Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»ललित»मांजर पाळले, असे खोटे बोलू नका!
    ललित

    मांजर पाळले, असे खोटे बोलू नका!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 31, 2025Updated:March 17, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, दनू, पिदू, ट्विस्ट
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिप्ती चौधरी

    दनूला बाहेर जाण्यात अजिबात रस नव्हता म्हणून दिदीने मला पट्टा घालून घरात फिरवायचा सराव सुरू केला. एका संध्याकाळी खालची गडबड कमी झाल्यावर थोडे उशिरा मला पट्टा घालून लिफ्टने खाली नेले. दरवाजासमोरील पायऱ्यांच्या बाजूला सुशोभित बाग होती. त्यात उंच झुडपांचे दाट जंगल होते… लपायला एकदम भारी जागा! मी त्या किर्र झुडपांच्या जंगलात शिरलो… माझा पट्टा आई आणि दिदी ओढत होत्या. त्यामुळे अजून एक फायदा झाला… पट्ट्याला ओढ असल्याने मी आधी डोक्याचा आणि नंतर पोटाचाही वेढा मस्तपैकी काढून टाकला… आणि त्या झुडपात अंतर्धान पावलो! आईने डॉ. इरफान अहमद यांची मदत घेऊन माझा पुन्हा ताबा घेतला.

    मला फिरायला खाली नेण्याबद्दल चांगलीच अद्दल मी या दोघींना घडवली, त्यामुळे पुन्हा काही असा प्रयत्न करायची हिम्मत त्यांनी केली नाही. पण ऑपरेशननंतर तसा विशेष हट्टही आम्ही केला नाही. बाहेरच्या जगाचा फारसा चांगला अनुभव नसल्याने दनूला तर घराची सुरक्षा सोडून अजिबात धोका पत्करायचा नव्हता आणि तशी गरजही आम्हाला वाटली नाही; कारण आम्ही दोघे एकमकांशी खेळायचो, आमच्याबरोबर वेळ काढून आई आणि दिदी खेळायच्या. घरात धावायला जागा होतीच, पण आम्हाला उड्या मारायला विशेष आवडते. त्यामुळे जर धावायला जमीन कमी असेल तर, उभ्या भिंती लगत उड्या मारून वर-खाली करता येईल, अशी सोयही पुरते. सर्व कपाटांवर उडी मारून जाता येईल, अशा टेबल, खुर्च्या, फळ्या होत्या; त्यामुळे व्यवस्थित व्यायाम, खेळ होत असे. जाळीच्या खिडकीत बसून बाहेरची मोकळी हवा, ऊन खात आम्ही मस्त ताणून द्यायचो. रात्री खेळण्यासाठी घरभर आमची खेळणी पडलेलीच असायची.

    मी नव्या घरात लवकर रुळलो. सगळीकडे नाक, गाल घासत माझा वास ठेवत ही जागा माझी आहे, हे नक्की करत होतो. पण दनू मात्र घाबरतच फिरायचा. आमच्या मिशांखालच्या ग्रंथी असा द्राव स्त्रवतात की, त्यांचा एक विशिष्ट वास असतो. जेव्हा आम्ही नाक घासतो, तेव्हा त्या वस्तूला तो वास येतो आणि ती आमची आहे, असे आम्हाला वाटते आणि आजूबाजूला हा आमचा वास असेल तर, आम्हाला निवांत आणि ताणविरहीत वाटते. तशा वासाचा स्प्रेही येतो, पण तो नसेल तर सोप्पा उपाय आहे. आईने धुतलेले सॉक्स घेतले आणि ते दनूच्या मिशांना चोळले. मग ते सॉक्स सर्व भिंती, कोपरे, कपाट, खुर्च्या टेबलाच्या पायांना चोळले. आता दनूलाही पटकन रुळायला झाले. नवीन ठिकाणी आपला वास आला तर, माऊलाही ती जागा परकी वाटत नाही. जेव्हा तुम्हाला नाक घासतो, तेव्हा लक्षात ठेवा तुमच्यावर आमची मालकी आहे, असे प्रतिपादन करत असतो. त्यामुळे पुढच्या वेळी, मी हे मांजर पाळले आहे असे खोटं बोलू नका… सत्य हे आहे की, आम्ही मालक आहोत आणि तुम्हाला आम्ही पाळले आहे!

    तीन चार महिन्यांत आम्ही पूर्णपणे व्यवस्थित स्थिरस्थावर झालो. आमची सोनेरी मांदेली इथे मिळत नाही, पण चंदेरी मांदेली आम्हाला चालली! आता घरातच असल्याने आमचे catfood पण कमी चरबी असलेले,indoor, neutered कॅट्साठी असलेले सुरू केले. बाहेरचं गवत मिळत नाही म्हणून गहू पेरून त्याचे गवत आमच्यासाठी नेहमी लावलेले असते. त्यामुळे hairball होत नाही.

    तीन-चार दिवसांसाठी बाहेर जायचे असल्यास माझ्याकडे अजिबात ठेवू नका, असे डॉ. इरफान यांनी सांगितले होते. नव्या ठिकाणी सरावायलाच माऊला तीन-चार दिवस लागतात; मग इतक्या छोट्या काळासाठी तिला ताण देऊ नका. माणसे नसली तरी, त्या आपल्या घरात मजेत राहतात! त्यामुळे घरच्यांच्या छोट्या दौऱ्यांच्या वेळी नमिता आणि कलाँजी यांच्याबरोबर आम्ही मस्त राहायचो. दिवसातून एक-दोनदा येऊन त्या लिटर साफ करून आम्हाला खाऊ देऊन जायच्या.

    मधेच लागलेल्या लॉकडाऊनमध्ये तर आमची मज्जाच होती… कारण सगळेच सतत घरी. आमच्या परीने आम्ही पण कामाची जबाबदारी उचलली. गॅलरीत धुवून वाळत घातलेल्या वस्तूंचे रक्षण करायची महत्त्वाची जबाबदारी माझी होती! तसा दनूही बसायचा पण मटार, फरासबी अशा त्याच्या खेळण्याच्या वस्तू तो हळूच आत घेऊन जायचा!

    अशा प्रकारे बंगलोरला आमची दोन वर्षं अगदी मजेत गेली. हे आमचे घर… हा ओळखीचा परिसर… ओळखीची माणसे… असे सगळे आमचे वाटत असतानाच कहानी में ट्विस्ट आला.. आम्हा सर्वांनाच एका नवीन वळणावर आणून उभे केले… आमच्या पप्पांची बदली अमेरिकेला झाली आणि सगळं चंबूगबाळं उचलून त्या अनोळखी जगात स्थलांतराची तयारी सुरू झाली…

    क्रमशः

    (पिदू या मांजराची आत्मकथा)

    diptichaudhari12@gmail.com

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    By Team AvaantarMarch 16, 2026

    पराग गोडबोले दोन दिवस ऑफिसच्या कामानिमित्त पुण्यनगरीत होतो. पुण्याची आणि माझी नाळ तशी बालपणापासून जोडलेली,…

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn