Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 15, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय दहावा

    नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा- । विलासिया ॥1॥ नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या- । लालनलीला ॥2॥ नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥3॥ नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिगुणसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥4॥ नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥5॥ तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु । तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी ॥6॥ दैविकी उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरसदीपांचा । थावो लाभे ॥7॥ जी आपुलिया स्‍नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी । तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥8॥ हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे । तो जीवचि परि तुके । महेशेंशीं ॥9॥ एवढें जिये महिमेचें करणें । ते वाचाळपणें वानूं मी कवणें । का सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ॥10॥ केउता कल्पतरूवरी फुलौरा । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा । ऐसा कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों ॥11॥ चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें । गगनावरी उभवावें । घडे केवीं ॥12॥ तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें कें असे साधन । हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ॥13॥ तरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरुसमर्था रूप करूं म्हणें । तरि मोतियासी भिंग देणें । तैसें होईल ॥14॥ कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतीचीं बोलणीं । उगियाचि माथां ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥15॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें…

    अर्थ

    स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या आणि विद्यारूपी कमलाचा विकास करणार्‍या आणि परावाणीचा विषय (स्वरूपस्थिती) हीच कोणी तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणार्‍या, (श्रीगुरो), तुम्हास माझा नस्कार असो. ॥1॥ अहो, संसाररूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त, ज्वानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्रीगुरो, तुम्हास माझा नमस्कार असो ॥2॥ अहो, सर्व जगाचे पालन करणारे, कल्याणरूपी रत्नांची खाण असलेले, भक्तरूपी वनातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हास माझा नमस्कार असो ॥3॥ शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणार्‍या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा आणि कामाला मोहित करणार्‍या, तुम्हाला माझा नमस्कार असो. ॥4॥ शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य असणारे, संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा नाश करणारे आणि विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे, अहो श्रीगुरुराया, तुम्हाला माझा नमस्कार असो ॥5॥ तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो, तेव्हा सर्व विद्यांमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. ॥6॥ आपण जे गुरुदेव, त्या आपली उदार वाणी जेव्हा ‘भिऊ नकोस’ असे आश्वासन देते, तेव्हा शांतादि नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो (म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात.) ॥7॥ महाराज, आपले प्रेम हीच कोणी सरस्वती, तिने जर मुक्याचा अंगीकार केला, तर तो पैजेने बृहस्पतीबरोबर देखील वादविवाद करतो. ॥8॥ हे राहू द्या. ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो, तो जीवच खरा, पण तो शिवाच्या बरोबरीला येतो. ॥9॥ एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात, त्याचे मी कोणत्या विशेष बोलण्याने वर्णन करू? सूर्याचे शरीर चकाकित दिसावे म्हणून त्यास (लोखंडाच्या आरशाप्रमाणे) घासण्याची जरूर आहे काय? ॥10॥ कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहोर कशाला फुटावयास पाहिजे? क्षीरसमुद्राला कशाने पाहुणाचार करावा? त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावे? ॥11॥ चंदनाला कशाची उटी लावावी? अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे? आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय? ॥12॥ त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या मोठेपणाचे आकलन करणारे साधन कोठे आहे? (कोठेही नाही.) हे लक्षात घेऊन मी निमूटपणाने त्यांना नमस्कार केला. ॥13॥ जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्रीगुरूंचे यथार्थ वर्णन करू म्हणेन तर, ते माझे करणे मोत्यांना (चकाकी येण्याकरिता) अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल. ॥14॥ साडेपंधरा दराच्या बावन्नकशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे, हेच बरे. ॥15॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avantar.creativemarketix.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Dnyaneshwari : जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें…

    March 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn