Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»अध्यात्म»Dnyaneshwari : अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 27, 2026Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Nine, नववा अध्याय, अध्याय नववा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सार्थ ज्ञानेश्वरी

    अध्याय नववा

    ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥21॥

    मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥328॥ जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें । तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ॥329॥ एवं थितिया मातें चुकले । जिहीं पुण्यें स्वर्ग कामिले । तयां अमरपण तें वावों जालें । आतां मृत्युलोकु ॥330॥ मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेचां दाथरीं । उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥331॥ अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥332॥ अर्जुना वेदु जऱ्ही जाहला । तरी मातें नेणतां वायां गेला । कणु सांडुनि उपणिला । कोंडा जैसा ॥333॥ म्हणऊनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण । आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥334॥

    अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥22॥

    पैं सर्वभावेंसी उखितें । जे वोपिले मज चित्तें । जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणे ॥335॥ तैसा मीवाचूनि कांही । आणीक गोमटेंचि नाहीं । मजचि नाम पाहीं । जिणेया ठेविलें ॥336॥ ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसांते मातें । जे उपासिती तयांतें । मीचि सेवीं ॥337॥ ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणी । तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥338॥ मग तिहीं जें जें करावे । तें मजचि पडिलें आघवें । जैशी अजातपक्षांचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥339॥ आपुली तहानभूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें । तैसे अनुसरले जे मज प्राणें । तयांचेन काइसेनिहि न लजें मी ॥340॥ तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड । कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुयें ॥341॥ ऐसा मनीं जो जो धरिती भावो । तो तो पुढां पुढां लागें तयां देवों । आणि दिधलियाचा निर्वाहो । तोहि मीचि करीं ॥342॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : जैसें कल्पतरुतळवटीं, बैसोनि झोळिये पाडी गांठी…

    अर्थ

    तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मृत्युलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा करून, तीन वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्ममार्ग आचरण करणारांना या प्रकारे येणे-जाणे (जन्ममृत्यू) प्राप्त होते. ॥21॥

    मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे, त्याबरोबरच यज्ञकर्त्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्यूलोकाला परत येऊ लागतात. ॥328॥ ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहात नाही, त्याप्रमाणे (पुण्याची पुंजी सरलेल्या) यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे? ॥329॥ या प्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली, ते अमरपणही व्यर्थ गेले असता, त्यांना (पूर्वीचा) मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. ॥330॥ आईच्या उदररूपी गुहेत, नरकाच्या उकडीतील थरात, नऊ महिनेपर्यंत उकडून पुन: पुन: ते जन्माला येऊन (पुन्हा) मरतात. ॥331॥ अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणार्‍या यज्ञकर्त्याचे स्वर्गसुख समजावे. ॥332॥ ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफाणावा, त्याप्रमाणे अर्जुना, मला जाणले नाही तर, प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय. ॥333॥ म्हणून एक मला टाकून केलेले, तिन्ही वेदांनी सांगितलेले धर्म (ज्योतिष्टोमादिक यज्ञकर्मे) निरर्थक आहेत. यास्तव अर्जुना, मला एक जाणलेस, मग जरी दुसरे काही जाणले नाहीस, तरी तू सुखी होशील. ॥334॥

    एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात, त्या सतत (माझ्या ठिकाणी) युक्त असलेल्या लोकांचा (सायुज्य अथवा मत्सेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा) योग (अप्राप्त वस्तूची प्राप्ती) आणि क्षेम (प्राप्त वस्तूचे रक्षण) मी करतो. ॥22॥

    जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही ॥335॥ त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना चांगलेच वाटत नाही आणि पाहा, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे (ज्यांना माझ्याकरिता जगण्यातच आपल्या जीविताची सार्थकता वाटते). ॥336॥ याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात, त्यांची सेवा मीच करतो. ॥337॥ ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधांच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला. ॥338॥ मग जे जे म्हणून त्यांस करावयाचे असते, ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्याने पक्षीण जगते, ॥339॥ आपली तहानभूक (ज्याला) काही कळत नाही, त्या लहान मुलाला जे हितकर असेल, ते आईलाच करणे भाग पडते, त्या (मुला)प्रमाणे जे मला अंत:करणपूर्वक भजले, त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. ॥340॥ त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर, तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो. (म्हणजे मी मद्विषयक प्रेम त्यांना देतो) ॥341॥ याप्रमाणे ते जो जो हेतू मनात धरतात, तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो, आणि दिलेल्याचे रक्षणही मीच करतो. ॥342॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ अमरत्व हेंचि सिंहासन, ऐरावतासारिखें वाहन…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Author

    • Team Avaantar
      Team Avaantar
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    By Team AvaantarMarch 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें…

    Dnyaneshwari : आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधें…

    March 16, 2026

    Dnyaneshwari : चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें…

    March 15, 2026

    Dnyaneshwari : अर्धोन्मीलित डोळे, वर्षताति आनंदजळें…

    March 14, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blog 1
    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn