार्थ पाहिजे असतील तर, दादरचं प्रकाश हॉटेल आहे, जिथे अजूनही लोणी थालिपीठ, मसालेभात, भाजणीचे वडे असे एकाहून एक सुंदर पदार्थांची रेलचेल आहे. लिहू तेवढं कमीच आहे… तुम्ही ‘डबलसीट’ हा चित्रपट पाहिला असेल तर, मुंबईचं आयुष्य जास्त जवळून अनुभवता येतं. शेवटी काय, मुंबापुरीत संधी एकापेक्षा एक आहेत, पण कष्टाला पर्याय नाही…


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avantar.creativemarketix.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026 अवांतर

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    By Team AvaantarMarch 11, 2026

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर दात हलत असलेलं 8 वर्षाचं एक मुल ओपीडीत आलं होतं. बघितलं तर…

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील विज्ञान शिक्षण

    March 2, 2026

    अमृताहूनी गोड माझी माय मराठी!

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn