Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जन्मलिया दिवसदिवसें, हों लागे काळाचियाचि ऐसें…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 13, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    जो बहुवें विषयविलासें गुंफें । तो म्हणती उवायें पडिला सापें । जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥509॥ जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरोनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणोनि ॥510॥ जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजें नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥511॥ जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥512॥ अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥513॥ दर्दुर सापें गिळिजतु आहे उभा । कीं तो मासिया वेटाळी जिभा । तैसे प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥514॥ अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥515॥ तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥516॥

    मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥34॥

    तूं मन हें मीचि करीं । माझां भजनीं प्रेम धरीं । सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥517॥ माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख । मद्याजी चोख । याचि नांव ॥518॥ ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरूपा पावसी । हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असे ॥519॥ अगा आवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें । तें पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥520॥ ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पद्रुमें । बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥521॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : अंगावरी पडतां पाषाण, न सुवावें केविं वोडण…

    अर्थ

    जो अनेक विषयविलासात निमग्न असतो, तो सध्या सुखात आहे, असे म्हणतात आणि जो लोभाने ग्रस्त झालेला आहे, त्यास या जगात ज्ञानी म्हणतात. ॥509॥ ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे आणि त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी नाहीशी झाली आहेत, अशा म्हातार्‍यास वडील म्हणून नमस्कार करतात. ॥510॥ जसजसे मूल वयाने वाढत जाते (वयाने मोठे होते) तसतसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने आणि कौतुकाने नाचतात. पण वरून जरी (ते मूल) मोठे वाढताना दिसले तरी, वास्तविक पाहिले तर, आतून (त्याचे) आयुष्य सरून जात आहे, त्याची (त्यांना) खंतच नाही. ॥511॥ जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते, असे असून (आईबाप) आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात आणि आनंदप्रदर्शक गुढ्याही उभारतात. ॥512॥ अरे अर्जुना, कोणी कोणाला ‘तू मर’ असे म्हटले तर, ते त्यास सहन होत नाही आणि (त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता) मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे, हे त्यांना मूर्खपणाने समजत नाही. ॥513॥ बेडूक सापाकडून उभा गिळाला जात असताना देखील, तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो, तशाच तर्‍हेने प्राणी कोणात्या लोभाने तृष्णा वाढवतात कोण जाणे? ॥514॥ अरेरे, हे वाईट आहे! मृत्युलोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथे अकस्मात जन्मला आहेस, ॥515॥ तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की, ज्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील. ॥516॥

    माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, (सर्वत्र) मला (एकाला) वंदन कर. अशा रीतीने मत्परायण होत्साता (माझे ठिकाणी) चित्त योजल्यावर तू माझ्याप्रतच येशील. ॥34॥

    तू आपले मन मद्रूप कर. माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे, असे समजून मला एकाला नमस्कार कर. ॥517॥ पाहा, जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो, त्यालाच माझे चांगले भजन करणारा म्हणावे. ॥518॥ याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील, तेव्हा मद्रूपास पावशील; ही माझ्या अंत:करणातील (गुप्त गोष्ट) तुझ्याजवळ मी सांगत आहे. ॥519॥ अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल, ते तुला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तू सुखरूप होऊन राहाशील ॥520॥ भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरू जे मेघ:श्याम परब्रह्म श्रीकृष्ण, ते असे बोलले, असे संजय म्हणाला. ॥521॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)


    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn