Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊनि धाले…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊनि धाले…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 16, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥13॥

    तरी जयांचिये चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जयां निजेलियांतें उपासी । वैराग्य गा ॥188॥ जयांचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्मु करी राणिवा । जयांचें मन ओलावा । विवेकासी ॥189॥ जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसि आले । पालव नवे ॥190॥ जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आंनदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥191॥ जयां भक्तीची येतुली प्राप्ती । जे केवल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥192॥ जे आघवांचि करणीं । लेइले शांतीचीं लेणीं । जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ॥193॥ ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव । जे जाणोनियां सर्व । स्वरुप माझे ॥194॥ मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाही ॥195॥ ऐसे मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥196॥

    सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: ॥ नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥14॥

    तरी कीर्तनाचेनि नटनाचें । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे । जे नामचि नाहीं पापाचे । ऐसें केलें ॥197॥ यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविली । यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥198॥ यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें । तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥199॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : मी सर्वदा स्वतःसिद्धु, तो कीं बाळ तरुण वृद्धु…

    अर्थ

    हे पार्था, पण दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे, भूतांचे आदि कारण आणि क्षयरहित अशा मला जाणून, अनन्य होऊन, माझी भक्ती करतात. ॥13॥

    ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्रसंन्यासी होऊन राहतो आणि जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते. ॥188॥ ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो आणि ज्यांचे तृप्त मन विचारास जीवन आहे ॥189॥ ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे आणि जे पुरुष पूर्णता जेऊन तृप्त झाले आहेत आणि जे पुरुष शांतीरूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत ॥190॥       जे पुरुष परिणामाला (पूर्ण अवस्थेला) फुटलेले अंकुर आहेत, जे (सात्विक) धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंदरूपी समुद्रात तुडुंब बुडवून भरलेले घट आहेत, ॥191॥ ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती (झालेली) असते की, ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणातात, ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते ॥192॥ ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत आणि ज्यांचे चित्त मी जो सर्वव्यापक, त्या मला आच्छादणारी खोळ झाले आहे ॥193॥ असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत, ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत, ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे, असे जाणून ॥194॥ मग वाढत्या प्रेमाने मला भजतात; पण (त्यांची भक्ती अशी एकविध असते की, आपल्या मनाच्या संकल्पाने, देव एक उपास्य आणि मी एक उपासक निराळा आहे) असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही. ॥195॥ अर्जुना, याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात. पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे, तो सांगतो, तो ऐक. ॥196॥

    सदा माझा नामघोष करणारे, (अष्टांग योगमार्गाने माझ्या प्राप्तीसाठी) निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे आणि मला भक्तिपूर्वक (सर्व मीच आहे, असे समजून सर्वत्र मला) नमस्कार करणारे, असे (माझ्या ठिकाणी) नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. ॥14॥

    तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांचा धंदा नष्ट केला. कारण की, त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले. ॥197॥ यमदमांना निस्तेजता आणली, तीर्थांना पाप नाहीसे करणारे, असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते, त्या श्रेष्ठपदावरून उठविले, (आणि) पापे करून लोक यमलोकास जात होते, पण ती पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकास जात नाहीसे झाले. ॥198॥ यम हे साधन म्हणू लागले की, (आता) निग्रह कोणाचा करावा? (कारण ज्याचा निग्रह करावयाचा, ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले). दम हे साधन म्हणू लागले, कोणत्या इंद्रियाचे दमन करावे? (कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली.) तीर्थे म्हणावयास लागली की, पापच जर औषधाला राहिले नाही, तर आम्ही खावे काय? ॥199॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : पैं तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धीतें ग्रासी…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn